
टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमध्ये चार वर्षांनंतर सर्वात मोठे बदल झाले आहेत. टीम इंडियाचे 2017 सालापासून असलेले हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांच्या जागी महान भारतीय खेळाडू राहुल द्रविड (Rahul Dravid) हेड कोच झाला आहे. त्याचबरोबर विराट कोहलीनं (Virat Kohli) T20 इंटरनॅशनलची कॅप्टनसी देखील सोडली आहे. T20 वर्ल्ड कप ही विराटच्या कॅप्टनसीमध्ये झालेली शेवटची स्पर्धा होती. आता रोहित शर्मा (Rohit Sharma) T20 टीमचा कॅप्टन असेल. विराटनं कॅप्टनसी का सोडली? याबाबत रवी शास्त्रींनी एक खळबळजनक दावा (Shastri On Virat Captaincy) केला आहे.
काय होते अधिकृत कारण?
विराट कोहलीनं T20 वर्ल्ड कपपूर्वीच (T20 World Cup 2021) या प्रकारातील कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी विराटनं वर्कलोड मॅनेजमेंट आणि अन्य फॉर्मेटवर जास्त फोकस करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं स्पष्ट केलं होतं. पण रवी शास्त्रींचा या विषयावरचा दावा टीम इंडियात सर्व काही ‘ऑल इज वेल’ नसल्याचं सांगत आहे.
शास्त्री 2017 पासून टीम इंडियाचे हेड कोच होते. त्यांच्या कार्यकाळात अनेकदा टीम इंडियात गटबाजी असल्याचं सिनिअर खेळाडूंमध्ये वाद असल्याच्या बातम्या आल्या आहेत. टीम इंडियाचा प्रमुख बॉलर आर. अश्विनवर (R. Ashwin) विराटच्या कॅप्टनसीमध्ये अन्याय झाल्याचा दावा सुनील गावसकरांनी केला होता. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यातील एकाही टेस्टमध्ये अश्विनला संधी न देऊन विराट-शास्त्री जोडीनं या दाव्याला खतपाणी घातलं. टीम इंडियाशी संबंधित कोणत्याही वरिष्ठ खेळाडू किंवा अधिकाऱ्यानं ड्रेसिंग रूममधील मतभेदावर आजवर मत व्यक्त केलं नव्हतं. आता कार्यकाळ संपताच लगेच दिलेल्या मुलाखतीमध्ये शास्त्रींनी या विषयावर दावा (Shastri On Virat Captaincy) केला आहे.
टीम इंडियात फूट? सिनिअर खेळाडूंनी विराट कोहलीची केली BCCI कडं तक्रार
काय आहे शास्त्रींचा दावा?
रवी शास्त्री यांनी रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा दावा केला आहे. ‘विराट कोहलीनं कॅप्टनपदाचा राजीनामा का दिला. तुम्हाला (रवी शास्त्री) कोच पदावर ठेवावं असं यामागील हेतू होता की अन्य काही कारण होते? असा प्रश्न शास्त्रींना विचारण्यात आला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना शास्त्रींनी सांगितले की, ‘या पैकी कोणतंही एक कारण होतं असं मला वाटत नाही. कधी-कधी ड्रेसिंग रूममधील लोकांचं एकमेकांशी नीट पटत नाही. त्यावेळी कुणाला तरी एकाला पुढं जावं लागतं. तो मी असू शकतो किंवा तो (विराट कोहली) असू शकतो. पण सर्व गोष्टी चांगल्या घडत नसतील तेव्हा त्याचा टीमला फटका बसू नये यासाठी एकच सर्वात चांगला उपाय असतो की एक माणूस यामधून बाजूला जातो.’
Ravi Shastri Coach Review: लाख चुका असतील केल्या, केली पण…
वर्ल्ड कप 2019 (World Cup 2019) मध्ये सेमी फायनलमध्ये टीम इंडिया पराभव झाला होता. त्या पराभवापासूनच टीम इंडियात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे दोन गट असल्याची चर्चा होती. आता शास्त्रींनी या मुलाखतीमध्ये केलेल्या दाव्यानंतर (Shastri On Virat Captaincy) या चर्चांना एक प्रकारे बळकटी दिली आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.