फोटो – ट्विटर/ICC

खेळाडूंच्या मर्यादीत कारकिर्दीमध्ये काही महिने देखील निर्णायक ठरतात. भारतीय महिला टीम (Indian Women Team) तर तब्बल 7 वर्षांनी  टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी उतरली होती. या टेस्टमध्ये 5 भारतीय खेळाडूंनी पदार्पण केले. याचाच अर्थ जवळपास निम्मी टीम पहिल्यांदाच टेस्ट क्रिकेटमध्ये खेळत होती. नवी टीम, 7 वर्षांचा गॅप, इंग्लंडमधील आव्हानात्मक वातावरण आणि पहिल्या इनिंगमध्ये मिळालेला फॉलो ऑन या सर्व आव्हांनावर टीम इंडियानं मात करत इंग्लंड विरुद्धची (England Women) एकमेव टेस्ट ड्रॉ करण्याची अभिमानास्पद (Inspirational Draw) कामगिरी केली आहे.

पहिल्या इनिंगमधील पडझड

टीम इंडियानं पहिल्या इनिंगमधील पडझडीनंतर दुसऱ्या इनिंगमध्ये जोरदार कमबॅक केले. पहिल्या इनिंगमध्ये शफली वर्मा (Shafali Verma) आणि स्मृती मंधाना (Smriti Mandhana) या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 167 रनची पार्टनरशिप केली. 17 व्या वर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शफालीची सेंच्युरी फक्त 4 रननं हुकली. ती आऊट झाल्यानंतर टीम इंडियाची जोरदार घसरगुंडी उडाली.

भारतीय टीमनं 14.2 ओव्हर्समध्ये फक्त 20 रनच्या मोबदल्यात 7 विकेट्स गमावल्या. दीप्ती शर्मा (Deepti Sharma) या एकमेव मिडल ऑर्डरच्या बॅटरनं 4 पेक्षा जास्त रन काढले. भारतीय टीमला फॉलो ऑन टाळण्यात अपयश आले. पहिल्या इनिंगमध्ये 165 रननं पिछाडीवर असलेल्या टीमकडून मोठ्या अपेक्षा कुणालाच नव्हत्या.

17 व्या वर्षीच महिला क्रिकेटमधील सुपरस्टार बनलेली शफाली वर्मा कोण आहे?

शफाली-दीप्ती शो

दुसऱ्या इनिंगमध्ये स्मृती मंधाना झटपट आऊट झाल्यानंतर पहिल्या इनिंगमध्ये प्रतिकार करणाऱ्या दीप्तीला 3 नंबरवर पाठवण्याची टीम मॅनेजमेंटची चाल यशस्वी ठरली. आक्रमक शफालीला दीप्तीनं भक्कम पाठिंबा दिला. दीप्तीनं सुरुवातीच्या 44 बॉलमध्ये फक्त 1 रन काढला होता. टेस्ट वाचवण्यासाठी खेळणाऱ्या कोणत्याही दिग्गज क्रिकेटपटूला अभिमान वाटावा असा दीप्तीचा बचावात्मक खेळ (Inspirational Draw) होता.

दीप्तीनं एक बाजू लावून धरली असल्यानं शफाली नैसर्गिक खेळ करु शकली. तिनं दुसऱ्या इनिंगमध्येही हाफ सेंच्युरी केली. पदार्पणातील टेस्टमध्ये दोन्ही इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी करणारी शफाली वर्मा ही सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्यानंतरची दुसरी भारतीय आहे. शफालीनं 83 बॉलमध्ये 63 रन काढले.

शफालीनंतर प्रतिकार पण…

शफाली आऊट झाल्यानंतर पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाची घसरगुंडी उडाली होती. यावेळी दीप्ती शर्मा आणि पुनम राऊत (Punam Raut) जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 72 रनची पार्टरनरशिप केली. यावेळी या जोडीनं जवळपास 18 ओव्हर्स खेळून काढल्या. शफाली प्रमाणेच पहिली टेस्ट खेळणाऱ्या दीप्तीनं आव्हानात्मक परिस्थितीमध्ये संयमी बॅटींग करत हाफ सेंच्युरी झळकावली. दीप्ती लंचपूर्वीच्या शेवटच्या बॉलवर 54 रन कढून आऊट झाली. दीप्ती आऊट झाली तेव्हा टीम इंडियाकडे फक्त 6 रनची आघाडी होती.

दीप्ती आऊट झाल्यानंतर टीम इंडियाची पुन्हा घसरगुंडी उडाली. भारताने 6.4 ओव्हर्समध्ये फक्त 4 रनच्या मोबदल्यात 3 विकेट्स गमावल्या. त्यावेळी ब्रिस्टलच्या मैदानात पावसाचे नाही तर भारताच्या पराभवाचे काळे ढग जमा झाले होते. पहिल्या इनिंगमध्ये 10 व्या क्रमांकावर खेळलेली नवोदीत पूजा वस्त्राकाराला 7 व्या नंबरवर प्रमोशन देण्यात आले. पूजा 12 रन काढून आऊट झाली. त्यानंतर हरमनप्रीत कौर 8 रन काढून आऊट झाल्यानंतर टीम इंडियाची अवस्था 7 आऊट 199 अशी बिकट झाली होती.

स्नेह राणाची कमाल

स्नेह राणा (Sneh Rana) शफाली, दीप्ती आणि पूजा प्रमाणे या टेस्टमध्ये पदार्पण करणारी चौथी भारतीय. बॉलिंग ऑलराऊंडर असलेल्या पंजाबच्या स्नेहनं पहिल्या इनिंगमध्ये अचूक मारा करत 4 विकेट्स घेतल्या. जवळपास 40 ओव्हर्स बॉलिंग करत मोठे स्पेल टाकण्याची क्षमता सिद्ध केली. त्यानंतर शेवटच्या दिवशी स्नेहनं मॅच वाचवणारी (Inspirational Draw) बॅटींग केली.

स्नेह राणा आणि शिखा पांडे (Shikha Pandey) या जोडीनं आठव्या विकेटसाठी 41 रनची पार्टरनरशिप करत प्रतिकार केला. शिखा आऊट झाल्यानंतर या मॅचमध्ये पदार्पण करणारी पाचवी आणि शेवटची भारतीय खेळाडू तानिया भाटीया (Taniya Bhatia) मैदानात उतरली.

स्नेह-तानिया या दोघींचीही पहिली टेस्ट होती. टेस्ट मॅच खेळण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मोठी प्रतीक्षा केली होती. पहिल्याच टेस्टमध्ये टीम इंडिया पराभूत होणे त्यांना मान्य नव्हते. दोघींनी 9 व्या विकेट्ससाठी 104 रनची नाबाद पार्टरनरशिप केली. दोन्ही टीमनं मॅच ड्रॉ करण्यावर (Inspirational Draw) सहमती दाखवली तेव्हा स्नेह 80 तर तानिया 44 रन काढून नाबाद होत्या. इंग्लंडकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सोफी एक्लेस्टोननं या टेस्टमध्ये 8 विकेट्स घेतल्या.

चेतेश्वर पुजारा, भारतीय टीमच्या भव्य इमारतीचे घाव सोसणारा पाया

भारतीय महिला टीमनं सर्व आव्हानांवर मात करत ही टेस्ट ड्रॉ (Inspirational Draw) केली. सर्व नवोदीत खेळाडूंनी या टेस्टमध्ये चांगला खेळ करत टीमचा पराभव रोखला. त्याबद्दल या सर्व खेळाडूंची प्रशंसा करतानाच महिला टीमच्या या कामगिरीचा आपण अभिमान बाळगायला हवा.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: