
पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन इंझमाम उल हकचा (Inzamam-ul-Haq) आज वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी (3 मार्च 1970) रोजी इंझमामचा जन्म झाला. तो टेस्ट क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा तीन क्रमांकाचा तर वन-डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून सर्वात जास्त रन करणारा बॅट्समन आहे.
इंझमाम उल हकचा विषय निघाला की, ‘त्याला कसं सध्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या रत्नपारखी नजरेनं हेरलं. स्वत:ची बॅट नसलेला पोरगा पाकिस्तानच्या टीममध्ये आला. इम्रानचा आशीर्वाद मिळाला आणि मोठा क्रिकेटपटू बनला, असं अगदी चवीनं सांगितलं जातं.’ त्याचबरोबर पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट टीमचं कट्टर इस्लामीकरण करण्यासाठी देखील त्याला जबाबदार मानलं जातं (Inzamam ul Haq is responsible for the Islamization of Pakistan Cricket team) हे फार पुढं येत नाही. एक मोठा क्रिकेटपटूच्या मागचा इंझमामचा चेहरा कट्टर इस्लामी आहे, असं का म्हंटलं जातं हे सांगण्याचा आम्ही या लेखातून प्रयत्न करणार आहोत.
तबलिघी जमातचा सक्रीय सदस्य
एखादी व्यक्ती किंवा घटनेबाबत माहिती मिळवण्याचं इंटरनेटवरील सर्वात पहिलं माध्यम म्हणजे विकिपिडिया. इंझमामच्या (Inzamam-ul-Haq) ‘विकी’ प्रोफाईलवर गेलं की तिथे इंझमाम हा तबलिघी जमात या कट्टर इस्लामी संघटनेचा सदस्य आहे, अशी स्पष्ट नोंद आहे.
‘इंडिया टुडे’ च्या वेबसाईटवर 21 जून 2017 या दिवशी प्रसिद्ध झालेला लेख आहे. पाकिस्तानच्या टीमनं तेंव्हा नुकतीच चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. त्या लेखात इंझमान उल हक पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन झाल्यानंतर तो निवृत्त होईपर्यंतच्या काळात पाकिस्तानच्या टीममध्ये कशा पद्धतीनं धर्माचा प्रभाव वाढला हे सांगितले आहे.
‘इंझमाम कॅप्टन असताना खेळाडूंना सार्वजनिक ठिकाणी नमाज पडण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात असे. क्रिकेटपटूंनी दाढी वाढवणे, मॅच नंतर कोणताहीही प्रतिक्रिया देताना पहिल्या वाक्यात परमेश्वराचे आभार व्यक्त करणे, फिटनेससाठी जीममध्ये कमी वेळ घालवणे या गोष्टी सुरु झाल्या,’ असे या लेखात स्पष्ट करण्यात आले आहे.
( वाचा : सौरव गांगुलीचा ‘तो’ कॅच संशयास्पद, इंझमामने दिली तब्बल दोन दशकानंतर कबुली! )
युसुफ योहानाचे धर्मांतर
युसूफ योहाना (Yousuf Yohana) हा पाकिस्तानी ख्रिश्चन इंझमाम कॅप्टन असतानाच मुस्लीम बनला. पाकिस्तान टीमच्या तेंव्हाच्या कॅप्टननं इस्लामबद्दल सांगितलेल्या गोष्टीचा युसुफवर प्रभाव पडला. त्याचबरोबर पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन होण्यासाठी या धर्मांतराची मदत होईल, असा विश्वास युसुफला होता. याचा उल्लेख देखील पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (PCB) माजी संचालक शाहरायर खान (Shaharyar Khan) यांच्या ‘The Cricket Cauldron’ या पुस्तकात करण्यात आला आहे, असंही इंडिया टुडेचा लेख सांगतो.
ब्रायन लाराचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न?
इंझमान उल हक (Inzamam-ul-Haq) आणि मोहम्मद युसूफ (Mohammad Yousuf) (युसूफ योहानानं इस्लामचा स्वीकार केल्यानंतरचे नाव) या जोडीनं वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा (Brian Lara) यानं इस्लाम धर्माचा स्वीकार करावा म्हणून प्रयत्न केला, अशी एक नेहमी चर्चा होत असते.
‘क्रिकेट कंट्री’मध्ये एका लेखात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. 29 जानेवारी 2016 रोजी प्रसिद्ध झालेल्या या लेखामध्ये दिलेल्या व्हिडीओची लिंक आता उपलब्ध नाही. पण या विषयाचा आणखी मागोवा घेतल्यानंतर एक YouTube व्हिडीओ सापडतो.
( शोएब अख्तरचे ‘गझवा-ए-हिंद’ के जहरीले सपने, ‘काश्मीर ताब्यात घेऊ, भारतावर हल्ला करु’ – पाहा VIDEO )
‘जगात एकही गैर मुस्लीम राहणार नाही’
‘अल फलह’ (Al Falah Official) या YouTube चॅनलवरील इंझमाम उल हकचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये देखील इंझमान आपण आणि मोहम्मद युसूफनं लाराला कराचीमध्ये जेवायला बोलावले होते. तसंच त्याला इस्लामची महती सांगितली या सर्वाचा उल्लेख केला आहे.
ब्रिटनमधील मशिदीमध्ये नमाजाच्या वेळी लाहोरमधील मशिदीपेक्षा जास्त संख्या असते, असं इंझमाम या व्हिडीओत सांगतो. मोहम्मद युसूफचा उल्लेखही इंझमाम या व्हिडीओत करतो. ‘मुलसमान आपल्या मुसलमानियतवर आला तर एकही व्यक्ती गैर मुस्लीम राहणार नाही’. असं मोहम्मद युसूफनं आपल्याला सांगितल्याचं इंझमाम त्या व्हिडीओत सांगतो. (TC -6.22 पाहावे )
‘देवाच्या हातात क्रिकेट’
पाकिस्तानच्या क्रिकेटमध्ये धार्मिक भेदभाव होतो, असा आरोप त्यांचा हिंदू क्रिकेटपटू दानिश कानेरिया (Danish Kaneria) यानं केला होता. कानेरिया इंझमामच्याच कॅप्टनसीमध्ये बरंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. त्याचा हा आरोप इंझमामनं फेटाळला होता.
‘द प्रिंट’ या वेबसाईटवर 2 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध झालेला एक लेख आहे. या लेखात ‘पाकिस्तानच्या क्रिकेटची दोरी ही देवाच्या हातामध्ये गेली आहे. खेळ, धर्म आणि राजकारण याचं कॉकटेल म्हणजे पाकिस्तानचं क्रिकेट आहे. पाकिस्तानला आधुनिक दाखवण्याचा अभास माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना करायचा होता. त्या काळात त्यांनी PCB ला खेळाडूंना आवरण्याचा सल्ला दिला.’ हे सर्व उल्लेख आहेत. विशेष म्हणजे हा लेख पाकिस्तानमधील महिला पत्रकारानं लिहलेला आहे.
‘द प्रिंट’मधील लेखात, ‘या सर्व गोष्टी इंझमाम उल हक (Inzamam-ul-Haq) याच्या कॅप्टनसीमध्ये सुरु झाल्या’ असं म्हंटलं आहे. इंझमामच्याच कॅप्टनसीमध्ये मोठ्या स्पर्धेपूर्वी खेळाडूंनी मौलवीचे आशीर्वाद घेण्याची प्रथा सुरु झाली. (इंझमामच्या कॅप्टनसीध्ये 2007 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचं आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले होते.)
( वाचा : रिटायरमेंट का किंग कौन – शाहिद आफ्रिदी ! )
इंझमाम निवड समितीचा अध्यक्ष होता तेंव्हाही 2019 च्या वर्ल्ड कपपूर्वी मौलवींचे आशीर्वाद घेण्यासाठी पाकिस्तानची टीम गेली होती. त्यावेळी मौलानानं स्पर्धेतील पाकिस्तानच्या टीमची कामगिरी ही खेळाडूंच्या नाही तर अल्लाहच्या हातामध्ये आहे, असा कानमंत्र दिला होता. 2019 च्या वर्ल्डकमध्येही पाकिस्तानची टीम पहिल्या फेरीच्या पुढे गेली नाही.
पाकिस्तानच्या क्रिकेटची गेल्या काही वर्षात झपाट्यानं घसरण का झाली? हा प्रश्न तुम्हाला एक क्रिकेट फॅन म्हणून पडला असेल. तर या प्रश्नाचं उत्तर समजण्यासाठी पाकिस्तान क्रिकेटच्या सर्वोच्च वर्तुळात वावरणाऱ्या ‘इंझमाम उल हकचा (Inzamam-ul-Haq) खरा चेहरा काय आहे?’ हे तुम्हाला समजलं पाहिजे. तो चेहरा समजण्यासाठी इंझमामच्या वाढदिवसाशिवाय दुसरा योग्य दिवस नाही.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.