फोटो – ट्विटर

भारतीय क्रिकेटमध्ये (Team India) सध्या बदलाचे वारे वाहत आहेत. कॅप्टन ते हेड कोचपर्यंतच्या विभागात गेल्या तीन महिन्यांत बदल झाले आहेत. टेस्ट टीमचा नवा कॅप्टन अद्याप निश्चित झालेला नाही. काही दिवसांमध्ये त्याच्या नावाची देखील घोषणा होईल. नव्या कॅप्टनच्या टीममध्ये चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे टेस्ट टीममधील सिनिअर चेहरे नसतील. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबतचे स्पष्ट संकेत (Ganguly on Pujara Rahane) दिले आहेत.

खराब फॉर्मचा फटका

पुजारा आणि रहाणे हे दोन दिग्गज गेले संपूर्ण दशक टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा भाग होते. भारतीय टीमच्या मिडल ऑर्डरमध्ये त्यांची जागा फिक्स होती. पण, त्यांचा बॅड पॅच चांगलाच लांबला. पुजाराला टेस्ट क्रिकेटमध्ये सेंच्युरी लगावून आता 3 वर्ष उलटली आहेत. तर अजिंक्यनं 2021 या कॅलेंडर वर्षातील 23 टेस्ट इनिंगमध्ये अवघ्या 20.82 च्या सरासरीनं रन केले आहेत.

दक्षिण आफ्रिका विरूद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्येही या दोघांची कामगिरी निराशाजनक झाली. पुजाराने 6 इनिंगमध्ये 124 तर अजिंक्यनं 6 इनिंगमध्ये फक्त 136 रनचे योगदान दिले. या दोघांच्या खराब फॉर्ममुळे टीम इंडियाची टेस्टमधील मिडल ऑर्डर कमकुवत बनली आहे. भारतीय टीमनं आफ्रिकेतील दोन्ही टेस्ट चांगल्या परिस्थितीमधून अवसानघातकी बॅटींगमुळे गमावल्या. या पराभवात पुजारा-रहाणे या सिनिअर खेळाडूंच्या खराब फॉर्म हे मोठे कारण होते.

रहाणे-पुजारापेक्षा दक्षिण आफ्रिकेनं केली टीम इंडियाची जास्त मदत!

काय म्हणाले गांगुली?

सौरव गांगुली यांनी ‘स्पोर्ट्सस्टार’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या सिनिअर खेळाडूंच्या हकालपट्टीचे स्पष्ट संकेत (Ganguly on Pujara Rahane) दिले आहेत. ‘ते खूप चांगले खेळाडू आहेत. रणजी क्रिकेटमध्ये ते खूप रन करतील अशी अपेक्षा आहे. माझी खात्री आहे की ते यामध्ये यशस्वी होतील. रणजी ट्रॉफी ही खूप महत्त्वाची स्पर्धा आहे. आम्ही सर्व त्यामध्ये खेळलो आहोत. हे दोघंही रणजी क्रिकेटमध्ये परत जातील आणि तिथं भरपूर रन करतील.’

सौरव गांगुलींच्या या उत्तरामुळे येत्या 25 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) टेस्ट सीरिजमध्ये पुजारा-रहाणे टीम इंडियात नसतील हे स्पष्ट झाले आहे.

कोण घेणार जागा?

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना वगळल्यास टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मधील 2 जागा रिक्त होणार आहेत. त्या जागेवर हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हे दोन दमदार पर्याय आहेत. विहारीला आजवर भारतामध्ये फक्त एकच टेस्ट खेळायला मिळाली आहे. विदेशातही त्याला नियमित संधी मिळत नाही. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेत नेहमी अवघड परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या नंबरवर त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली आहे. विहारीनं त्या मर्यादीत संधीत चांगला खेळ केला आहे.

टीम निवडीचं पंचवार्षिक दुखणं, द्रविड कधी देणार कडू गोळी?

देशांतर्गत क्रिकेटमध्ये तगडी कामगिरी केल्यानंतर न्यूझीलंड विरूद्ध मागच्या वर्षी झालेल्या कानपूर टेस्टमध्ये श्रेयस अय्यरनं पदार्पण केले. पहिल्याच इनिंगमध्ये त्याने सेंच्युरी झळकावली. न्यूझीलंड विरूद्ध चांगली कामगिरी करूनही त्याला दक्षिण आफ्रिका सीरिजमध्ये बेंचवर बसावे लागले होते. आता त्याची ही प्रतीक्षा श्रीलंकेविरुद्ध संपणार (Ganguly on Pujara Rahane) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: