
इंडियन प्रीमियर लीग 2020 (IPL 2020) मध्ये भारतीय खेळाडूशी अवैध संपर्क केल्याचं प्रकरण उघडीस आलं आहे. ‘इंडियन एक्स्प्रेसनं’ ही बातमी दिली आहे. एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, ‘दिल्लीच्या एका नर्सनं गुप्त माहितीसाठी भारतीय खेळाडूशी संपर्क साधला होता’. BCCI च्या अँटी करप्शन युनिटचे (ACU) प्रमुख अजित सिंह यांनी देखील या बातमीला दुजोरा दिला आहे.
काय आहे प्रकरण?
‘इंडियन एक्स्प्रेसच्या’ बातमीनुसार, 30 सप्टेंबर रोजी दक्षिण दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सनं एका भारतीय खेळाडूकडून माहिती मागितली होती. हा खेळाडू काही वर्षांपूर्वी भारतीय टीमचा (Team India) सदस्य होता. त्यानं याबाबत तत्काळ BCCI च्या ACU युनिटला याची माहिती दिली होती. या नर्सला आयपीएल मॅचवर सट्टा लावायचा होता, म्हणून तिनं खेळाडूशी संपर्क साधला होता.
( वाचा : सुरेश रैनानं सांगितलं IPL मधील माघारीचं कारण, पबमधील रात्रीबाबतही दिलं स्पष्टीकरण! )
तीन वर्षांपासून होती ओळख
या संदिग्ध नर्स आणि क्रिकेटपटूची तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर क्रिकेटपटूशी ओळख झाली होती. तेंव्हा तिनं स्वत:ची क्रिकेट फॅन आणि डॉक्टर अशी ओळख करुन दिली होती. ‘या क्रिकेटपटूनं काही महिन्यापूर्वी कोरोना व्हायरस संक्रमणापासून काय काळजी घ्यावी?’ हे विचारण्यासाठी नर्सला संपर्क केला होता, अशीही माहिती आहे.
BCCI चं स्पष्टीकरण
BCCI च्या ACU युनिटचे प्रमुख अजित सिंह यांनी नर्स आणि खेळाडूमध्ये संपर्क झाल्याचं मान्य केलं. “ त्या खेळाडूनं IPL दरम्यान आम्हाला ही माहिती दिली होती. खेळाडूशी संपर्क साधणाऱ्या महिलेचा कोणत्याही सट्टेबाजांच्या टोळीशी संबंध नव्हता. ते दोघं एकमेकांना कधीही प्रत्यक्ष भेटले नाहीत. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून परस्परांच्या संपर्कात होते. आम्ही त्या महिलेचीही चौकशी केली, मात्र यामध्ये काही विशेष आढळले नाही. त्यामुळे आता प्रकरण बंद करण्यात आलं आहे.’’ असं स्पष्टीकरण सिंह यांनी दिलं आहे.
कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे IPL 2020 ही स्पर्धा मागील वर्षी UAE मध्ये झाली. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर अशी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) पराभव करुन या स्पर्धेचं पाचव्यांदा अजिंक्यपद पटकावलं.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.