
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 14 व्या सिझनचं काऊंटडाऊन सुरु झालंय. या स्पर्धेत पहिल्यांदाच अजिंक्यपद मिळवण्याच्या उद्देशानं मैदानात उतरणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) धक्का बसलाय. त्यांचा कॅप्टन आणि टीम इंडियाचा मीडल ऑर्डरचा खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे या स्पर्धेतून आऊट झालाय. श्रेयसच्या अनुपस्थितीमध्ये दिल्लीची कॅप्टनसी कोण करणार? (Who lead Delhi Capitals?) हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. अर्थात दिल्लीच्या टीममध्ये अनेक अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे कॅप्टनसीसाठी एक नाही तर पाच पर्याय दिल्लीसमोर आहेत.
ऋषभ पंत (Rishabh Pant)
ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्सचा व्हाईस कॅप्टन आहे. त्यामुळे कॅप्टनच्या अनुपस्थितीमध्ये दिल्लीच्या कॅप्टनसीसाठी सर्वात प्रबळ तो दावेदार आहे. मागच्या आयपीएलनंतर पंत चांगल्याच फॉर्मात आहे. टीम इंडियातील तीन टीममध्ये त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.
फॉर्मातील खेळाडूला कॅप्टन केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम टीमवर होईल. त्याचबरोबर पंत हा दिल्लीचे मॅनेजमेंट आणि हेड कोच रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) यांच्या जवळचा आहे. तसंच पंत हा दिल्लीकर देखील आहे. त्यामुळे कॅप्टनसीमध्ये सर्वात आघाडीवर (Who lead Delhi Capitals?) पंतचे नाव आहे.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (India tour of Australia) विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणेनं चांगली कॅप्टनसी केली होती. त्यामुळे रहाणेला दिल्ली कॅपिटल्सची कॅप्टनसी द्यावी अशी मागणी होत आहे.
रहाणेनं यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स या टीमची कॅप्टनसी देखील केली आहे. मात्र टी20 टीममध्ये रहाणेचा समावेश हा नक्की मानला जात नाही. पृथ्वी शॉ यंदा फॉर्मात असल्यानं रहाणेला तिसऱ्या क्रमांकावर फक्त कॅप्टन म्हणून खेळवण्याची चैन दिल्लीच्या मॅनेजमेंटला परवडणार का? हा प्रश्न आहे.
( वाचा : IPL 2021 DC : दिल्ली कॅपिटल्सच्या ‘एक पाऊल पुढे’ टाकण्यातील अडथळे कायम! )
आर. अश्विन (Ravichandran Ashwin)
ऋषभ पंतप्रमाणे आर. अश्विन देखील सध्या उत्तम फॉर्मात आहे. तो टीम इंडियाचा आणि दिल्ली कॅपिटल्सचा आघाडीचा स्पिनर आहे. अश्विन आव्हानाला नेहमीच तयार असतो. मागील आयपीएलमध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून चांगली कामगिरी केली आहे.
त्याचबरोबर एक बुद्धीमान खेळाडू म्हणून देखील अश्विन ओळखला जातो. आयपीएल स्पर्धेत त्याने यापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब टीमचं नेतृत्व देखील केलं आहे. या सर्व गोष्टी अश्विनसाठी जमेच्या आहेत. पण फिटनेस हा अश्विनसाठी नेहमीच काळजीचा विषय राहिला आहे. तसंच दिल्लीचा हेड कोच रिकी पॉन्टिंगसोबत देखील अश्विनचं फारसं सख्य नाही. त्यामुळे या दोन गोष्टी त्याच्या कॅप्टन बनण्यात (Who lead Delhi Capitals?) अडचणीच्या ठरु शकतात.
शिखर धवन (Shikhar Dhwan)
टीम इंडिया आणि दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी खेळाडू. मागच्या आयपीएल सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून सर्वात जास्त रन देखील शिखर धवननं काढले होते. धवनकडे आयपीएलचा अगदी पहिल्या सिझनपासून अनुभव आहे. टीममधील एक सीनियर खेळाडू म्हणून त्याच्या नावाचा विचार देखील टीम मॅनेजमेंट करु शकते. त्याचबरोबर धवन देखील ऋषभ पंत प्रमाणे दिल्लीकर आहे.
स्टीव्ह स्मिथ (Steve Smith)
दिल्ली कॅपिटल्सच्या कॅप्टनसीसाठी एकमेव विदेशी नाव स्टीव्ह स्मिथचं चर्चेत आहे. स्मिथ यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन होता. त्यानं यापूर्वी आयपीएलमध्ये एकूण 43 मॅचमध्ये कॅप्टनसी केली आहे. त्यापैकी 25 मॅच जिंकल्या आहेत.
( वाचा : IPL 2021 Schedule : तुमच्या प्रश्नांच्या सर्व उत्तरासह ‘इथे’ पाहा संपूर्ण वेळापत्रक )
स्मिथसाठी कॅप्टन आणि खेळाडू म्हणून मागील सिझन निराशाजनक ठरला. खराब कामगिरीमुळेच त्याची राजस्थान रॉयल्सनं हकालपट्टी केली. यंदा स्मिथला दिल्ली कॅपिटल्सनं करारबद्ध केलं आहे. स्मिथ दिल्लीकडून एक मॅच खेळण्यापूर्वीच त्याच्यावर पॉन्टिंग कोट्यातील खेळाडू हा शिक्का बसला आहे. रहाणेप्रमाणेच स्मिथचा T20 मधील स्ट्राईक रेट फार ग्रेट नाही. तसंच त्याची टीममधील जागा देखील फिक्स नाही.
स्मिथला खेळवलं तर हेटमायर सारख्या आक्रमक खेळाडूला टीमच्या बाहेर बसावं लागेल. त्यामुळे टीमचं संतुलन बिघडवून स्मिथला खेळवण्याचा आणि स्मिथला खेळवण्यासाठी त्याला थेट कॅप्टन करण्याचा (Who lead Delhi Capitals?) निर्णय रिकी पॉन्टिंग घेणार का हे लवकरच स्पष्ट होईल.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.