फोटो – ट्विटर

भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील टेस्ट सीरिजपासून रोहित शर्माची (Rohit Sharama) या प्रकारातील पूर्णवेळ कॅप्टन म्हणून निवड केली आहे. या टीममध्ये सौरभ कुमार (Saurabh Kumar) या डावखुऱ्या स्पिनरची पहिल्यांदाच निवड झाली आहे. एकाही आयपीएल टीमचा सदस्य नसलेला सौरभ कुमार कोण आहे? (Who is Saurabh Kumar?) असा प्रश्न क्रिकेट फॅन्सना पडला आहे.

रोज 5 तास प्रवास

पश्चिम उत्तर प्रदेशमधले बागपत हे सौरभचे गाव. त्याने दिल्लीतील क्रिकेट अकदामीमध्ये प्रशिक्षण घेतले. त्यासाठी बागपत ते दिल्ली हा अडीच तासांचा प्रवास तो रेल्वेने करत असे. त्याचे वडील आकाशवाणीमधील निवृत्त कर्मचारी आहेत. मुलासोबत दिल्लीला जाता यावे यासाठी ते ओव्हर टाईम करत असत. बागपत-दिल्ली प्रवासात कुणी रेल्वेची चेन ओढून क्रिकेट अकादमीमध्ये जाण्यासाठी उशीर करू नये ही एकच काळजी आपल्याला सतावत असे, अशी आठवण सौरभने ‘इंडियन एक्स्प्रेस’ शी बोलताना सांगितली आहे.

दिल्लीतील क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असतानाच सौरभ ज्येष्ठ लेग स्पिनर बिशनसिंग बेदी यांच्या डोळ्यात भरला. त्यांनी त्याची प्रतिभा ओळखली. त्याला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्पिन बॉलिंगचे मार्गदर्शन केले. सौरभनं काही काळ भारतीय हवाई दल (Indian Air Force) मध्ये काम केलंय. त्याने 2014 साली फर्स्ट क्लास क्रिकेटची सुरूवात सैन्यदलाच्या टीममधून केली आहे. त्यानंतर 2015 पासून तो त्याचे गृहराज्य उत्तर प्रदेशकडून (Uttar Pradesh Cricket Team) खेळू लागला.

Explained: रोहित शर्मा टेस्टमध्येही बेस्ट कॅप्टन ठरेल, वाचा 5 प्रमुख कारणं

फर्स्ट क्लास कारकिर्द

सौरभनं उत्तर प्रदेशकडून खेळताना पहिल्याच फर्स्ट क्लास मॅचमध्ये (Who is Saurabh Kumar?) गुजरात विरूद्ध 10 विकेट्स घेतल्या. या कामगिरीनंतर तो या टीमचा नियमित सदस्य बनला. सौरभनं आजवर 46 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 196 विकेट्स घेतल्या आहेत. एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी त्यानं 16 वेळा केली असून आजवर एकूण 6 वेळा एका मॅचमध्ये 10 विकेट्स त्यानं घेतल्या आहेत.

सौरभ हा उपयुक्त बॅटर देखील आहे. बडोदा विरूद्ध नाशिकमध्ये झालेल्या रणजी ट्रॉफीच्या मॅचमध्ये उत्तर प्रदेशची अवस्था 7 आऊट 207 अशी झाली होती. त्यावेळी नवव्या नंबरवर आलेल्या सौरभनं कुलदीप यादवसोबत (Kuldeep Yadav) आठव्या विकेटसाठी 192 रनची पार्टनरशिप केली. त्या मॅचमध्ये सौरभ आणि कुलदीप दोघांनीही सेंच्युरी झळकावली होती. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 2 सेंच्युरी झळकावल्या (Who is Saurabh Kumar?) आहेत.

5 दिवसांमध्ये बदललं नशीब

सौरभ कुमार 2017 साली रायझिंग पुणे सुपर जायंट्सचा या आयपीएल टीमचा सदस्य होता. त्याला त्यावर्षी एकही मॅच खेळायला मिळाली नाही. पण, महेंद्रसिंह धोनी, स्टीव्ह स्मिथ यासारख्या दिग्गजांसोबत त्याने ड्रेसिंग रूम शेअर केली आहे. त्यानंतर तो पंजाब किंग्जचाही (Punjab Kings) सदस्य होता. पंजाबनंही त्याला कधी प्लेईंग 11 मध्ये खेळवले नाही. नुकत्याच झालेल्या आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) एकाही टीमनं सौरभला खरेदी केले नाही.

आयपीएल टीमनं दुर्लक्ष केलेल्या सौरभचे नशिब 5 दिवसांमध्येच बदलले. त्याची थेट टीम इंडियात निवड झाली आहे. यापूर्वी तो स्टँडबाय म्हणून भारतीय टेस्ट टीममध्ये होता. पण, आता त्याची मुख्य टीममध्ये निवड करण्यात आलीय. अक्षर पटेलच्या अनुपस्थितीमध्ये डावखुरा स्पिनर म्हणून निवड समितीनं त्याच्यावर विश्वास दाखवलाय.

सौरभचा उत्तर प्रदेश टीममधील जवळचा मित्र आणि सहकारी कुलदीपही आता टीममध्ये परतलाय. आजवर मोठा संघर्ष करून 28 वर्षांच्या सौरभनं टीम इंडियात जागा मिळवलीय. आता या क्रिकेटमधील या सर्वोच्च प्रकारात उड्डाण घेण्यासाठी एअर फोर्समध्ये काम केलेला सौरभ सज्ज (Who is Saurabh Kumar?) झालाय.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: