फोटो – सोशल मीडिया

कोरोना व्हायरसमुळे स्थगित झालेली आयपीएल स्पर्धा (IPL 2021) 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होत आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) या मॅचनं दुसऱ्या टप्प्याला सुरूवात होईल. हा टप्पा सुरू होण्यापूर्वी प्रमुख खेळाडूंनी माघार घेतल्यानं टीमना फटका बसला आहे. या खेळाडूंनी बायो-बबल तसंच आगामी T20 वर्ल्ड कपचं कारण देत स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याचवेळी त्यांच्या माघारीमुळे अन्य खेळाडूंसाठी आयपीएलचं दार उघडलं आहे. यंदा आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणारे 3 खेळाडू (IPL 2021 New Player) त्यांच्या टीमसाठी गेमचेंजर ठरणार आहेत.

एडेन मार्करम (Aiden Markram)

आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये नंबर 1 वर असलेला बॅट्समन डेव्हिड मलान (Dawid Malan) यानं आयपीएलच्या तोंडावर स्पर्धेतून माघार घेतली. भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील टेस्ट सीरिजचा सदस्य असलेल्या मलाननं इंग्लंडच्या अन्य खेळाडूंप्रमाणे वैयक्तिक कारणांमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. मलानच्या जागी पंजाब किंग्सनं (Punjab Kings) दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक बॅट्समन एडेन मार्करमचा समावेश केला आहे.

2014 साली दक्षिण आफ्रिकेनं अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. त्या टीमचा मार्करम कॅप्टन होता. आता दक्षिण आफ्रिकेचा भावी कॅप्टन म्हणूनही त्याच्याकडं पाहिलं जात आहे. मार्करमनं दक्षिण आफ्रिकेकडून आत्तापर्यंत 15 T20 मॅच खेळल्या असून यामध्ये 147.40 च्या स्ट्राईक रेटनं 426 रन केले आहेत. यामध्ये 4 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे.

पहिल्या मॅचमध्ये हॅटट्रिक, शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीची विकेट आणि वर्ल्ड कप विजेतेपद

दक्षिण आफ्रिकेनं नुकतीच वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धची T20 सीरिज जिंकली आहे. या विजयात मार्करमचा मोलाचा वाटा होता. त्याची ऑफ स्पिन बॉलिंग देखील यूएईच्या पिचवर उपयुक्त आहे. पंजाबच्या मिडल ऑर्डरमध्ये एका तगड्या बॅट्समनची गरज आहे. ती गरज मार्करम पूर्ण करू (IPL 2021 New Player) शकतो.

वानेंदू हसरंगा (Waindu Hasaranga)

भारताविरुद्ध झालेल्या T20 सीरिजमध्ये चांगली कामगिरी केल्याचं बक्षिस हसरंगाला मिळालं आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (RCB) श्रीलंकेच्या या लेगस्पिनरचा टीममध्ये समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडम झम्पानं माघार घेतल्यानं हसरंगाची पहिल्यांदाच आयपीएलमध्ये निवड झाली आहे.

हसरंगा हा T20 क्रिकेटमध्ये अचूकतेसोबतच विकेट घेणारा बॉलर म्हणून प्रसिद्ध आहे. राशिद खानप्रमाणेच बॅट्समन बचावात्मक खेळत असतानाही विकेट घेण्याची त्याची क्षमता आहे. भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये हे पाहयला मिळालं होतं. हसरंगा लोअर ऑर्डरमधील उपयुक्त बॅट्समन देखील आहे. ‘टॉप हेवी’ अशी ओळख असलेल्या आरसीबीसाठी त्याची बॅटींग क्षमता उपयोगी पडणार (IPL 2021 New Player) आहे.

नॅथन इलिस (Nathan Ellis)

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात पंजाब किंग्सला मोठा फटका बसला आहे. झाय रिचर्डसन आणि रिले मेरिडेथ या पंजाबच्या दोन फास्ट बॉलर्सनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. यावर्षी झालेल्या आयपीएल लिलावात (IPL 2021 Auction) या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी पंजाबनं मोठी बोली लावली होती. या दोघांनी माघार घेतल्यानंतर पंजाबनं नॅथन एलिस या ऑस्ट्रेलियन बॉलरचा टीममध्ये समावेश केला आहे.

IPL 2021 स्थगित झाल्यानं ‘या’ 5 फ्लॉप स्टार्सनी सोडला सुटकेचा निश्वास

बांगलादेश विरुद्ध झालेल्या T20 सीरिजमध्ये पदार्पणातील मॅचमध्येच हॅट्ट्रिक घेणारा पहिला बॉलर होण्याचा पराक्रम इलिसनं केला आहे. डेथ ओव्हर्समध्. चांगली बॉलिंग करण्याची एलिसची क्षमता आहे. पंजाबकडं याच कामासाठी ख्रिस जॉर्डन आहे. पण त्याच्या कामगिरीत सातत्य नाही. त्यामुळे आता जॉर्डनच्या जोडीला तसंच तो फॉर्मात नसेल तर त्याच्या शिवाय आणखी एक डेथ बॉलर पंजाबला मिळाला आहे. स्लोअर बॉलचा चांगला वापर करु शकणारा इलिस यूएईच्या पिचवर पंजाबसाठी महत्त्वाचा ठरणार (IPL 2021 New Player) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: