
सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) क्रिकेटच्या माध्यमातून देशाची मान जगभर उंचावली. आपल्या ट्विटर बायोवर Proud Indian अशी अगदी सुरुवातीपासून ओळख ठेवणारा सचिन हा कदाचित एकमेव क्रिकेटपटू असावा. सचिननं क्रिकेटच्या मैदानावर त्याला स्लेजिंग करणाऱ्या सर्व मंडळींना नेहमीच बॅटनं उत्तर दिलं आहे. आता रिटायरमेंटनंतर शेतकरी आंदोलनाच्या (Farmer Protest) भारताच्या अंतर्गत गोष्टीत लुडबुड करणाऱ्याच्या विरोधातही सचिन मैदानात उतरला आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या दोन महिन्यांपासून राजधानी दिल्लीमध्ये केंद्र सरकारनं नवं कृषी विधेयक (New Farm Law) मागे घ्यावं म्हणून काही शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. सरकारशी अनेकदा चर्चेच्या वाटाघाटी झाल्यानंतरही त्यांचं समाधान झालं नाही. त्यानंतर त्यांनी देशातील लोकशाहीचा सर्वोच्च उत्सव असलेल्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत धुडगुस घातला.
भारताचे पंतप्रधान 15 ऑगस्ट रोजी ज्या लाल किल्ल्यावर झेंडावंदन करतात. त्या लाल किल्ल्यात काही ‘फुकरे’ घुसले. त्यांनी तिरंगा ध्वज काढत शिखांसाठी वेगळा देशची मागणी करणाऱ्या फुटीरवादी खालिस्तानचा चळवळीचा (Khalistan movement) झेंडा फडकावला.
( वाचा : शोएब अख्तरचे ‘गझवा-ए-हिंद’ के जहरीले सपने, ‘काश्मीर ताब्यात घेऊ, भारतावर हल्ला करु’ – पाहा VIDEO )
शेतकाऱ्यांच्या मागणीची ढाल करुन आंदोलन करणाऱ्या मंडळींचा अजेंडा उघड झाल्यानंतर त्यांची देशातील सहानुभूती कमी झाली. पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारताच आंदोलनाच्या नावाखाली महिनाभरापासून तंबू ठोकून बसलेले शेतकरी घरी परतू लागले. या आंदोलनाच्या सुत्रधारांचा जोर कमी होऊ लागला.
भारतात हा जोर कमी होत असल्याचं लक्षात येताच आंतरराष्ट्रीय लॉबी सक्रीय झाली. सर्वप्रथम पॉप गायिका रिहानाला (Rihanna) शेतकरी आंदोलनाची (Farmer Protest) जाणीव झाली.रिहानानंतर स्विडनमधील बाल आंदोलक ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg), पॉर्न स्टार मियां खलिफा (Mia Khalifa), अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांच्या भाचीनं देखील इंटरनेट आंदोलनातील वाहत्या लाटेत हात धुऊन घेतले. या सर्व मंडळींच्या जगभरातील फॅन्सनी त्यानंतर ट्विटरवर भारतविरोधी ट्रेंड चालवण्यास सुरुवात केली.
सचिन उतरला मैदानात
सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वात मोठा क्रिकेटपटू आहेच. त्याचबरोबर देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला ‘भारतरत्न’ हा पुरस्कार मिळालेला देशातील एकमेव क्रीडापटू आहे. भारताच्या विरोधात जगभर अप्रचार सुरु असताना त्याच्यातील भारतीय शांत बसला नाही. शेतकरी आंदोलनाच्या (Farmer Protest) नावावर देशात लुडबुड करणाऱ्या विदेशी मंडळींना सचिननं स्पष्ट शब्दात सुनावलं.
( वाचा : शाहिद आफ्रिदीनं पुन्हा गरळ ओकली, काश्मीरला स्वतंत्र करण्याची केली भाषा! )
काय म्हणाला सचिन?
‘भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्य शक्तींनी प्रेक्षकांच्या भूमिकेत राहवं, यामध्ये हस्तक्षेप करु नये. भारतीयांना भारत माहिती आहे. तेच देशाबद्दल ठरवतील. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया.’’ असं सचिननं त्याच्या सरळ आणि कडक स्ट्रेट ड्राईव्ह सारखंच सरळ आणि कडक शब्दात बाह्य शक्तींना सुनावलं आहे.
#IndiaTogether च्या या मोहिमेत सचिनसह टीम इंडियाचा माजी कॅप्टन अनिल कुंबळे (Anil Kumble), स्पिन बॉलर प्रज्ञान ओझा, ओपनिंग बॅट्समन शिखर धवन, हे देखील उतरले आहेत.
या क्रिकेटपटूंनी स्वच्छ शब्दात भूमिका मांडताच इंटरनेटवरील ट्रोलर्सनी त्यांनाही ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. पण, भारत आणि भारताच्या बाहेरच्या यांच्या लढाईत आपण कोणत्या बाजूनं आहोत हे या सर्व क्रिकेटपटूंनी देशाला दाखवून दिलं आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.