फोटो – सोशल मीडिया

टीम इंडियामध्ये (Team India) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले वाद काही संपत नाहीत. विराट कोहलीला (Virat Kohli) वन-डे टीमच्या कॅप्टनसीवरून काढल्यानंतर भारतीय क्रिकेटमधील अस्वस्थता बाहेर आली आहे. विराटनं दक्षिण आफ्रिकेत जाण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वादग्रस्त वक्तव्यं केले होते. त्यामधून विराट आणि निवड समिती, विराट आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यातील विसंवाद समोर आला होता. आता हे प्रकरण शांत होण्यापूर्वी टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विननं (Ravichandran Ashwin) माजी कोच रवी शास्त्रींच्या वागणुकीवर (Ashwin on Shastri) गंभीर आरोप करत त्याच्या मनातील व्यथा बोलून दाखवली आहे.

अश्विनला दुय्यम वागणूक

आर. अश्विन टेस्ट क्रिकेटमधील टीम इंडियाचा सर्वात यशस्वी ऑफ स्पिनर आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजमध्ये त्याने हरभजन सिंगला मागे टाकत हा रेकॉर्ड केला आहे. त्याचबरोबर या कॅलेंडर वर्षात (2021) टेस्टमध्ये 50 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा अश्विन हा एकमेव बॉलर आहे. या वर्षी जबरदस्त फॉर्मात असलेल्या अश्विनला इंग्लंड दौऱ्यातील सीरिजमध्ये (India Tour Of England) 4 पैकी एकाही टेस्टमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

अश्विनला विदेशात नियमित संधी मिळालीच नाही. सध्याच्या टीममधील सर्वाधिक यशस्वी बॉलर असूनही त्याची टीममधील जागा नक्की नसते, असे आरोप यापूर्वी देखील झाले आहेत. त्यानंतर अश्विननं पहिल्यांदाच एका मुलाखतीमध्ये या विषयावर मनातील व्यथा बोलून दाखवली असून त्याने टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्रींकडं बोट दाखवलं (Ashwin on Shastri) आहे.

विराटनं बाहेर बसवलेल्या बॉलरच्या वर्षभरात 50 विकेट्स पूर्ण, सेंच्युरीही झळकावली

काय म्हणाला अश्विन?

अश्विननं ‘इएसपीएन क्रिकइन्फो’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे आरोप केले आहेत. 2018 साली झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपण खूप निराश होतो. मला एकटं सोडून देण्यात आलं आहे, असं वाटत होतं असे अश्विनने म्हंटले आहे. त्या दौऱ्यातील सिडनी टेस्टमध्ये 5 विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादव (Kuldeep Yadav) बद्दल शास्त्रींनी केलेल्या वक्तव्याचा या सर्व गोष्टींशी संदर्भ आहे.

‘मला रवी भाईंबद्दल (शास्त्री) खूप आदर आहे. आमच्या सर्वांचीच ती भावना आहे. पण, त्यावेळी मला खूप हतबल वाटत होते. टीमचं यश सर्वांनी एकत्र साजरं केलं पाहिजे, असं आपण नेहमी म्हणतो. मी कुलदीपसाठी खूश होतो. मला एका इनिंगमध्ये 5 विकेट्स (ऑस्ट्रेलियातील पिचवर) घेता आलेल्या नाहीत. ही किती मोठी गोष्ट आहे याची मला कल्पना आहे.

मी अनेकदा चांगली बॉलिंग केली, पण मला 5 विकेट्स मिळाल्या नाहीत. त्यामुळे मी कुलदीपसाठी खूश होतो. ऑस्ट्रेलियात जिंकणे ही देखील खूप आनंदाची गोष्ट होती.टीमच्या आनंदात आणि यशात सहभागी होत असताना मी त्या टीमचा घटक आहे, असं मला वाटलं पाहिजे. पण, मला एकटं सोडण्यात आले होते. त्या परिस्थितीमध्ये मी टीममधील सहकारी खेळाडूच्या यशाची पार्टी कशी एन्जॉय करेल?   

मी माझ्या खोलीत गेलो. माझ्या बायकोशी चर्चा केली. माझी मुलं देखील तिथंच होते. मी त्या गोष्टी तिथंच सोडून देण्याचं ठरवलं आणि पुन्हा पार्टीला गेलो. कारण, आम्ही एक मोठी सीरिज जिंकली होती.’ असे अश्विनने शास्त्रींनी दिलेल्या वागणुकीबद्दल (Ashwin on Shastri) सांगितले.

काय म्हणाले होते शास्त्री?

सिडनी टेस्टनंतर कुलदीप यादव हा आमचा विदेशातील बेस्ट स्पिनर असल्याचं वक्तव्य शास्त्रींनी केले होते. पण, प्रत्यक्षात शास्त्री आणि टीम मॅनेजमेंटनं नंतर कुलदीपला विदेशातील टेस्ट क्रिकेटमध्ये सिडनीनंतर संधीच दिली नाही.

मागील वर्षी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय खेळाडू एकापाठोपाठ जखमी होत होते. तरीही कुलदीपला खेळवण्यात आले नाही. जानेवारी 2019 मध्ये झालेल्या त्या टेस्टनंतर आजवर कुलदीप टीम इंडियाकडून फक्त एक टेस्ट आणि ती देखील भारतामध्ये खेळला आहे. सध्या कुलदीपचा फॉर्म हरपला असून तो टीममध्ये कमबॅक करण्यासाठी संघर्ष करत आहे.

कोचच्या रागातून बदलली बॉलिंग अ‍ॅक्शन, टीम इंडियाच्या Hat-trick King ला आत्मविश्वासाची गरज

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: