फोटो – ट्विटर/@WasimJaffer14

दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) या आयपीएल सिझनमध्ये मोठ्या विजयासह सुरुवात केली आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मिळवलेल्या विजयात पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याचं मोठं योगदान होतं. पृथ्वीनं फक्त 38 बॉलमध्ये 72 रन काढले. त्याच्या फटकेबाजीचं महान क्रिकेटपटून सुनील गावस्कर यांनी देखील कौतुक केलं. डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीमुळे पृथ्वीवर सर्वत्र टीका होत होती. त्याची टीममधील जागा गेली. त्या सेटबॅकनंतर मागच्या काही महिन्यात पृथ्वीच्या बॅटमधून ‘रनवर्षाव’ सुरु झाला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आम्रे (Pravin Amre) यांच्यासोबत घालवलेल्या 5 दिवसांमुळे (Prithvi 5 day magic) पृथ्वीचं संपूर्ण आयुष्य बदललं.

 आम्रेंचा कोच म्हणून अनुभव काय?

प्रवीण आम्रे सध्या दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक कोच आहेत. मागील आयपीएलमध्ये ते मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये होते. मुंबई क्रिकेटची पंढरी असलेल्या शिवाजी पार्क (Shivaji Park) जिमखान्यातही त्यांनी अनेक क्रिकेटपटू घडवले आहेत. श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे या टीम इंडियातील खेळाडूंसोबत त्यांनी काम केलंय. त्याचबरोबर मागील आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्या बदललेल्या तंत्रातही आम्रे यांचा वाटा आहे.

पृथ्वी शॉ 13 वर्षांचा होता तेंव्हापासून आम्रे त्याचा खेळ जवळून पाहत आहे. त्याला एअर इंडियाची स्कॉलरशिप मिळवून देण्यातही आम्रे यांचा वाटा होता. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये आम्रे दाखल झाल्यानंतर पृथ्वीला त्यांच्यापेक्षा चांगला गुरु (Prithvi 5 day magic)  कुणीही नव्हता.     

IPL 2021: ‘पृथ्वी शॉ ने माझं ऐकलं नाही’, रिकी पॉन्टिंगचा दावा!

पृथ्वीला दाखवला आरसा

प्रवीण आम्रे यांनी ESPN Cricinfo ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बदललेल्या पृथ्वीची गोष्ट सांगितली आहे. या मुलाखतीमध्ये आम्रे म्हणतात, “ मी पृथ्वीला आरसा दाखवला. तू सध्या कुठं आहेस? तुला टीममधून वगळण्यात आलंय. मागच्या आयपीएलमध्येही तुझी कामगिरी समाधानकारक नव्हती. तू आत्ताच अपयश अनुभवलं आहेस. या अपयशानंतर तू कशी भरारी घेणार? एक गोष्ट तुझ्या बाजूची आहे, ती म्हणजे तू फक्त 21 वर्षांचा आहेस.”

पुढील वर्षी होणाऱ्या मेगा ऑक्शनमुळे हा आयपीएल सिझन पृथ्वीसाठी महत्त्वाचा आहे. “तुझ्यातील टॅलेंटचा विचार फ्रँचायझी करणार नाहीत. फक्त रन केले तरच तू टिकशील” या शब्दात आम्रे यांनी पृथ्वीला आरसा दाखवला. (Prithvi 5 day magic)

कसं बदललं तंत्र?

प्रवीण आम्रे यांनी सुरुवातीला पृथ्वी शॉ याची बॅटींग सर्व पद्धतीनं रेकॉर्ड केली. त्याचबरोबर त्यांनी मागील आयपीएलमध्ये पृथ्वी कसा आऊट झाला होता? याचा त्यांनी अभ्यास केला होता. मागच्या आयपीएलमध्ये पृथ्वी फार कमी वेळा चांगल्या बॉलवर आऊट झाला. चुकीचे जजमेंट, खराब शॉट सिलेक्शन, पायांची सदोष हलचाल याचा फटका पृथ्वीला बसत होता. त्याचबरोबर तो फॉर्मात नसल्यानं बॅटचा पूर्ण वापर करत नव्हता. आम्रेंनी पृथ्वीच्या या चुकांवर काम केलं.

बॅट्समन खेळताना त्याचं लक्ष हे बॉलरकडं असतं. बॅटची हलचाल त्याच्या डोळ्याच्या मागे होत असल्यानं अनेकदा ती त्याच्या लक्षात येत नाही. पृथ्वीची बॅट त्याच्या शरिराच्या जवळ जास्तीत जास्त सरळ कशी स्विंग होईल, यावर आम्रेंनी त्यांच्या 5 दिवसांच्या प्रशिक्षणात भर दिला. त्याचबरोबर पृथ्वी खेळताना त्याच्या पायांची हलचाल जास्त करत असे. त्याचा खेळण्यातील बेस स्थिर नव्हता. हो दोषही आम्रेंनी पृथ्वीला दाखवला. (Prithvi 5 day magic)

IPL 2021 DC Preview : ऋषभ पंतच्या कॅप्टनसीकडं सर्वांचं लक्ष

‘100 बॉल खेळ’

खेळण्यातील तंत्राबरोबरच पृथ्वीला मानसिक रित्या तयार करणे ही देखील आम्रेंवरील मोठी जबाबदारी होती. यावर्षी झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये आम्रे यांनी पृथ्वीला 100 बॉल खेळण्याचं लक्ष दिलं. तो 100 बॉल मैदानात राहिला तर रन आपोआप होतील, हा आम्रेंना विश्वास होता. त्यामुळेच त्यांनी त्याला 100 बॉल खेळण्याचा सल्ला दिला.

पृथ्वीनं त्या प्रमाणे काम करण्यास सुरुवात केली. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पृथ्वी शॉ ने 800 पेक्षा जास्त रन काढून इतिहास केला. यावर्षी दिल्ली कॅपिटल्सनं विजेतेपद पटकावलं तर त्यात पृथ्वी शॉ याचे योगदान महत्त्वाचे असणार आहे.

दोन कोचमधील फरक

आयपीएल स्पर्धा सुरु होण्याच्या काही दिवस आधी दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगनं (Ricky Ponting) ऑस्ट्रेलियन मीडियाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यानं मागच्या आयपीएलमधील पृथ्वीच्या मनस्थितीवर टीका केली होती. मुख्य प्रशिक्षकाला खेळाडूला समज देण्याचा अधिकार आहे. पण महत्त्वाची स्पर्धा सुरु होताना विदेशी मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये पृथ्वीचे वाभाडे काढण्याच्या ‘टायमिंग’चा पॉन्टिंगचा हेतू काय आहे?  हा प्रश्न कायम आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वी शॉ चे ‘तांडव’, विक्रमांचा गौरीशंकर सर!

पॉन्टिंगनं जाहीर वस्त्रहरण केलं मात्र त्याचवेळी प्रवीण आम्रेंनी काही दिवसांपूर्वी पृथ्वीच्या खेळावर घेतलेली मेहनत महत्त्वाची आहे. त्यांची पाच दिवसांची हे मेहनत (Prithvi 5 day magic) फक्त दिल्ली कॅपिटल्ससाठी नाही तर टीम इंडियासाठी देखील उपयोगी ठरणार आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: