फोटो – सोशल मीडिया

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये पहिला बॉल पडण्यापूर्वीच सर्वांना धक्का बसला. वेस्ट इंडिजचा या मॅचमधील कॅप्टन निकोलस पूरन (Nicholas Pooran) याने टॉस जिंकत पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाची प्लेईंग 11 पाहता या मॅचमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल ही जोडी ओपनिंगला येईल, असा सर्वांना अंदाज होता. प्रत्यक्षात वेगळेच घडले. रोहितसोबत ऋषभ पंत (Rishabh Pant) ओपनिंगला आला. त्यावेळी अनेकांना हा योग्य निर्णय आहे का? याचा टीमवर काय परिणाम होईल? असा प्रश्न (Why Rishbah Pant Open) पडला.

ऋषभ पंतनं वन-डे मॅचमध्ये ओपनर म्हणून खेळण्याचा टीमवर दूरगामी परिणाम होणार आहे. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या जोडीनं हा निर्णय का घेतला? हे समजून घेतलं पाहिजे

पंतचा इतिहास

ऋषभ पंतला वन-डेमध्ये ओपनिंग करताना पाहून अनेकांना धक्का बसला. हे कसं घडलं? हा प्रश्न त्यांना पडला. त्या सर्वांनी पंतचा इतिहास समजून घेतला पाहिजे. ऋषभ पंतनं अंडर 19 टीममध्ये ओपनर म्हणून खेळ केला आहे. 2015 आणि 2016 या दोन वर्षामध्ये पंतनं ओपनर म्हणून 41.27 च्या सरासरीनं 454 रन केले आहेत. यामध्ये 1 सेंच्युरी आणि 4 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे.

2016 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये पंत टीम इंडियाचा ओपनर होता. त्याने वर्ल्ड कपमधील 6 इनिंगमध्ये 44.50 च्या सरासरीनं 267 रन केले. यामध्ये 1 सेंच्युरी आणि 2 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. विशेष म्हणजे पंतचा त्या वर्ल्ड कपमधील स्ट्राईक रेट 104.29 इतका होता. राहुल द्रविड (Rahul Dravid) अंडर 19 काळात पंतचा कोच होता. त्याने पंतचा ओपनर म्हणून खेळ जवळून पाहिला आहे. त्याने टीम इंडियाचा हेड कोच होताच त्याच प्रयोगाची सिनिअर टीममध्ये अंमलबजावणी (Why Rishbah Pant Open) केली.

पंत का आवश्यक?

वन-डे क्रिकेटमध्ये पहिल्या 10 ओव्हरमध्ये सांभाळून खेळ करणे ही टीम इंडियाची पद्धत आहे. या पद्धतीनं 50 ओव्हरमध्ये 300 रन होतील, पण आता वन-डे क्रिकेटमध्ये हे टार्गेट सेफ राहिलेलं नाही. टीम इंडियाला जास्तीत जास्त रन, पिचवरील परिस्थितीपेक्षा 20-25 जास्त रन करायचे असतील तर पहिल्या ओव्हरपासून आक्रमक खेळणारा बॅटर टीममध्ये हवा.

टीम इंडियाला आक्रमक सुरूवात करून देण्यासाठी ऋषभ पंतनं ओपनिंगला येणे आवश्यक आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन हे दोघंही सुरूवातीला सांभाळून खेळणारे बॅटर आहेत. त्यावेळी पहिल्या बॉलपासून आक्रमण करणारा ओपनर टीम इंडियाच्या गरजेचा आहे. ही गरज पंत पूर्ण (Why Rishbah Pant Open) करतो. तो डावखुरा असल्यानं ओपनिंगला उजवी आणि डावी ही जोडी ठेवण्याचा फॉर्म्युला देखील कायम राहतो.

केपटाऊनच्या खडतर पिचवर ऋषभ पंतची सेंच्युरी, टीम इंडियाला संधी

राहुलवर मोठी जबाबदारी

वन-डे टीममधील 4 नंबरच्या जागेवर कोण खेळणार हा गेल्या 4 वर्षांपासूनचा राष्ट्रीय प्रश्न आहे. त्यानंबरवर अनेक प्रयोग झाले. या सर्व प्रयोगात केएल राहुल (KL Rahul) हा योग्य पर्याय असल्याचं उत्तर मिळालं आहे.

राहुलचा चौथ्या आणि पाचव्या नंबरवरील स्ट्राईक रेट हा अनुक्रमे 41.80 आणि 56.82 इतका आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पाचव्या क्रमांकावर स्थिर होत असताना राहुल चौथ्या नंबरवर खेळणे हे टीम इंडियासाठी फायद्याचे आहे. पहिल्या बॉलपासून आक्रमक खेळणे, एक बाजू लावून धरणे, परिस्थितीनुसार एकाच इनिंगध्ये संयमी आणि आक्रमक खेळ करणे या सर्व गोष्टी राहुल करू शकतो. त्यामुळे राहुल चौथ्या क्रमांकावर खेळण्याचा अर्थ हा त्याचे डिमोशन नसून त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवणे हा आहे.

वन-डे पदार्पणात सेंच्युरी करणारा एकमेव भारतीय

नव्या टीम इंडियाची तयारी

सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि सध्याचा कॅप्टन रोहित शर्मा या सर्वांच्या कारकिर्दीमध्ये एक समानता आहे. मिडल ऑर्डरमध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्द सुरू करणाऱ्या या तिघांच्याही करिअरला त्यांनी ओपनर म्हणून आल्यानंतर भरारी मिळाली. त्याचा टीमलाही फायदा झाला.

ऋषभ पंतला ओपनिंगला पाठवण्याचा मॅनेजमेंटचा निर्णय देखील याच प्रकारातील आहे. पंतला ओपनर म्हणून दीर्घकाळ संधी दिली तर त्याचा नक्कीच फायदा होईल. आगामी वर्ल्ड कपसाठी (Cricket World Cup 2023)  हा निर्णय महत्त्वाचा आहे. रोहित-पंत ओपनर, विराट-राहुल-सूर्या ही मिडल ऑर्डर आणि फिनिशर म्हणून सुंदर-हार्दिक-जडेजा ही टीम इंडियाच्या वन-डे टीमची टेम्पलेट (Why Rishbah Pant Open) होऊ शकते. दीपक हुडाच्या आधी सुंदरला बॅटींग करण्यास पाठवण्याचा दुसऱ्या वन-डेमधील निर्णय हा टीम मॅनेजमेंट देखील याच दिशेनं विचार करत असल्याचं उदाहरण आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: