कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत देशाचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक हसत्या-खेळत्या, समाधानी घरांना या व्हायरसची नजर लागली. काही दिवसांमध्येच या परिवाराचं मोठं नुकसान झालं. भारताची क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती (Veda Krishnamurthy) अशाच काही दुर्दैवी व्यक्तींपैकी एक आहे. कोरोनामुळे तिची आई आणि मोठ्या बहिणीचं निधन झालं. वेदानं एक हृदयस्पर्शी पत्र (Veda Krishnamurthy letter) लिहून आपल्या दोन आईंबद्दलच्या भावना सर्वांसमोर व्यक्त केल्या आहेत.

वेदाच्या आई चेलुवुम्बदा देवी आणि मोठी बहीण वत्सला शिवकुमार यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. भारताकडून 48 वन-डे आणि 46 T20 खेळलेल्या वेदाच्या आयुष्यावर या दोघींचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या अकाली निधानामुळे वेदाचं कधीही न भरुन येणारं नुकसान झालं आहे.

वेदानं हे पत्र ट्विटरवर (Veda Krishnamurthy letter)  शेअर केलं आहे.

माझी सुंदर आई आणि अक्का,

गेले काही दिवस आपल्या घरातल्या सर्वांसाठीच त्रासदायक होते. तुम्ही दोघी आपल्या घराचा आधार होतात. तुमच्या दोघींशिवाय राहवं लागेल, याचा मी कधीच विचार केला नव्हता. आता याची जाणीव होताच मला खूप त्रास होत आहे.

अम्मा, तू मला शूर बनवलंय. आयुष्यात प्रॅक्टिकल असणं आवश्यक आहे, हे शिकवलंस. तू सर्वात सुंदर, आनंदी आणि निस्वार्थी होतीस. दीदी, तुला माहिती होतं की तू माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती होतीस. तू एक लढवय्या होतीस आणि तू मला शेवटच्या श्वासापर्यंत लढायला शिकवलंस.

माझ्या प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणाऱ्या तुम्ही दोघी होता. मला दोन आई असल्याचा नेहमी अभिमान होता. पण हे कदाचित कुणालातरी आवडलं नसावं. तुमच्या दोघींसोबत घालवलेले गेले काही दिवस खूप सुंदर होते. पण ते शेवटचे दिवस असतील याचा कधीही विचार केला नव्हता. तुमच्या दोघींच्या जाण्यानं माझं पूर्ण आयुष्य बदललं आहे. आता एक कुटुंब म्हणून आम्ही या सर्वांमधून कसं उभं राहू माहिती नाही. मी इतकचं सांगते, माझं तुमच्या दोघींवर खूप प्रेम होतं आणि मला तुमची नेहमी आठवण येईल.

टॅम्पो ड्रायव्हर वडील अंथरुणाला खिळलेले, भावानं केली आत्महत्या, जिद्दी चेतननं पहिल्याच मॅचमध्ये गाजवलं मैदान!

वेदानं यावेळी (Veda Krishnamurthy letter) क्रिकेट फॅन्सचे देखील आभार मानले असून त्यांना एक कळकळीचं आवाहन केलं आहे.

वेदानं पुढं लिहलंय, “ या प्रसंगामध्ये तुमच्या सगळ्यांकडून जे प्रेम मिळालं त्यासाठी आभारी आहे. कोव्हिडच्या नियमांचं पालन करा आणि सावध राहा. हा व्हायरस खूप धोकादायक आहे. माझ्या कुटुंबानं सगळं बरोबर केलं होतं. तरीही माझ्या घरात व्हायरस शिरला. सुरक्षित राहा. खंबीर राहा.’’

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading