फोटो – ट्विटर

भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील T20 सीरिजला गुरूवारी (24 फेब्रुवारी 2022) रोजी सुरूवात होत आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धची सीरिज 1-4 या फरकानं गमावून श्रीलंकन टीम भारतामध्ये दाखल झाली आहे. या सीरिजमध्ये सलग 9 T20 मॅच जिंकणाऱ्या टीम इंडियाशी त्यांना सामना करायचा आहे. त्यातच 3 प्रमुख खेळाडू अनफिट असल्यानं (3 Sri Lanka Players Unfit) ही सीरिज सुरू होण्यापूर्वीच श्रीलंकन टीमची झोप उडाली आहे.

प्रमुख खेळाडूला कोरोना

श्रीलंकेचा प्रमुख लेग स्पिनर वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) जवळपास संपूर्ण सीरिजमधून आऊट झालाय. T20 क्रिकेटमधील आयसीसी रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणारा हसरंगा हा श्रीलंकेचा प्रमुख बॉलर आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या T20 सीरिजच्या दरम्यान हसरंगाला कोरोनाची लागण झाली होती.

हसरंगा ऑस्ट्रेलिया विरूद्ध 5 पैकी पहिल्या 2 T20 मॅच खेळू शकला होता. त्यानंतर 7 दिवस आयसोलेशनमध्ये घालवल्यानंतरही मंगळवारी त्याची आरटीपीसीआर टेस्ट (RT-PCR Test) पॉझिटिव्ह आली. त्यामुळे श्रीलंकन टीमला धक्का (3 Sri Lanka Players Unfit) बसला आहे.

टीम इंडिया जुलै 2021 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी हसरंगानं जबरदस्त बॉलिंग केली होती. तेव्हा झालेल्या T20 सीरिजमध्ये हसरंगानं सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्या सीरिजनंतरही त्यानं सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. यामध्ये T20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरूद्ध घेतलेल्या हॅट्ट्रिकचाही समावेश आहे.

या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे हसरंगा आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) सर्वात महागडा श्रीलंकन खेळाडू ठरला होता. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 10 कोटी 75 लाखांना खरेदी केले आहे.

RCB Squad Analysis: कशी आहे IPL 2022 ची टीम बंगळुरू? यंदा आयपीएल जिंकणार का?

अन्य कोण अनफिट?

श्रीलंकेतील क्रीडा पत्रकार रेक्स क्लेमेंटाईन यांनी केलेल्या ट्विटनुसार कुशल मेंडिस (Kushal Mendis) आणि महीश तीक्षणा (Maheesh Teekshana) या दोन खेळाडूंचे स्नायू दुखावले (Hamstring Niggles) असून त्यांचा किमान पहिल्या T20 मधील सहभाग अनिश्चित (3 Sri Lanka Players Unfit)  आहे.

श्रीलंकन टीम उद्या (24 फेब्रुवारी) कुशल मेंडिस आणि महीश तीक्षणा यांच्याशिवाय मैदानात उतरेल. मेंडिस एकपेक्षा जास्त मॅच न खेळण्याची शक्यता आहे. या दोघांचेही स्नायू दुखावले आहेत. वनिंदू (हसरंगा) बद्दलच्या आशा अजून संपलेल्या नाहीत. त्याची पीसीआर टेस्ट निगेटीव्ह आली तर तो कॅनबेराहून धर्मशालामध्ये रवाना होईल.’ असे ट्विट रेक्स यांनी केले आहे.

श्रीलंकेची झोप उडाली

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सीरिजमधील एकमेव विजयात कुशल मेंडिसचा महत्त्वाचा वाटा होता. आक्रमक ओपनर असलेल्या मेंडिसनं नाबाद 69 रन करत श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. तर महीश तीक्षणा या मिस्ट्री स्पिनरनही सीरिजमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. महीशला आगामी आयपीएल सिझनसाठी चेन्नई सुपर किंग्सनं करारबद्ध केले आहे. हसरंगापाठोपाठ हे दोघंही पहिल्या मॅचपूर्वी अनफिट असल्यानं श्रीलंकन टीमची झोप उडाली (3 Sri Lanka Players Unfit) आहे.

श्रीलंका विरूद्धची पहिली T20 24 फेब्रुवारी रोजी लखनौमध्ये होणार आहे. तर दुसरी आणि तिसरी T20  ही अनुक्रमे 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी धर्मशालामध्ये होणार आहे. आता दुसऱ्या T20 पासून तरी सर्व खेळाडू उपलब्ध असतील अशी श्रीलंकन मॅनेजमेंटला अपेक्षा आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

   

error: