फोटो – ट्विटर/IPL

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या सीझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुच्या (RCB) देवदत्त पडिक्कलनं (Devdutt Padikkal) सर्वांचं लक्ष वेधून घेतले. देवदत्तनं या स्पर्धेत 473 रन्स काढले. भारतासाठी न खेळलेल्या खेळाडूने पहिल्याच आयपीएलमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) विक्रमही त्याने मोडला. इतकेच नाही तर विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स या दिग्गजांना मागे टाकत त्याने आरसीबीकडूनही सर्वात जास्त रन्स केले.

आरसीबीकडून आयपीएलमध्ये आजवर ख्रिस गेल, विराट कोहली, ब्रँडन मॅक्यूलम, के.एल. राहुल यासारख्या दिग्गज आंतरराष्ट्रीय बॅट्समनने ओपनिंग केली आहे. IPL 2020 मध्येही आरोन फिंच या ऑस्ट्रेलियाच्या वन-डे आणि टी-20 चा कॅप्टनने आरसीबीकडून ओपनिंग केली. या दिग्गज खेळाडूंमुळे आरसीबी नेहमीच ‘टॉप हेवी’ टीम समजली जात असे. या ‘टॉप हेवी’ गटात कर्नाटकच्या 20 वर्षांच्या देवदत्त पडिक्कलने स्वत:ला सिद्ध केले.

( वाचा : IPL: न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूवर आहे, CSK ची नजर, KKR देखील शर्यतीत! )

देशांतर्गत क्रिकेट नियमित फॉलो करणाऱ्या मंडळींसाठी देवदत्त पडिक्कल हे नाव नवं नाही. मागच्या वर्षात त्याने सर्व स्पर्धांमध्ये सातत्याने रन्स केलेत. 50 ओव्हर्सच्या विजय हजारे चषक स्पर्धेत देवदत्तनं 11 मॅचमध्ये 67.66 च्या सरासरीने 609 रन्स केले होते. यामध्ये दोन सेंच्युरी आणि पाच हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. कर्नाटकच्या टीमला विजय हजारे चषक जिंकून देण्यात त्याचा महत्वाचा वाटा होता.

20 ओव्हर्सच्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही देवदत्तची बॅट तळपली होती. त्या स्पर्धेत त्याने 12 मॅचमध्ये 175.75 चा स्ट्राईक रेट, 64.44 ची सरासरीसह 580 रन्स काढले. यामध्ये एक सेंच्युरी आणि पाच हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅट्समनच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऋतूराज गायकवाडपेक्षा देवदत्तनं 161 रन्स जास्त केले होते.

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये देवदत्तने केलेला खेळ सर्वांच्या लक्षात आहे. हरयाणाने त्या मॅचमध्ये कर्नाटकसमोर 20 ओव्हर्समध्ये 195 रन्सचं मोठं टार्गेट ठेवलं होतं. अमित मिश्रा, यजुवेंद्र चहल आणि जयंत यादव हे तीन आंतरराष्ट्रीय स्पिनर्स हरयाणाच्या टीममध्ये होते. देवदत्तनं या मॅचमध्ये के.एल. राहुल सोबत 9.3 ओव्हर्समध्ये 125 रन्सची पार्टनरशिप केली. त्याने 42 बॉल्समध्ये 4 फोर आणि 4 सिक्सर्सच्या मदतीने 87 रन्स काढले.

( वाचा : IPL 2020 मुंबई इंडियन्स : ‘बेस्ट टीमचे बेस्ट विजेतेपद’ )

माईक हेसन (Mike Hesson) हे सध्या आरसीबीचे ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ आहेत. हेसन पूर्वी न्यूझीलंडच्या राष्ट्रीय टीमचे तसंच किंग्ज इलेव्हन पंजाबचे कोच होते. हेसन यांनी स्टार स्पोर्ट्ससाठी कॉमेंट्रीही केलीय. या कामाचा भाग म्हणून त्यांनी मागच्या वर्षी देशांतर्गत स्पर्धा तसंच केपीएल कव्हर केलीय. या स्पर्धांच्या दरम्यान देवदत्त त्यांच्या नजरेत भरला. देवदत्त 2019 मध्येही आरसीबी सोबत होता. त्याने मागच्या वर्षी एकही मॅच खेळली नसली तरी सरावाच्या दरम्यान त्याने विराट कोहलीला प्रभावित केले होते. त्यामुळे आरसीबीने यावर्षी त्याला टीममध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्सवर वाढलेला भार हे आरसीबीच्या मागच्या दोन सीझनमधील खराब कामगिरीचं प्रमुख कारण होतं. हा भार हलका करण्यासाठी आरसीबीने यंदा आरोन फिंच या अनुभवी ओपनरला करारबद्ध केलं. त्याच्यासोबत देशांतर्गत स्पर्धांमध्ये फॉर्मात असलेल्या देवदत्तला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्याचा देवदत्तने कसा फायदा उठवला हे आपण पाहतोय.

( वाचा : जस्टीन लँगरचा जीव वाचवण्यासाठी पॉन्टिंग इनिंग घोषित करणार होता! )

सनरायझर्स हैदराबादच्या मॅचमध्ये त्याने आक्रमक हाफ सेंच्युरी झळकावली. मुंबई इंडियन्स विरुद्ध एका बाजूने नांगर टाकला होता. तर राजस्थान रॉयल्सच्या मॅचमध्ये आधी आक्रमक आणि नंतर शांत असा दोन्ही प्रकारचा खेळ केला. बुमराह असो वा आर्चर, रशिद खान असो वा श्रेयस गोपाळ सर्वांच्या विरुद्ध सर्व परिस्थितीमध्ये खेळ करण्याची क्षमता असल्याचं देवदत्तनं दाखवून दिलंय. आरसीबीनं 2020 च्या आयपीएल सिझनमध्ये आरसीबीकडून डीव्हिलियर्सच्या बरोबरीनं पाच हाफ सेंच्युरी झळकावल्या.

देवदत्त पडिक्कलची IPl 2020 मधील कामगिरी

मॅच15
रन्स473
सरासरी31.53
स्ट्राईक रेट124.80
सर्वोच्च74
50/1005/0

सुनील गावस्कर यांनी आयपीएल स्पर्धेसाठी कॉमेंट्री करताना एक किस्सा सांगितला होता. गावस्कर म्हणतात “ मी गुंडप्पा विश्वनाथला देवदत्त पडिक्कलबद्दल विचारलं होतं. मितभाषी विश्वनाथ त्यावर म्हणाले तो चांगला प्लेयर आहे. विश्वनाथ यांनी यापूर्वी राहुल द्रविड आणि के.एल. राहुल बद्दलही हेच सांगितलं होतं.’’

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा

error: