
भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 1999 साली चेन्नईमध्ये झालेल्या टेस्टमधील (Chennai Test) दुसऱ्या इनिंगमध्ये सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly Catch) मोईन खानने घेतलेला कॅच संशयास्पद होता, अशी कबुली पाकिस्तानचा माजी कॅप्टन इंझमाम उल हकने (Inzaman-ul-Haq) दिली आहे. भारतीय स्पिनर आर. अश्विन (Ravichandran Ashwin) याच्या ‘DRS With Ash’ या कार्यक्रमात बोलताना इंझमामने ही कबुली दिलीय.
चेन्नई टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये गांगुली 2 रन्सवर असताना त्याने सिली पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका टिपल्याचा दावा मोईन खानने केला होता. मोईनचा हा दावा ग्राह्य धरत अंपायरने गांगुलीला आऊट म्हणून घोषित केले. क्रिकेट इतिहासातील एक वादग्रस्त निर्णय म्हणून तो निर्णय आजही ओळखला जातो.
“त्या कॅचमध्ये अझर महमूद आणि मोईन खान या दोघांचा सहभाग होता. गांगुलीने मारलेला फटका पहिल्यांदा अझर महमूदला लागला आणि नंतर तो मोईन खानने पकडला. मी त्यावेळी बरं वाटत नसल्याने मैदानात नव्हतो. अझर माझ्या जागेवर फिल्डिंग करत होता. मी मैदानात नसल्याने नेमके काय झाले हे सांगू शकत नाही, पण तो संशयास्पद कॅच (Sourav Ganguly Catch) होता’’, इतके सांगू शकतो’’, अशी आठवण इंझमामने सांगितली आहे.
इंझमामचा कबुलीजबाब पाहा
भारतीय टीमने 1989 साली चार टेस्ट मॅच खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर तब्बल 10 वर्षांनी चेन्नईमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात टेस्ट मॅच खेळली गेली होती. दोन टेस्ट मॅचमधील ती पहिली टेस्ट सचिन तेंडुलकरने भारताच्या दुसऱ्या आणि मॅचच्या चौथ्या इनिंगमध्ये काढलेल्या झुंजार सेंच्युरीबद्दल ओळखली जाते. सचिनच्या अविस्मरणीय सेंच्युरीनंतरही भारताने ती टेस्ट 12 रनने गमावली होती.
सौरव गांगुलीने पहिल्यांदा बॅटिंग करताना भारताकडून सर्वाधिक 54 रन्स काढले होते. गांगुली तेंव्हा फॉर्मात होता. दुसऱ्या इनिंगगमध्ये भारताची अवस्था 4 आऊट 73 अशी असताना तो मैदानावर आला होता. 24 बॉल्समध्ये 2 रन्स काढून गांगुली परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जबाबदारीनं खेळत होता.
( वाचा : Explained: पाकिस्तान फास्ट बॉलर्सची खाण आहे!, तर 26 वर्षांपासून ‘हे’ का जमत नाही?
भारताचा स्कोअर 4 आऊट 82 असा असताना सकलेन मुश्ताकच्या बॉलिंगवर गांगुलीने मारलेला फटका आधी जमिनीवर लागला नंतर अझर महमूदच्या शरिराला लागून तो मोईन खानने टिपला असे स्पष्ट दिसत होते. अंपायर स्टीव्ह डन यांनी थर्ड अंपायरकडे हा निर्णय न पाठवता मैदानातील दुसरे अंपायर व्ही. रामास्वामी यांच्याशी चर्चा करुन गांगुलीला आऊट घोषित केले होते.
अंपायर स्टिव्ह डन यांचा तो निर्णय दुर्दैवी असल्याची टीका त्यावेळी कॉमेंट्री करणारे ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी केली होती. स्वत: गांगुलीही त्या निर्णयावर नाराज होता. त्याने नाखुशीनेच मैदान सोडले होते.
निर्णायक क्षणी अंपायरने दिलेलेल्या संशायस्पद निर्णयाचा मोठा फायदा पाकिस्तानला झाला असेच या प्रकरणी इंझमामने दिलेल्या कबुलीतून म्हणावे लागेल.
भारत-पाकिस्तान यांच्यात 1999 साली चेन्नईत झालेल्या टेस्टच्या हायलाईट्स
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.