फोटो – बीसीसीआय

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील वन-डे आणि T20 सीरिजसाठी टीम इंडियाची निवड झाली आहे. भारतीय टीमची निवड करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमधील हा महत्त्वाचा निकष आहे, असा समज आहे. पण, गेल्या काही सीरिजमधील निवडीनंतर हा निकष बदलल्याचे स्पष्ट झाले आहे. काही महिन्यांपूर्वी देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या दोन खेळाडूंकडे बीसीसीआयनं दुर्लक्ष (BCCI ignores 2 Players) केले आहे.

17 विकेट्स 458 रननंतरही संधी नाही

हिमाचल प्रदेशनं (Himachal Pradesh) सर्व दिग्गज टीमना धक्का देत विजय हजारे स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली. या कामगिरीत कॅप्टन ऋषी धवनचा (Rishi Dhawan) सिंहाचा वाटा होता.

ऋषी धवननं या स्पर्धेतील 8 मॅचमध्ये 76.73 च्या सरासरीनं 458 रन केले. यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे. संपूर्ण स्पर्धेत मिडल ऑर्डरमध्ये खेळणाऱ्या धवननं नेहमीच टीमचा रनरेट कसा वाढेल याची काळजी घेतली. त्याचा 127.22 हा त्याचा स्ट्राईक त्याची साक्ष आहे.

विजय हजारे स्पर्धेत सर्वाधिक रन करणाऱ्यांच्या यादीत धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर स्ट्राईक रेटमध्ये टॉप 5 बॅटरमध्ये तो पहिल्या क्रमांकावर असून टॉप 20 बॅटर्सच्या यादीत त्याच्यापेक्षा फक्त एक जण (व्यंकेटश अय्यर) पुढे आहे.

कॅप्टन रोहित शर्माचं पुनरागमन, 3 नव्या खेळाडूंचा टीममध्ये समावेश

ऋषी धवन सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत देखील दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 8 मॅचमध्ये 6 च्या इकोनॉमी रेटनं 17 विकेट्स घेतल्या आहेत. ही सर्व कामगिरी (Rishi Dhawan Performance) त्यानं कॅप्टनशिपचं ओझं सांभाळून केली आहे. टीमचा अनुभवी खेळाडू, कॅप्टन कसा असावा याचं उदाहरण धवननं या स्पर्धेत दाखवून दिले होते.

वन-डे टीममधील फिनिशर्सच्या शोधात टीम इंडिया आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीमच्या बाहेर आहे, तर व्यंकटेश अय्यरला वन-डे टीममध्ये खेळवण्याचा प्रयोग आफ्रिकेत यशस्वी झाला नाही. त्या परिस्थितीमध्ये धवनकची टीममध्ये निवड व्हायला हवी होती. बॅटींग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये धवन गरज पूर्ण करतो. पण निवड समितीनं त्याच्याकडे दुर्लक्ष केले. एका आयपीएल सिझनमधील कामगिरीमुळे व्यंकटेश अय्यरला घेणाऱ्या निवड समितीनं ऋषी धवनचा दक्षिण आफ्रिका पाठोपाठ वेस्ट इंडिज विरूद्धच्या टीममध्येही समावेश केलेला (BCCI ignores 2 Players) नाही.

शाहरूख खानकडे दुर्लक्ष

लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये 150 च्या स्ट्राईक रेटनं बॅटींग करणारा खेळाडू हा अगदी सोनं मानला जातो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूचा आक्रमक बॅटर शाहरूख खान हे काम सातत्याने करत आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या (SMT Final 2021) फायनलमध्ये तामिळनाडूला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 5 रनची गरज होती. त्यावेळी शाहरूख खाननं सिक्स लगावत विजेतेपद मिळवून दिले होते.

शाहरूखनं मुश्ताक अली स्पर्धेत 157.81 आणि विजय हजारे स्पर्धेत (Vijay Hazare Trophy) 186.02 च्या स्ट्राईक रेटनं रन केले होते. तामिळनाडूकडून शेवटच्या ओव्हर्समध्ये सातत्याने फिनिशर्सची समर्थ भूमिका करणाऱ्या शाहरूखचा या दौऱ्यासाठी विचार झालेला नाही.

शाहरूख खानचा आणखी एक ‘सुपरहिट शो’, 13 बॉलमध्ये काढले 64 रन

दक्षिण आफ्रिका विरूधच्या वन-डे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा विजय हजारे स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेऊन केली जाईल असे निवड समितीने स्पष्ट केले होते. पण आफ्रिकेनंतर आता वेस्ट इंडिज विरूद्धच्या सीरिजमध्यही बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीकडे दुर्लक्ष केले आहे. ऋषी धवन आणि शाहरूख खान यांना चांगल्या कामगिरीनंतरही या धोरणाचा फटका (BCCI ignores 2 Players) बसला आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: