फोटो – ट्विटर, बीसीसीआय, आयपीएल

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील (IPL 2021) राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Rajasthan Royals vs Punjab Kings) या मॅचचा निकाल शेवटच्या ओव्हरमध्ये बदलला. पंजाबला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी फक्त 4 रन हवे होते. निकोलस पूरन (Nicholas Pooran) आणि एडेन मार्करम (Aiden Markram) ही जमलेली जोडी मैदानात होती. त्यांनी 50 पेक्षा जास्त रनची पार्टनरशिप केली होती. त्यावेळी राजस्थान रॉयल्सच्या कार्तिक त्यागी (Kartik Tyagi) याने शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 1 रनच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. त्याच्या या अचूक बॉलिंगमुळे राजस्थाननं 2 रननं विजय मिळवला. उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्याचा मुलगा ते टीम इंडियाचा भावी आशास्थान असा कार्तिक त्यागीचा आजवरचा प्रवास (Who is Kartik Tyagi) गुणवत्तेच्या जोरावर पूर्ण केला आहे.

शेतकऱ्याच्या मुलाचा प्रवास

उत्तर प्रदेशातल्या हापूर (Hapur) जिल्ह्यातल्या लहान गावातील गरीब शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या कार्तिकला लहानपणापासूनच क्रिकेटचं वेड होतं. घरच्या परिस्थितीमुळे शाळा संपताच त्याला वडिलांसोबत शेतीमध्ये कामही करावं लागलं. पण त्याच्यातील क्रिकेटचं पॅशन त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. त्याचं क्रिकेटचं पॅशन पाहून 10 वर्षांच्या कार्तिकला त्याचे मामा चंदीगडमध्ये एका क्रिकेट ट्रायलसाठी घेऊन गेले होते.

चांगला क्रिकेटपटू होण्यासाठी कोचिंगची गरज असते हे कार्तिक आणि त्याच्या कुटुंबीयांना चंदीगमध्ये गेल्यावर पहिल्यांदा समजले. तिथं आलेले सर्व जण हे क्रिकेटचं प्रशिक्षण घेत होते. चंदीगडहून परतल्यानंतर कार्तिकच्या घरच्यांना त्याला प्रशिक्षणासाठी मिरतला पाठवण्याचा निर्णय घेतला.

उत्तर प्रदेशातल्या मिरतमध्ये विपिन वत्स यांच्या अकादामीमध्ये कार्तिकचं प्रशिक्षण (Who is Kartik Tyagi) सुरु झालं. टीम इंडियाचे फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार (Buvneshwar Kumar) आणि प्रवीण कुमार (Praveen Kumar) यांनाही सुरुवतीच्या काळात वत्स यांनीच प्रशिक्षण दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्तिकनं फास्ट बॉलिंगचे धडे गिरवले.

टॅम्पो ड्रायव्हर वडील अंथरुणाला खिळलेले, भावानं केली आत्महत्या, जिद्दी चेतननं पहिल्याच मॅचमध्ये गाजवलं मैदान!

16 व्या वर्षी पदार्पण

मिरतच्या अकादमीमध्ये कार्तिकनं झपाट्यानं स्वत:ला विकसित केलं. उत्तर प्रदेशची निवड समिती त्याच्यातील गुणवत्तेनं प्रभावित झाली. त्यामुळे वयाच्या 16 व्या वर्षीच रेल्वे विरुद्ध त्यानं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सुरेश रैना (Suresh Raina) आणि प्रवीण कुमार या आंतरराष्ट्रीय स्टार्सच्या सोबत कार्तिक पहिली मॅच खेळला. त्या मॅचमध्ये त्यानं 3 विकेट्स घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

कार्तिकला या लक्षवेधी पदार्पणाचा फायदा उठवता आला नाही. त्यानंतरची 2 वर्ष तो दुखापतग्रस्त होता. त्यामुळे आयपीएल स्पर्धेच्या लिलावासाठी नाव नोंदणी करुनही त्याला फ्रँचायझींचं लक्ष वेधून घेण्यात अपयश आलं. दुखापतींच्या या अडथळ्यानंतरही 2020 साली दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup 2020) त्याची (Who is Kartik Tyagi) टीम इंडियात निवड केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कार्तिकचं वादळ

अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये कार्तिकवर नव्या बॉलनं टीम इंडियाच्या बॉलिंगची सुरुवात करण्याची जबाबदारी होती. त्यानं त्या स्पर्धेत 11 विकेट्स घेतल्या. ब्रेट लीला आदर्श मानणाऱ्या कार्तिकनं लीच्या देशाला म्हणजेच ऑस्ट्रेलियाला सर्वात मोठा झटका दिला.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये (India vs Australia U 19 World Cup 2020) टीम इंडियानं पहिल्यांदा बॅटींग करत 9 आऊट 233 रन केले होते. 234 चा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन टीमची कार्तिकच्या वादळात वाताहात झाली. कार्तिकच्या पहिल्या ओव्हरमध्ये 3 ऑस्ट्रेलियन बॅट्समन (यापैकी 1 रन आऊट) झाले. या धक्क्यातून ऑस्ट्रेलियन टीम शेवटपर्यंत सावरली नाही. कार्तिकनं त्या मॅचमध्ये 24 रन देत 4 विकेट्स घेत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या या स्पेलमुळे तो (Who is Kartik Tyagi) आयपीएल फ्रँचायझींच्या रडावर आला.

IPL ते टीम इंडिया

आयपीएल 2020 पूर्वी झालेल्या लिलावात (IPL 2020 Auction) राजस्थान रॉयल्सनं (RR) कार्तिकला करारबद्ध केले. अंडर 19 वर्ल्ड कपमधून थेट क्रिकेटच्या सर्वात अवघड अशा T20 लीगमध्ये त्याची एन्ट्री झाली. त्यानं पहिल्याच आयपीएलमध्ये 9 विकेट्स घेतल्या. राजस्थान रॉयल्सची टीम पॉईंट टेबलमध्ये सर्वात तळाशी राहिली. पण, कार्तिकनं राष्ट्रीय निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं. त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टीम इंडियामध्ये नेट बॉलर म्हणून निवड झाली.

कार्तिकनं ऑस्ट्रेलियात नेटमध्ये जीव तोडून बॉलिंग करत त्याची जबाबदारी पार पाडली. टीम इंडियाचा कोचिंग स्टाफ तसंच जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) सारख्या जगातील अव्वल बॉलरकडून त्याला कोचिंगच्या टिप्स मिळाल्या. बुमराहच्या या टिप्सचा कार्तिकला पंजाब विरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये फायदा झाला. बुमराहनंही मॅचनंतर तात्काळ ट्विट करत त्याच्या शिष्याचं अभिनंदन केलं आहे.

पंजाब विरुद्ध हिरो

कार्तिकला आयपीएलच्या पूर्वार्धात (IPL 2021 Phase 1) दुखापतीमुळे बहुतेक काळ बेंचवर बसावं लागलं. कोरोना व्हायरसच्या अडथळ्यानं दुसरा टप्पा यूएईमध्ये सुरू झाला. वर्षभरापूर्वी याच देशात कार्तिकचं आयपीएल करिअर सुरू झालं होतं. कार्तिककडं या पिचवर बॉलिंगचा अनुभव होता.

IPL 2021: पहिल्यांदाच आयपीएल खेळणारे हे 3 खेळाडू ठरणार गेमचेंजर!

राजस्थान विरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये पंजाबला (RR vs PBKS) विजयासाठी 4 रन हवे होते. त्या परिस्थितीमध्ये देखील कार्तिकला कशा पद्धतीनं बॉलिंग करायची हे नीट माहिती होतं. त्याच्या डोक्यात कोणताही गोंधळ नव्हता, असं राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) यानं सांगितलं.

कार्तिकनं शेवटच्या 6 बॉलमध्ये फक्त 1 रन देत निकोलस पूरन आणि दीपक हुडा या दोन अनुभवी बॅट्समनना आऊट केलं. राजस्थानला 2 रननं विजय मिळवून दिला. पंजाबच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला. जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीमध्ये कार्तिक त्यागीवर (Who is Kartik Tyagi) राजस्थानच्या बॉलिंगची मोठी जबाबदारी आली आहे. ही जबाबदारी पेलण्यास आपण सज्ज असल्याचं कार्तिकनं दाखवून दिलं आहे. या आयपीएलमधील त्याची कामगिरी टीम इंडियात निवड होण्यात निर्णायक ठरणार आहे.     

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: