फोटो- ट्विटर

आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याची (IPL 2021, Phase 2) सुरुवात सनसनाटी झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यानं कॅप्टनसी सोडण्याची घोषणा केली आहे. या आयपीएलनंतर विराट आरसीबीची (RCB) कॅप्टनसी सोडणार आहे. विराट 2013 पासून आरसीबीचा कॅप्टन आहे. आता त्याने हे पद सोडणार असल्याची घोषणा केल्यानंतर टीमचा कॅप्टन कोण होणार? याची चर्चा (Who Replace Virat?) सुरू झाली आहे. विराटचा उत्तराधिकारी म्हणून 3 खेळाडूंची नावं आघाडीवर आहेत.

एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमचा मजबूत खांब म्हणजे एबी डीव्हिलियर्स. विराट 2008 पासून तर डीव्हिलियर्स 2011 पासून आरसीबीसोबत आहे. गेल्या दहा वर्षांपासून आरसीबीची टीम म्हंटलं की विराट आणि डीव्हिलियर्स या दोन खेळाडूंची नावं सर्वात प्रथम डोळ्यासमोर येतात.

डीव्हिलियर्सकडं आंतरराष्ट्रीय स्तरावर कॅप्टनसी करण्याचा अनुभव आहे. आरसीबीचे मॅनेजमेंटशी त्याचे संबंध चांगले आहेत. तसंच खेळाडूंमध्येही त्याच्याबद्दल आदराची भावना आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विराट कोहलीचा तो जवळचा मित्र आहे. त्यामुळे पुढील काळात विराटकडूनही त्याला पूर्ण सहकार्य मिळेल. डीव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला आहे. पण, त्याच्या बॅटींगमधील टच हरवलेला नाही. तसंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसल्यानं त्याच्याकडं आरसीबीला देण्यासाठी भरपूर वेळ आहे. ही गोष्ट देखील डीव्हिलियर्सच्या पथ्यावर (Who Replace Virat?) पडणारी आहे.

डेव्हिड वॉर्नर (David Warner)

आयपीएल क्रिकेटमधील प्रमुख चेहरा. वॉर्नर यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद (SRH) टीमचा कॅप्टन होता. वॉर्नरच्याच कॅप्टनसीमध्ये हैदराबादनं 2016 साली आयपीएल स्पर्धा जिंकली. तसंच 2017, 19 आणि 20  साली ‘प्ले ऑफ’ मध्ये धडक मारली. हैदराबादच्या या यशात वॉर्नरच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा मोठा वाटा आहे. कॅप्टन म्हणून त्यानं नेहमीच आघाडीवर राहत टीमला विजय मिळवून दिले आहेत.

डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2021) घसरला. त्यामुळे स्पर्धेच्या पूर्वार्धात त्याची कॅप्टनसीवरुन हकालपट्टी करण्यात आली. इतकंच नाही तर त्याला टीममधूनही वगळण्यात आलं होतं. हैदराबाद मॅनेजमेंट आणि वॉर्नरचे संबंध आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction)  हैदराबाद वॉर्नरला करारमुक्त करण्याची दाट शक्यता आहे.

Explained सर्वात बेस्ट डेव्हिड वॉर्नरला हैदराबादनं का काढलं?

वॉर्नरकडं कॅप्टनसीचा यशस्वी अनुभव आहे. नवी टीम घडवण्याची क्षमता देखील त्यानं आयपीएलमध्ये दाखवून दिली आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल ऑक्शनमध्ये आरसीबी मॅनेजमेंट वॉर्नरला खरेदी करुन कॅप्टन (Who Replace Virat?) करु शकते.

मयांक अग्रवाल (Mayank Agarwal)

पंजाब किंग्ज (Punjab Kings) बॅटींग ऑर्डरचा कणा असलेल्या मयांकनं मागील दोन आयपीएल सिझनमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मयांकची सर्वात जमेची बाजू म्हणजे तो कर्नाटकचा खेळाडू आहे. त्यामुळे आरसीबी मॅनेजमेंट स्थानिक फॅन्सशी कनेक्ट होण्यासाठी मयांकला पुढील मेगा ऑक्शनमध्ये खरेदी करुन कॅप्टन करु शकते.

राहुल द्रविडच्या गावातील सेहवागला कन्फर्म जागेची प्रतीक्षा!

मयांक अग्रवाल आरसीबीकडून यापूर्वी खेळला आहे. आरसीबी आणि टीम इंडिया दोन्हीमध्येही त्याला विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्याचबरोबर कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट खेळत असल्यानं त्याला स्थानिक खेळाडूंचीही चांगली माहिती आहे. त्याच्या या अनुभवाचा फायदा आरसीबी मॅनेजमेंटला होऊ शकतो. तसंच मयांक सध्या 30 वर्षाचा आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच वर्ष तो कॅप्टनसी सांभाळू शकतो. त्यामुळे पुढील वर्षा पंजाबच्या मॅनेजमेंटनं मयांकला करारमुक्त केलं तर आरसीबी मयांकचा कॅप्टन करण्याच्या उद्देशानं (Who Replace Virat?) टीममध्ये समावेश करण्याची दाट शक्यता आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: