फोटो – BCCI

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच (BCCI) ची वर्षातील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे IPL. ही स्पर्धा म्हणजे BCCI च्या वार्षिक महसुलीचं मोठं माध्यम आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनासाठी आणि त्याच्या यशस्वीतेसाठी BCCI कडून कोणतीही कसर ठेवली जात नाही. मागच्या वर्षी कोव्हीड-19 मुळे ही स्पर्धा भारतामध्ये घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे BCCI नं ही स्पर्धा UAE मध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2020 या कालावधीमध्ये ही स्पर्धा UAE मध्ये पार पडली

IPL 2021 चे पडघम

IPL 2020 संपण्यापूर्वीच पुढील आयपीएलचे म्हणजेच IPL 2021 चे पडघम वाजू लागले होते. या स्पर्धेत 8, 9 की 10 टीम खेळणार? संपूर्ण ऑक्शन होणार की मिनी ऑक्शन होणार? स्पर्धा भारतामध्ये होणार की अन्यत्र होणार? यावर वेगवेगळे तर्क लढवले जात होते. त्याबद्दलच्या उलट-सुलट बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या. अखेर BCCI च्या डिसेंबरच्या शेवटी झालेल्या बैठकीत याबाबतचं अंतिम निर्णय घेण्यात आले.

IPL 2021 मध्ये 10 नाही तर 8 टीम खेळणार आहेत. पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये होणारी IPL स्पर्धा ही 10 टीममध्ये खेळवली जाईल. यंदा खेळाडूंचे मिनी ऑक्शन होणार असून पुढील वर्षी संपूर्ण ऑक्शन होईल. त्याचबरोबर ही स्पर्धा भारतामध्ये होणार असल्याचं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं होतं.

( वाचा : बीसीसीआयच्या बैठकीतील मोठ्या निर्णयाचा मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना दिलासा )

IPL गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत काय झालं?

‘मुंबई मिररनं’ दिलेल्या बातमीनुसार सोमवारी IPL गव्हर्निंग कौन्सिलची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. या बैठकीमध्ये आगामी आयपीएल आयोजनाबाबत चर्चा झाली. या स्पर्धेसाठी BCCI ची पहिली पंसती ही भारत आहे. मात्र भारतामध्ये ही स्पर्धा कोव्हीडच्या कारणांमुळे नियोजित वेळी झाली नाही तर संपूर्ण स्पर्धा यावर्षी देखील UAE मध्ये होऊ शकते.

आयपीएलचं मिनी ऑक्शन हे 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याचबरोबर या बैठकीनंतर सर्व फ्रँचायझींना ट्रेडिंग विंडो ओपन करण्याची सूचना देण्यात आली आहे. खेळाडूंना करारमुक्त करण्याची अंतिम तारीख ही 21 जानेवारी आहे, असं वृत्त ‘मुंबई मिरर’नं दिलं आहे.

( वाचा : IPL 2020 मध्ये फिक्सिंग?, डॉक्टर असल्याचं भासवणाऱ्या नर्सनं साधला भारतीय खेळाडूशी संपर्क, मागितली होती ‘ही’ माहिती! )

सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धा (Syed Mushtakq Ali Trophy 2021) ही स्पर्धा कशी पार पडते त्यावर IPL स्पर्धा कुठं होणार हे ठरणार आहे. 10 ते 31 जानेवारी दरम्यान सय्यद मुश्ताक अली स्पर्धा होणार असून एकूण सहा राज्यांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: