फोटो – ट्विटर, आयसीसी

भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात मार्च महिन्यात होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची निवड झाली आहे. या टीममध्ये वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) या अनुभवी विकेट किपरचा समावेश करण्यात आलेला नाही. भारतीय टीममधून वगळल्यानंतर साहा चांगलाच नाराज झाला आहे. त्याने थेट बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यावर गंभीर आरोप (Saha slams David-Ganguly) केले आहेत.

नेमके काय झाले?

गेल्या 10 वर्षांपासून टीम इंडियातील सक्रीय क्रिकेटपटू असलेल्या वृद्धिमान साहाचा आगामी सीरिजसाठी विचार करण्यात येणार नाही. त्याने रणजी क्रिकेटमध्ये खेळावं अशी सूचना निवड समितीनं केल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते.

निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी श्रीलंका सीरिजची घोषणा करताना देखील या वृत्ताला दुजोरा दिला. वृद्धिमान साहासह अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा यांना आपण स्वत:  फोन करून निवड समितीच्या निर्णयाची कल्पना दिली होती. तसंच रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2022) स्पर्धेत खेळण्याची विनंती केली, असे शर्मा यांनी स्पष्ट केले. टीमची निवड झाल्यानंतर साहाने या विषयावरील मौन सोडले आहे.

गांगुलीनं शब्द फिरवला!

वृद्धिमान साहानं बंगाली माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींना लक्ष्य केले. ‘मी न्यूझीलंड विरूद्ध कानपूर टेस्टमध्ये पेन किलर घेऊन नाबाद 61 रनची खेळी केली. त्या खेळीनंतर दादीने (सौरव गांगुली यांचे बंगाली क्रिकेटपटूंमधील नाव) व्हॉट्सअप मेसेज करत माझे अभिनंदन केले. मी बीसीसीआय अध्यक्ष असेपर्यंत काळजी करण्याचे कारण नाही, असे आश्वासन गांगुलीने मला दिले होते.

बोर्डाच्या अध्यक्षांकडून या शब्दात आश्वासन मिळाल्यानं माझा आत्मविश्वास वाढला होता. पण, त्यानंतर एकाच सीरिजमध्ये सर्व परिस्थिती कशी काय बदलली हे मला समजले नाही,’ असे म्हंटले (Saha slams David-Ganguly) आहे.

‘मी काम केलं, माझं क्रेडिट दुसऱ्यांनी पळवलं,’ अजिंक्य रहाणेचा गंभीर आरोप! VIDEO

द्रविडनं दिला ‘तो’ सल्ला

वृद्धिमान साहानं ‘स्पोर्ट्स स्टार’ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये हेड कोच राहुल द्रविडशी झालेल्या चर्चेचा उल्लेख केला आहे. भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाऊन टेस्टनंतर (India vs South Africa Cape Town Test) या दोघांमध्ये हे संभाषण झाल्याचा साहाचा दावा आहे.

‘केपटाऊन टेस्टनंतर द्रविड भाईंनी मला बोलावले आणि सांगितले की, मी तुला हे कसं सांगू समजत नाही पण, काही काळासाठी निवड समितीचे काही सदस्य आणि टीम मॅनेजमेंट नव्या विकेट किपरला संधी देण्याबाबत विचार करत आहेत. मी त्यांना माझ्या वयामुळे किंवा फिटनेसमुळे हा विचार सुरू आहे का? हा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी तो मुद्दा नसल्याचे स्पष्टीकरण दिले.’

श्रीलंका सीरिजसाठी निवड झाली नाही, तर आश्चर्य वाटू देऊ नकोस असे द्रविडने सांगितल्याचा दावा साहाने केला. ‘तुला कोणताही वेगळा निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय तू घेऊ शकतोस, असे राहुल भाईंनी मला सांगितले. मी त्यांना अजून कोणताही निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट केले. माझ्यात आणखी बरेच क्रिकेट शिल्लक आहे, माझे या खेळावर प्रेम आहे. या खेळाचा आनंद मिळतोय तो पर्यंत मी खेळणार असल्याचे द्रविडला सांगितले,’ अशी माहिती साहाने (Saha slams David-Ganguly) दिली.

रणजी स्पर्धेतून माघार का?

वृद्धिमान साहाने अगदी शेवटच्या क्षणी रणजी क्रिकेट स्पर्धा न खेळण्याचे ठरवले. बंगाल क्रिकेट टीममधून नाव मागे का घेतले याचेही त्याने स्पष्टीकरण ‘स्पोर्ट्स स्टार’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिले आहे.

‘दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी माझ्या बायकोला डेंग्यू झाल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिला आता बरं वाटत असलं तरी ती पूर्णपणे फिट झालेली नाही. त्यामुळे अनेक महिने बबलमध्ये घालवल्यानंतर मी घरी राहून मुलांना वेळ देण्याचे ठरवले. या मुद्याचा बाऊ करण्यात आला,’ असा आरोप साहाने केला आहे.

रोहित शर्माशी संबंध ते सौरव गांगुलीचे वक्तव्य विराट कोहलीने दिले 5 मोठ्या मुद्यांवर स्पष्टीकरण

टीम प्रोटोकॉलमुळे मी गप्प बसलो होतो. पण, मी आता गप्प बसणार नाही. मी रणजी ट्रॉफी न खेळण्याचा विषय इतका मोठा झाल्याचे पाहून आश्चर्य (Saha slams David-Ganguly) वाटले. आता मी गुजरात टायटन्सकडून आयपीएल स्पर्धा खेळण्यावर लक्ष केंद्रित करणार असून पुढील सिझनचा अद्याप विचार केलेला नाही,’ असे साहा म्हणाला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: