
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील वन-डे आणि T20 सीरिजसाठी रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) या 21 वर्षांच्या तरूण लेग स्पिनरची टीममध्ये निवड झाली आहे. आधी अंडर 19 वर्ल्ड कप नंतर आयपीएल स्पर्धा गाजवून रवी आता टीम इंडियात दाखल झाला आहे. अंडर-19 वर्ल्ड कप 2020 (Under 19 World Cup 2020) टीममधून सिनिअर टीममध्ये आलेला तो पहिला खेळाडू आहे. रवीचा हा प्रवास सरळ झालेला (Ravi Bishnoi Story) नाही. अनेक अडचणींवर मात करत त्यानं टीम इंडियात जागा मिळवली आहे.
कष्टावाचून फळ नाही!
‘कष्टावाचून फळ नाही’, ही म्हण रवी बिश्नोईचा प्रवास पाहिल्यावर आपल्याला पुन्हा एकदा पटते. रवी राजस्थानमधील जोधपूरचा.चार भावंडामधील सर्वात लहान. क्रिकेटपटू होणे हे एकच त्याचं स्वप्न होतं. त्याच्या गावात पिच नव्हते. तर शेतात त्याने कष्ट करत स्वत:साठी पिच तयार केले. त्या ठिकाणी तो सराव करत असे.
टीम इंडियाच्या स्पिन बॉलिंगचं भविष्य मानल्या जाणाऱ्या रवीला सुरूवातीला फास्ट बॉलर व्हायचं होतं. पण त्याची उंची लक्षात घेऊन कोचनं त्याला स्पिन बॉलर होण्याचा सल्ला दिला. अंडर 19 वर्ल्ड कप टीममध्ये निवड होण्यापूर्वी त्याने अनेक नकार पचवले (Ravi Bishnoi Story) आहेत.
कोरोनामुळे वडील गेले, पण जिद्द नाही… तुळजापूरच्या पोरावर जग जिंकण्याची जबाबदारी
रिजेक्शन, रिजेक्शन आणि रिजेक्शन
रवी पहिल्यांदा राजस्थानच्या अंडर 16 टीमच्या ट्रायलमध्ये रिजेक्ट झाला. राजस्थानच्या अंडर 19 टीमच्या ट्रायलमध्ये तो दोन वेळा अपयशी ठरला. दुसऱ्यांदा अपयशी झाल्यानंतर त्यानं क्रिकेट सोडून शेतीमध्ये मजूरी करण्याचे ठरवले. पण, क्रिकेटची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.
2018 साली त्याच्या बोर्डाच्या परीक्षा होत्या त्याच काळात राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) नेट बॉलर्सची ट्रायल होती. रवीनं परीक्षा द्यावी, अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावं अशी त्याच्या वडिलांची आणि शाळेतील शिक्षकांची इच्छा होती. पण, रवीचं ध्येय क्रिकेटपटू होणे हेच होते. त्यानं बोर्डाची परीक्षा न देता ट्रायल देण्याचा निर्णय घेतला.
वर्ल्ड कपमध्ये अव्वल
विनू मंकड स्पर्धेतील पहिल्याच मॅचमध्ये 5 विकेट्स घेत रवीनं सर्वांचं लक्ष वेधलं. त्या स्पर्धेतील दमदार कामगिरीमुळे 2020 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप टीममध्ये त्याची निवड (Ravi Bishnoi Story) झाली. तो वर्ल्ड कप रवीने गाजवला.
रवीनं 6 मॅचमध्ये फक्त 3.48 च्या इकोऩॉमी रेटनं सर्वात जास्त 17 विकेट्स घेतल्या. बांगलादेश विरुद्ध झालेल्या फायनलमध्येही त्यानं 10 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स घेत टीम इंडियाला जिंकवण्याचे आटोकाट प्रयत्न केले होते.
IPL मध्ये चमकला
रवी बिश्नोईला आयपीएल 2020 मधील लिलावात (IPL 2020 Auction) बेस प्राईजच्या 10 पट जास्त म्हणजेच 2 कोटींमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबनं (तेव्हाचे नाव) करारबद्ध केले. पंजाबचा हेड कोच आणि महान लेग स्पिनर अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनखाली त्याची बॉलिंग आणखी बहरली.
रवी पहिल्याच आयपीएलमध्ये पंजाबचा मुख्य स्पिनर बनला. त्याने त्या सिझनमध्ये 12 विकेट्स घेतल्या. मागील वर्षी झालेल्या आयपीएलमध्येही त्याने अधिक चांगल्या स्ट्राईक रेट आणि इकोनॉमी रेटसह कमी मॅचमध्ये 12 विकेट्स घेतल्या. त्याची ही कामगिरी पाहून लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) टीमनं त्याला 4 कोटी रूपये देत आयपीएल लिलावापूर्वीच टॉप 3 प्लेयरमध्ये करारबद्ध केले आहे.
कॅप्टन रोहित शर्माचं पुनरागमन, 3 नव्या खेळाडूंचा टीममध्ये समावेश
बिश्नोई का महत्त्वाचा?
T20 वर्ल्ड कप आणि आफ्रिका दौऱ्यात भारतीय स्पिनर्सनी निराशा केली. मधल्या ओव्हर्समध्ये विकेट घेण्यात आलेलं अपयश हे आफ्रिकेतील पराभवाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. बिश्नोईनं फास्ट बॉलर म्हणून कारकिर्दीची सुरूवात केली आहे. त्यामुळे त्याच्या बॉलिंगचा वेग अन्य स्पिनर्सपेक्षा जास्त आहे.
बिश्नोई या वेगाच्या जोरावर राशिद खान प्रमाणे बॅटर्सना लवकर चकवू शकतो. त्याच्याकडे गुगली हे अगदी प्रभावी अस्त्र आहे. तसंच तो एखादी ओव्हर महाग गेली तरी हार न मानता पुढच्या ओव्हरमध्ये अधिक आक्रमकपणे विकेट घेण्याचा प्रयत्न करतो, हे आपण पाहिलं आहे. टीम इंडियासाठी कोडं होत असलेली मिडल ओव्हर्समधील विकेट कोंडी फोडण्यासाठी बिश्नोई महत्त्वाचा आहे.
एक ध्येय डोळ्यासमोर ठेवत त्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करत रवी बिश्नोईनं टीम इंडियातील जागा पटकावली आहे. त्याच्या स्वप्नांची ही पूर्तता नाही तर आता खऱ्या अर्थाने सुरूवात (Ravi Bishnoi Story) झाली आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.