फोटो – ट्विटर, बीसीसीआय

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील 3 वन-डे आणि तितक्याच T20  मॅचची सीरिज फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. होम ग्राऊंडवर होणाऱ्या या सीरिजपूर्वी टीम इंडियाचे पारडे जड आहे. पण, तसे ते पारडे दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सीरिजपूर्वीही (India vs South Africa) जड होते. त्यामुळे अनिश्चित खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि धोकादायक खेळाडूंच्या वेस्ट इंडिज टीम विरूदध निवड समितीला संपूर्ण क्षमतेची टीम निवडावी लागणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियाची निवड करताना (West Indies Series Selection) 5 प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार आहेत.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात काय चुकले?

टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यात विजयाची प्रबळ दावेदार होती. पण प्रत्यक्षात आफ्रिकेच्या नवख्या टीमनं वन-डे सीरिजमध्ये 3-0 या फरकाने टीमचा पराभव केला. या दौऱ्यात भारतीय बॅटर्सना निर्णायक क्षणी खेळ उंचावण्यात अपयश आले. बॉलर्सना मिडल ओव्हर्समध्ये विकेट मिळाल्या नाहीत. केएल राहुलच्या (KL Rahul) कॅप्टनसीमध्ये स्पार्क नव्हता.  

आफ्रिकेतील पराभवाची ही काही प्रमुख कारणं दिली जात आहेत. यापैकी किती कारणं खरी आहेत? आणखी कोणती वेगळी कारणं या पराभवाला कारणीभूत आहेत का? या विषयावर निवड समितीला हेड कोच राहुल द्रविडसोबत (Rahul Dravid) बसून उत्तर शोधावं लागणार आहे.

टीम निवडीचं पंचवार्षिक दुखणं, द्रविड कधी देणार कडू गोळी?

रोहित शर्मा फिट आहे?

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टेस्ट टीमची निवड झाल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतग्रस्त झाला. तो आफ्रिकेत गेलाच नाही. रोहित शर्मा वेस्ट इंडिज दौऱ्यात परत येईल असे मानले जात आहे. रोहितच्या फिटनेसचं अपडेट निवड समिताला घ्यावं लागेल.

रोहितच्या कॅप्टनसीमध्ये आगामी काळातील 2 वर्ल्ड कपची तयारी या दौऱ्यापासून सुरू होईल. या तयारीसाठी कॅप्टन रोहित शर्माचा फिटनेस महत्त्वाचा आहे. तो या काळात फिट राहावा म्हणून कराव्या लागणाऱ्या उपायांवर निवड समितीला चर्चा (West Indies Series Selection) करावी लागणार आहे.

धवन-राहुलची जागा कुठे?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये शिखर धवननं (Shikhar Dhawan) समाधानकारक कामगिरी केली. रोहित शर्मा परत आल्यावर ओपनिंगला त्याच्यासोबत धवन खेळणार की राहुल? हा निवड समितीसमोर प्रश्न असेल. राहुलला पुन्हा एकदा मिडल ऑर्डरमध्ये खेळवल्यास श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवपैकी कोण प्लेईंग 11 मध्ये खेळेल हा देखील एक प्रश्न आहे.

बुमराहला आराम मिळणार?

जसप्रीत बुमराह आफ्रिका सीरिजमधील सर्व मॅच खेळला. आगामी टेस्ट सीरिजचा विचार करता त्याला वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरिजमध्ये विश्रांती देण्याच्या प्रश्नावर निवड समितीच्या बैठकीत चर्चा होईल. बुमराहाला विश्रांती दिल्यास मोहम्मद शमीला त्याच्या जागेवर परत आणायचे की शार्दूल ठाकूर आणि दीपक चहर या जोडीवर विश्वास ठेवायचा हा निवड समितीसमोर महत्त्वाचा प्रश्न (West Indies Series Selection) आहे.

आफ्रिकेविरुद्ध तळपला ‘दीपक’, तेजस्वी खेळानंतरही पराभव झाल्यानं अश्रू अनावर

अश्विन-भुवनेश्वरचे करिअर

आर. अश्विन आणि भुवनेश्वर कुमार या दोन सिनिअर बॉलर्सनी आफ्रिकेतील वन-डे सीरिजमध्ये साफ निराश केले. साडे चार वर्षांनी वन-डे टीममध्ये परतलेल्या अश्विनला फक्त 1 विकेट मिळाली. तर भुवनेश्वर कुमारची पाटी कोरीच राहिली. दोघांनाही तिसऱ्या वन-डेमधून वगळण्यात आले होते. अश्विन आणि भुवनेश्वरच्या लिमिटेड ओव्हर्समधील करिअरवर निवड समितीच्या बैठकीत विचार होईल. या सीरिजसाठी अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज फिट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोघांचा सीनिअर बॉलर्सच्या जागेवर समावेश होऊ शकतो.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: