फोटो – ट्विटर

वन-डे सीरिजमध्ये 0 आणि 19. T20 सीरिजमधील एकमेव मॅचमध्ये 12 बॉलमध्ये 10 रन. श्रीलंका दौऱ्यातील या तीन इनिंगनंतर क्रिकेटमधील अनिश्चिततेचा प्रत्यय हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) येत आहे. श्रीलंका दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर त्याच्या टीममधील जागेवर प्रश्न (Hardik Pandya Future) उपस्थित झाला आहे.

हार्दिकला इतकं महत्त्व का?

सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर येऊन बॉलर्सवर प्रहार करणारा हार्दिक सध्या हरवलाय. फास्ट बॉलिंग करु शकेल अशा बॅटींग ऑलराऊंडरची टीम इंडियाला बऱ्याच काळापासून गरज होती. मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) सुरुवातीच्या वर्षातील त्याच्या कामगिरीनं भारतीय फॅन्स आणि निवड समितीच्या हार्दिक बद्दलच्या अपेक्षा (Hardik Pandya Future) वाढल्या. विदेशातील पिचवर टीमचं संतुलन राखण्यासाठी तो उपयुक्त आहे. त्यामुळेच T20 स्पेशालिस्ट म्हणून टीममध्ये आलेल्या हार्दिकला लवकरच टेस्ट टीममध्ये जागा मिळाली.

श्रीलंका विरुद्ध पहिल्या टेस्ट सीरिजमध्ये झळकावलेली सेंच्युरी, केपटाऊन टेस्टमध्ये टॉप ऑर्डर कोसळल्यानंतर केलेले 93 रन, चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमधील आक्रमक 76 रन, ऑस्ट्रेलिया विरुद्ध मागील वर्षी झालेल्या लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटच्या सीरिजमधील मॅच विनिंग खेळी या हार्दिकच्या बेडर वृत्तीची साक्ष आहेत. त्याचबरोबर बॉलिंगमध्येही हार्दिकनं यापूर्वी उपयुक्त योगदान दिलंय. बांगलादेश विरुद्ध 3 बॉलमध्ये 1 रन हवा असताना त्याने दाखवलेली जिगर कोण विसरेल?

दुखापतीनंतर सेटबॅक

हार्दिक पांड्याच्या करिअरला मागील वर्ल्ड कपनंतर झालेल्या दुखापतीमुळे मोठा सेटबॅक बसला आहे. त्या दुखापतीनंतर हार्दिक टीममध्ये परतला. पण, तो अजूनही स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या बॉलिंगवर याचा मोठा परिणाम झाला. जास्त ताण येऊ नये म्हणून त्यानं बॉलिंग करणे टाळले. त्यामुळेच त्याची टेस्ट टीममधील जागा गेली. आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2021) पहिल्या हाफामध्ये हार्दिक पांड्याची लय हरवली होती. श्रीलंका दौऱ्यातही तो फॉर्मसाठी झगडतोय.

उथळपणाचा शिक्का बसलेला हार्दिक पांड्या ठरला ‘बडा दिलवाला’!

आता भवितव्य काय?

टीम इंडियात प्रत्येक जागेसाठी स्पर्धा आहे. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा सध्या टीममधील निर्विवाद पहिल्या क्रमांकाचा ऑल राऊंडर आहे. हार्दिक पांड्याच्या जागेसाठी त्याचा भाऊ कृणाल पांड्या, दीपक चहर आणि शार्दूल ठाकूर हे तीन दावेदार आहेत. हार्दिकनं श्रीलंका दौऱ्यात बॉलिंग केलीय. पण अजूनही तो 5 ओव्हर्सपेक्षा जास्त बॉलिंग करु शकत नाही. त्याला मिळणारी विकेट ही बोनस बनली आहे.

हार्दिक पांड्या म्हणजे विराट कोहली किंवा रोहित शर्मा नाही. तो कायरन पोलार्डचा भारतीय टीममधील पर्याय आहे. शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये 40 रन काढण्यासाठी त्याच्या पॉवर हिटींगची टीमला गरज आहे. अटीतटीच्या लढतीत शेवटची ओव्हर टाकण्यासाठी त्याच्यासारखा बेडर वृत्तीचा बॉलर कॅप्टनला हवा आहे.

दीपक चहरचे करिअर ‘प्रकाश’मान करणारी इनिंग!

फॉर्म घसरलेला असूनही हार्दिक हा टीमसाठी एक महत्त्वाचा खेळाडू आहे. T20 क्रिकेट हा हार्दिकला मानवणारा प्रकार आहे. त्याने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये  41 विकेट्स घेतल्या आहेत.  रवींद्र जडेजा (39) आणि इराफान पठाण (28) पेक्षा त्याला जास्त विकेट्स आहेत. तो त्याच्या अन्य कोणत्याही पर्यायापेक्षा जास्त सिक्ल आणि अनुभवी खेळाडू आहे. फास्ट बॉलर्सच्या कारकिर्दीला दुखापतीमुळे बसणारा सेटबॅक ही क्रिकेटमध्ये नवी गोष्ट राहिलेली नाही. या दुखापतीनंतर पुन्हा भरारी घेता येते की नाही?  हा खरा प्रश्न आहे. हार्दिक पांड्यानं लवकरात लवकर याचं उत्तर शोधलं तर ते त्याच्या भवितव्यासाठी (Hardik Pandya Future) अधिक चांगलं असेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: