फोटो – ट्विटर

भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील T20 सीरिज गुरूवार (24 फेब्रुवारी 2022) रोजी सुरू होणार आहे. या सीरिजमध्ये नियमित व्हाईस कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे खेळणार नाही. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) व्हाईस कॅप्टन आहे. या सीरिजपूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये कॅप्टन रोहित शर्मानं बुमराहच्या क्षमतेबद्दल (Rohit Sharma on Bumrah Captaincy) मोठं वक्तव्य केले आहे.

रोहितवर अतिरिक्त जबाबदारी

रोहित शर्माची टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंका विरूद्ध मोहालीमध्ये होणाऱ्या टेस्टपासून रोहितच्या टेस्ट कॅप्टनसीचं युग सुरू होणार आहे. त्याबरोबर सध्या 34 वर्षांचा असलेल्या रोहितवर भावी कॅप्टन तयार करण्याची जबाबदारी असल्याचं निवड समितीनं स्पष्ट केले आहे.

रोहितनं पत्रकार परिषदेमध्ये भावी कॅप्टनबद्दलच्या प्रश्नावर त्याचे मत मांडले. रोहितनं यावेळी केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्याकडे भविष्यातील कॅप्टन म्हणून पाहात असल्याचे सांगितले. तसेच भावी कॅप्टनच्या जडणघडणीतील त्याची भूमिका देखील स्पष्ट केली.

रोहित शर्मा टेस्टमध्येही बेस्ट कॅप्टन ठरेल, वाचा 5 प्रमुख कारणं

रोहितचा रोल काय?

रोहितनं सांगितलं की, ‘माझी भूमिका त्यांना सर्व काही सांगण्याची नाही. ते सर्व परिपक्व क्रिकेटपटू आहेत. पण, अवघड परिस्थितीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी कुणीतरी त्यांच्यासोबत असणे आवश्यक आहे. मला हे काम करण्यास आनंद होईल. आम्ही देखील याच पद्धतीनं तयार झालो आहोत’

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) कॅप्टन असतानाच रोहित आणि विराटला भविष्यातील कॅप्टन म्हणून तयार करण्यात आले होते. हे रोहितने नाव न घेता सांगितले. ‘आम्हाला ही कुणीतरी याच पद्धतीनं तयार केले. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येकाला यामधून जावं लागतं. याला कुणाही अपवाद नाही. बुमराह, राहुल आणि पंत या खेळाडूंबद्दल सांगायचं झालं तर टीम इंडियाच्या यशात त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. त्याचबरोबर त्यांच्याकडे भविष्यातील कॅप्टन (Rohit Sharma on Bumrah Captaincy) म्हणून देखील पाहिले जाईल.’

बुमराह भावी कॅप्टन!

रोहित शर्मानं यावेळी बोलताना जसप्रीत बुमराहबद्दल जे सांगितलं ते पाहाता भविष्यातील कॅप्टन म्हणून बुमराहचा गांभीर्यानं विचार होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. बुमराहबद्दल बोलताना रोहित म्हणाला की,

‘एखादा खेळाडू बॅटर आहे की बॉलर याने फार फरक पडत नाही. माझ्या मते जसप्रीत बुमराहचा मेंदू शार्प आहे. मी त्याला जवळून पाहिलं आहे. कॅप्टनसीची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्याला चांगली संधी आहे. तो त्याचा खेळ आणखी उंचावेल, याची मला खात्री (Rohit Sharma on Bumrah Captaincy) आहे.’

जसप्रीत बुमराहनं यापूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन होण्याची संधी मिळाली तर आपण ती जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज असल्याचे जाहीर केले आहे.

टीमचा कॅप्टन होण्यासाठी जसप्रीत बुमराह तयार, फास्ट बॉलरनं केले महत्त्वाचे वक्तव्य

श्रीलंका विरुद्धच्या T20 सीरिजसाठी टीम इंडिया (Team India Squad for T20 Series vs Sri Lanka)

रोहित शर्मा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, व्यंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, दीपक हुड्डा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह (व्हाईस कॅप्टन), युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि आवेश खान

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: