फोटो – ट्विटर/@PunjabKingsIPL

इंडियन प्रीमियर लीगचा 14 वा सिझन (Indian Premier League 2021) 9 एप्रिलपासून सुरु होत आहे. आयपीएल स्पर्धेत पंजाबच्या टीमला आजवर एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही. अनिल कुंबळे (Anil Kumble) सारखा हुशार व्यक्ती त्यांचा मुख्य प्रशिक्षक आहे. तरीही या टीमला मागील सिझनमध्ये ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करण्यात अपयश आले होते. यावर्षी पंजाबनं पुन्हा जोरानं तयारी सुरु केली आहे. यंदा ते पंजाब किंग्स (Punjab Kings) या नव्या नावानं स्पर्धेत उतरत आहेत. पंजाब किंग्सनं या आयपीएलमध्ये शाहरुख खान (Shahrukh Khan) या नव्या दमाच्या ऑलराऊंडरचा टीममध्ये प्रथमच समावेश केला आहे. शाहरुखची फटकेबाजी पाहून कायरन पोलार्डची (Kieron Pollard) आठवण येते, अशी प्रशंसा अनिल कुंबळेनं (Kumble on Shahrukh Khan) केली आहे.

कोण आहे नवा पोलार्ड?

यावर्षी झालेल्या सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy 2021) शाहरुख खानच्या फटकेबाजीनं सर्वांनाच प्रभावित केलं होतं. दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik)  कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या शाहरुखच्या फटकेबाजीचा तामिळनाडूच्या विजेतेपदामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. शाहरुखच्या याच फटकेबाजीमुळे प्रभावित होऊन पंजाब किंग्सनं (PBKS) त्याला साडे पाच कोटींची बोली लावून खरेदी केलं.

काय म्हणाला कुंबळे?

शाहरुखचा नेटमधील खेळ पाहून पाहून मला पोलार्डची आठवण येते. त्यावेळी मी मुंबई इंडियन्स सोबत होतो. नेटमध्ये पोलार्ड खूप खतरनाक वाटत असे. मी त्याला नेटमध्ये थोडीफार बॉलिंग करत असे. मी त्याला नेहमी सरळ शॉट न मारण्याची सूचना करत असे.

मी आता हा प्रयत्न देखील करत नाही. कारण आता माझं वय वाढलं आहे. माझं शरीर मला परवानगी देत नाही. त्यामुळे मी शाहरुखला बॉलिंग करत नाही.’ असं कुंबळेनं त्याच्या नव्या शिष्याबद्दल (Kumble on Shahrukh Khan) सांगितलं आहे.

( वाचा: IPL 2020, कशी झाली किंग्ज इलेव्हन पंजाबची कामगिरी? )

पंजाब किंग्सची पहिली मॅच 12 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबईमध्ये होणार आहे. केएल राहुल (KL Rahul) पंजाबचा कॅप्टन असून या टीममध्ये मयांक अग्रवाल, ख्रिस गेल आणि निकोलस पूरन सारखे आक्रमक बॅट्समन आहेत. पंजाबला लोअर मिडल ऑर्डरमध्ये एका आक्रमक बॅट्समनची गरज होती. त्यासाठीच त्यांनी शाहरुख खानची टीममध्ये निवड केली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: