दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या लढतीत ख्रिस जॉर्डनला (Chirs Jorddan) नाकारलेला अंपायरने नाकारलेला एक रन हा किंग्ज इलेव्हन पंजाबला (KXIP) या स्पर्धेत सर्वात महाग पडला,’ असं मत त्यांचा कॅप्टन के.एल. राहुल (KL Rahul) याने व्यक्त केलंय. संपूर्ण स्पर्धेत इंटेंटनं खेळणाऱ्या पंजाबच्या टीमला निर्णायक क्षणी झालेल्या चुकांमुळेच स्पर्धेतून बाहेर जावं लागलं.

दोन मोठ्या चुकांचा फटका

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पहिल्या लढतीमध्ये पंजाबला शेवटच्या दोन बॉल्समध्ये विजयासाठी फक्त एक रनची आवश्यकता होती. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि ख्रिस जॉर्डन ही त्यांची जमलेली जोडी मैदानात होती. मयंक आणि जॉर्डन लागोपाठच्या बॉलवर आऊट झाले. मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. रबाडाच्या बॉलिंगमुळे पंजाबची टीम पराभूत झाली. अगदी बांगलादेशच्या दर्जाची चूक पंजाबला त्या मॅचमध्ये भोवली.

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (KKR) पहिल्या मॅचमध्ये तर पंजाब यापेक्षा वाईट पद्धतीनं हरले. पंजबाला केकेआरविरुद्ध जिंकण्यासाठी 17 बॉल्समध्ये 21 रन्स हवे होते आणि त्यांच्या नऊ विकेट्स शिल्लक होते. निवांतपणाच्या या टोकापासून सुरु झालेला पंजाबचा प्रवास सुनील नरीनच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 14 रन्सची आवश्यकता आणि दोन नवे बॅट्समन मैदानात! या घाईपर्यंत येऊन पोहचला. प्रबसिमरन सिंगला (Prabhsimran Singh) मॅक्सवेलच्या आधी पाठवण्याचं धाडस अंगलट आलं. मॅक्सवेलनं शेवटच्या बॉलवर सिक्सर खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न काही मिलीमिटर कमी पडला. फोर आणि सिक्समधील हे काही मिलीमिटरचे अंतरानं पंजाबला बाद फेरी न गाठताच स्पर्धेच्या बाहेर पडावं लागलं.

पंजाबसाठी जमेच्या बाजू

स्पर्धेच्या पूर्वार्धात पंजाबनं सातपैकी सहा सामने गमावले होते. त्यानंतर सलग पाच सामने जिंकत पंजाबने स्पर्धेत जबरदस्त कमबॅक केलं. बंगळुरु, मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि हैदराबाद या पाच टीम्सना पंजाबनं पराभूत केलं.

केएल राहुल आणि मयंक अग्रवाल या ओपनिंग जोडीनं संपूर्ण स्पर्धेत सातत्याने रन्स केले. राहुलनं 14 मॅचमध्ये 55.83 च्या सरासरीने 670 रन्स काढले. यामध्ये एक सेंच्युरी आणि पाच हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. मयंक अग्रवालनं 11 मॅचमध्ये 38.54 च्या सरासरीनं 424 रन्स काढले. मयंकनं या सीझनमध्ये एक सेंच्युरी आणि दोन हाफ सेंच्युरी झळकावल्या.

ख्रिस गेल (Chris Gayle) स्पर्धेच्या उत्तरार्धात खेळला. T20 क्रिकेटच्या या युनिव्हर्सल बॉसनं वयाच्या 41 व्या वर्षी देखील आपण संपलो नसल्याचं दाखवून दिलं. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला येत गेलनं मीडल ऑर्डरचा भार पेलला. पंजाबच्या उत्तरार्धातील पाचही विजयात त्याची भूमिका महत्वाची होती. राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याची सेंच्युरी फक्त एक रननं हुकली. T20 क्रिकेटमध्ये हजार सिक्सर्स लगावण्याचा विक्रमही त्याने पूर्ण केला. गेलप्रमाणेच निकोलस पूरन या वेस्ट इंडिजच्या बॅट्समननंही आक्रमक खेळ केला.

पंजाबच्या बॉलिंगचा भार मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) खांद्यावर होता. शमीनं जीवतोड बॉलिंग करत ही जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या सुपर ओव्हरमध्ये शमीनं बुमराहच्या बरोबरीनं अचूक बॉलिंग करत मॅच दुसऱ्या सुपर ओव्हरपर्यंत नेली. शमीनं 14 मॅचमध्ये 20  विकेट्स घेतल्या. शमीनं या स्पर्धेत डेथ ओव्हर्समध्येही चांगली बॉलिंग केली. शेवटच्या दोन मॅचमध्ये शमीची बॉलिंग चालली नाही. त्याचा फटका पंजाबला बसला.पंजाबची टीम दोन्ही मॅचमध्ये पराभूत झाली आणि स्पर्धेतून आऊट झाली.

स्पर्धेतील क्रमांक6
सर्वात खराब क्षणकोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 21 बॉल्समध्ये 17 रन्स हवे असताना पराभव
सर्वात चांगला क्षणमुंबई इंडियन्स विरुद्ध दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजय
सर्वात अपयशी खेळाडूग्लेन मॅक्सवेल
सर्वात यशस्वी बॅट्समनके.एल. राहुल
सर्वात यशस्वी बॉलरमोहम्मद शमी
लक्षवेधी खेळाडूख्रिस गेल

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: