फोटो – ट्विटर/India Today

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 13 वर्षांच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) आजवर एकदाही विजेतेपद पटकावता आलेलं नाही. गेल्या काही वर्षांपासून तर आयपीएल सुरु होण्यापूर्वीच RCB वरील नवे-नवे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होतात. RCB चे खेळाडू प्रत्येक वर्षी त्यांच्या कामगिरीतून टीकाकारांना नवं खाद्य पुरवतात.

IPL 2020 मध्ये काय झाले?

IPL 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सुरुवात चांगली केली होती. आयपीएलच्या पूर्वार्धात त्यांनी सातपैकी पाच मॅच जिंकल्या. उत्तरार्धात ते एकदम ढेपाळले. देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) आणि विराट कोहली (Virat Kohli) संथ झाले. एबी डिव्हिलियर्सवरील ताण वाढला. त्यामुळे डीव्हिलियर्सवर (AB Devillers) ताण वाढला. पुर्वार्धातील पुण्याईवर ते ‘प्ले ऑफ’मध्ये पोहचले. पण तिथं पहिल्याच मॅचमध्ये आरसीबीचा पराभव झाला. त्यामुळे ते मागील स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर होते.

( वाचा : IPL 2020 : आरसीबीसाठी पहिले पाढे (नेहमीच) पंचावन्न! )

गंभीरची खरमरीत टीका

क्रिकेट विश्वात सरळ आणि स्पष्ट बोलण्यासाठी गौतम गंभीर (Gautam Gambhir) प्रसिद्ध आहे. भारतासाठी दोन वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वात जास्त रन काढून त्यानं विजेतेपदामध्ये मोठं योगदान दिलं आहे. त्याचबरोबर गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) दोन वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.

‘स्टार स्पोर्ट्स’ वरील एका कार्यक्रमात बोलताना गंभीरनं RCB चा गेल्या आठ वर्षांपासून कॅप्टन असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वावर टीका केली आहे.

“आठ वर्षांपासून त्यानं विजेतेपद पटाकावलेलं नाही. हा खरोखरच खूप मोठा कालावधी आहे. तुम्ही असा कोणता कॅप्टन किंवा खेळाडू सांगा जो आठ वर्षांपासून आयपीएल विजेतेपदाशिवाय खेळत आहे. या अपयशाला कॅप्टन जबाबदार आहे. कोहलीनं पुढे येऊन या अपयशाची जबाबदारी स्वीकारायला हवी.’’ असं गंभीरनं सुनावलं.

( वाचा : देवदत्त पडिक्कल : कर्नाटकचा युवा बॅट्समन बनला आयपीएलचा हिरो! )

RCB नं यावर्षी काय केलं?

यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) होणार आहे. या सिझनच्या लिलावापूर्वी RCB नं दहा खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. यामध्ये आरोन फिंच आणि ख्रिस मॉरीस या दिग्गज खेळाडूंचाही समावेश आहे. ज्यांना मागच्याच सिझनमध्ये आरसीबीनं खरेदी केलं होतं.

RCB नं कायम ठेवलेले खेळाडू:  विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, अ‍ॅडम झम्पा, शाहबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन आणि पवन देशपांडे

RCB नं करारमुक्त केलेले खेळाडू:  आरोन फिंच, ख्रिस मॉरीस, मोईन अली, इसारु उडाना, शिवम दुबे, उमेश यादव, पवन नेगी, गुरकीरत मान आणि पार्थिव पटेल

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा

error: