फोटो – ट्विटर, बीसीसीआय

भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील T20 सीरिजपूर्वी (India vs Sri Lanka T20 Series ) टीम इंडियाला 2 धक्के बसले. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि दीपक चहर (Deepak Chahar) हे दोन प्रमुख खेळाडू दुखापतीनं या सीरिजमधून बाहेर पडले. या दोघांनाही वेस्ट इंडिज विरूद्ध झालेल्या तिसऱ्या T20 मॅचच्या दरम्यान दुखापत झाली. चहरच्या जागी भारतीय टीममध्ये फास्ट बॉलिंगचे 5 पर्याय आहेत. पण, सूर्यकुमारच्या अनुपस्थितीनं बॅटींग ऑर्डरवर पर्याय होणार आहे. सूर्यकुमार यादवची कमतरता भरून काढण्याचे 3 पर्याय (3 options for Suryakumar Yadav) टीम इंडियासमोर आहेत.

पहिला पर्याय  

आजपासून (24 फेब्रुवारी 2022) सुरू होणाऱ्या T20 सीरिजमध्ये फक्त सूर्यकुमारच नाही तर केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे अनुभवी खेळाडू देखील टीम इंडियामध्ये नाहीत. राहुल सध्या दुखापतग्रस्त आहे. तर विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे मिडल ऑर्डरमध्ये अनुभवी खेळाडूची कमतरता जाणवणार आहे.

ही कमतरता भरून काढण्यासाठी कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) मिडल ऑर्डरमध्ये खेळू शकतो. रोहितमध्ये मोठे शॉट्स लगावण्याची क्षमता आहे. तसेच त्यानं कारकिर्दीच्या सुरूवातील मिडल ऑर्डरमध्येच बॅटींग केली आहे सूर्याच्या अनुपस्थितीमध्ये (3 options for Suryakumar Yadav) रोहित फिनिशरची भूमिका स्वत:कडे घेऊन शकतो. इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांना ओपनिंगला पाठवून मुक्तपणे खेळण्याची परवानगी टीम मॅनेजमेंट देऊ शकते. वेस्ट इंडिज विरूद्धच्या तिसऱ्या T20 मध्ये या पर्यायची अंमलबजावणी करण्यात आली होती.

IND vs SL: पहिल्या मॅचपूर्वी श्रीलंकन टीमची उडाली झोप, 3 प्रमुख खेळाडू अनफिट

दुसरा पर्याय

भारत विरूद्ध श्रीलंका T20 सीरिजसाठी संजू सॅमसन (Sanju Samson) या आक्रमक विकेट किपर-बॅटरची निवड झाली आहे. राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन असलेल्या संजूच्या गुणवत्तेवर कुणालाच शंका नाही. आयपीएल स्पर्धेतील काही अविस्मरणीय इनिंग याची साक्ष आहेत. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या गुणवत्तेला न्याय देणे संजूला अद्याप जमलेलं नाही.

संजूची T20 इंटरनॅशनलमधील सरासरी ही फक्त 11.70 आहे. संजूला आजवरील अपयश भरून काढण्याची मोठी संधी या सीरिजमध्ये आहे. कॅप्टन रोहित शर्मानंही संजूनं त्याच्या गुणवत्तेचा जास्तीत जास्त वापर करावा (3 options for Suryakumar Yadav) अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

तिसरा पर्याय

सूर्यकुमारच्या अनुपस्थितीमध्ये इशान किशनला मिडल ऑर्डरमध्ये खेळवण्याचा पर्याय देखील टीम मॅनेजमेंटसमोर आहे. वेस्ट इंडिज विरूद्धच्या सीरिजमध्ये इशान ओपनर म्हणून खेळला. त्याला फारशी कमाल करता आली नव्हती. संपूर्ण सीरिजमध्ये तो रन काढण्यासाठी झगडत होता.

इशानला मिडल ऑर्डरमध्ये खेळवून काही फायदा होईल का? हे श्रीलंका विरूद्धच्या सीरिजमध्ये तपासता (3 options for Suryakumar Yadav) येऊ शकते. इशान यापूर्वी आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून नियमितपणे मिडल ऑर्डरमध्ये खेळला आहे. आयपीएल 2020 मध्ये त्यानं मिडल ऑर्डरमध्येच बहुतेक काळ खेळून मुंबईकडून सर्वात जास्त रन केले होते.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: