फोटो, ट्विटर

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील वन-डे आणि T20 सीरिजसाठी टीम इंडियाची निवड जाहीर झाली आहे. या टीममध्ये कॅप्टन रोहित शर्माचं (Rohit Sharma) पुनरागमन झालं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पराभवानंतर टीममध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या टीममध्ये कुलदीप यादवचे पुनरागमन झाले असून रवी बिश्नोईला पहिल्यांदाच संधी (Kuldeep, Bishnoi in Team India) मिळाली आहे. या दोघांचीही वन-डे टीममध्ये निवड झाली आहे. वन-डे टीममध्ये दीपक हुडा (Deepak Hooda) हा देखील नवा चेहरा आहे.

रोहित शर्माचं पुनरागमन

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टेस्ट टीमची घोषणा झाल्यानंतर रोहित जखमी झाला होता. त्यामुळे तो आफ्रिका दौऱ्यावर गेला नव्हता. रोहित आता फिट असून त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधील (NCA) फिटनेस टेस्ट देखील पास केली केली आहे. त्यामुळे स्वाभाविकच रोहित कॅप्टन म्हणून टीममध्ये परतला आहे. रोहित टीममध्ये परतल्याने केएल राहुल (KL Rahul) टीमचा व्हाईस कॅप्टन असेल. राहुल दुसऱ्या वन-डेपासून टीमसोबत असेल असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

कुलदीप, बिश्नोईला संधी!

वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरिजसाठी नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. निवड समितीनं रवी बिश्नोईला (Ravi Bishnoi) या तरूण लेग स्पिनरला पहिल्यांदाच संधी दिली आहे. बिश्नोईनं आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज (Punjab Kings) कडून 23 मॅचमध्ये 24 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला नुकतेच लखनौ सुपर जायंट्सनं ड्राफ्टमध्ये करारबद्ध केले आहे.

कुलदीप यादवचा (Kuldeep Yadav) टीममधील समावेश आश्चर्यकारक मानला जात आहे. कुलदीपचा गेल्या 3 वर्षाातील फॉर्म समाधानकारक नाही. तसेच तो दुखापतीमुळे काही महिने क्रिकेटपासून दूर होता. तरीही रोहितच्या आग्रहामुळे त्याचा टीममध्ये समावेश झाला आहे. कुलदीपची T20 क्रिकेटमधील आकडेवारी कमाल आहे त्याने 23 मॅचमध्ये 41 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 65 वन-डेमध्ये 107 विकेट्स त्याच्या नावावर (Kuldeep, Bishnoi in Team India) आहेत.

बुमराहला विश्रांती

टीम इंडियाचा अव्वल फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरिजसाठी विश्रांती दिली आहे. बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सर्व मॅच खेळला. वेस्ट इंडिज सीरिजनंतर श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया 2 टेस्ट खेळणार आहे. ती सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी (World Test Championship) महत्त्वाची असल्याने बुमहाला वेस्ट इंडिज विरूद्ध विश्रांती देण्यात आली आहे.

बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये मोहम्मद शमी (Mohammed Shami) भारतीय बॉलिंग अटॅकचे नेतृत्त्व करेल असा अंदाज होता पण, त्याला विश्रांती देण्यात आली आहे. शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, दीपक चहर या त्रिकुटाकडे टीम इंडियाच्या बॉलिंगची धुरा असेल. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल स्पर्धा गाजवणाऱ्या आवेश खानला (Avesh Khan) दोन्ही टीममध्ये संधी देण्यात आली असून हर्षल पटेलचा T20 टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

IND vs WI: टीम इंडियाची निवड करताना शोधावी लागणार 5 प्रश्नांची उत्तरं

भुवनेश्वर आणि अश्विन

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि आर. अश्विन (R. Ashwin) या अनुभवी बॉलर्ससाठी दक्षिण आफ्रिकेतील वन-डे सीरिज निराशाजनक गेली होती. या दोघांनी मिळून सीरिजमध्ये फक्त 1 विकेट घेतली. वेस्ट इंडिज विरूद्धच्या सीरिजमध्ये या अनुभवी बॉलर्सना जागा मिळालेली नाही. यापैकी अश्विनसला फिटनेसच्या कारणामुळे विश्रांती देण्यात आल्याची माहिती आहे. तर भुवनेश्वरला फक्त T20 टीममध्ये जागा देण्यात आली आहे.

अश्विनच्या अनुपस्थितीमध्ये वॉशिंग्टन सुंदरचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. सुंदरला कोरोनाची लागण झाल्यानं आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये खेळता आलं नव्हतं. त्याचबरोबर युजवेंद्र चहल हा लेगस्पिनर देखील टीममध्ये आहे. वन-डे सीरिजमध्ये कुलदीप आणि चहल यांची कुलचा जोडी मैदानात एकत्र दिसणार आहे.

‘त्या’ दोघांकडे पुन्हा दुर्लक्ष

देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या दोन खेळाडूंकडे निवड समितीनं पुन्हा एकदा दुर्लक्ष केले आहे तामिळनाडूचा आक्रमक बॅटर शाहरूख खानने (Shah Rukh Khan) शाहरूखनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये तामिळनाडूला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 5 रन हवे असताना सिक्स लगावत विजेतेपद मिळवून दिले होते. टीम इंडियाला असलेली फिनिशर्सची गरज शाहरूख पूर्ण करू शकतो.

हिमाचल प्रदेशला विजय हजारे स्पर्धेचं (Vijay Hazare Trophy 2021) ऐतिहासिक विजेतेपद मिळवून देण्यात धवनच्या कामगिरीचा मोठा वाटा होता. त्याने स्पर्धेतील 8 मॅचमध्ये 76.33 च्या सरासरीनं 458 रन केले. त्याचबरोबर 6 च्या इकोनॉमी रेटनं 17 विकेट घेतल्या. या सर्व कामगिरीनंतरही निवड समितीनं या दोघांकडे दुर्लक्ष (Kuldeep, Bishnoi in Team India) केले आहे.

5 वर्षांपासून मिळाली नाही संधी, 17 विकेट्स आणि 458 रनसह बनला चॅम्पियन

वेस्ट इंडिज सीरिजसाठी टीम इंडिया

वन-डे टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान

T20 टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: