फोटो – ट्विटर /wisdencricket

कोलकाता नाईट रायडर्ससाठी (KKR) मागील दोन सिझन निराशाजनक ठरले. दोन वेळेस चॅम्पियन असलेल्या टीमला सलग दोन सिझन ‘प्ले ऑफ’ गाठण्यात अपयश आलं. केकेआरनं मागचा सिझन सुरु असताना दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik)  कॅप्टनसीहून काढून इऑन मॉर्गनला (Eoin Morgan) कॅप्टन केले होते. केकेआरनं या लिलावापूर्वी त्यांच्या टीममध्ये फार बदल केलेला नाही. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी गुंतवणूक केलेल्या तरुण खेळाडूंवर यंदाही विश्वास ठेवला आहे. त्याचबरोबर टीमचा कोअर देखील कायम ठेवला आहे. तरीही मागील सिझनमध्ये जाणवलेल्या उणीवा दूर करण्याचा त्यांचा या ऑक्शनमध्ये (KKR in Auction) प्रयत्न असेल.

( वाचा : कार्तिक गेला, मॉर्गन आला, केकेआरचा गोंधळ आणखी वाढला! )

गिलला जोडीदार हवा

केकेआरला मागील संपूर्ण स्पर्धेत (IPL 2020) शुभमन गिलला (Shubhman Gill) भरवशाचा ओपनिंग जोडीदार मिळाला नाही. सुनील नरीन, राहुल त्रिपाठी, टॉम बँटन, नितीश राणा असे वेगवेगळे पर्याय केकेआरनं स्पर्धेत वापरले. त्यापैकी एकही फार चांगला नाही.

यंदा ही कमतरता भरुन काढण्यासाठी केकेआरला चांगला ओपनर बॅट्समन टीममध्ये हवा असेल. त्यासाठी कॅप्टन मॉर्गनच्या देशातल्या जेसन रॉयला (Jason Roy) करारबद्ध करण्याचा केकेआरचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच (Aron Finch) हा देखील केकेआरसाठी ओपनिंगला चांगला पर्याय आहे.

( वाचा : IPL 2021: चेन्नईत 18 फेब्रुवारीला होणार मिनी ऑक्शन, वाचा कोणत्या टीममध्ये किती जागा शिल्लक? )

ऑलराऊंडरची आवश्यकता

कोलकाता नाईट रायडर्सच्या टीममध्ये सध्या आंद्रे रसेल (Andre Russell) आणि सुनील नरीन (Sunil Narine) हे दोनच ऑल राऊंडर आहेत. यापैकी रसेलच्या फिटनसेचा नेहमीच प्रश्न असतो. तर नरीनच्या बॅटींगमधील प्रभाव हल्ली ओसरला आहे. त्यामुळे केकेआरला चांगल्या ऑल राऊंडरची मोठी आवश्यकता आहे.

केकेआरकडं या जागेसाठी शिवम दुबे, जिमी निशाम, कृष्णप्पा गौतम आणि फॅबियन अ‍ॅलेन हे काही चांगले पर्याय आहेत.

दिनेश कार्तिकला पर्याय कोण?

केकेआरनं या लिलावापूर्वी (KKR in Auction) निखिल नाईकला करारमुक्त केलं आहे. आता त्यांच्या टीममध्ये दिनेश कार्तिक आणि टीम सॅफर्ट हे दोन विकेट किपर आहेत. यापैकी सॅफर्टची विदेशी खेळाडूंच्या मर्यादेमुळे अंतिम 11 मध्ये निवड होण्याची शक्यता कमी आहे.

दिनेश कार्तिकला दुखापत झाल्यास त्याला पर्याय म्हणून भारतीय विकेट किपर केकेआरला लागेल. मुश्ताक अली स्पर्धा गाजवलेला केरळचा मोहम्मद अझहरुद्दीनला केकेआर करारबद्ध करु शकते.

( वाचा : मोहम्मद अझहरुद्दीननं काढले 54 बॉल्समध्ये 137 रन्स, 11 सिक्स आणि 9 फोरसह केले अनेक रेकॉर्ड्स! )

हुकमी स्पिनरची गरज

केकेआरकडं सध्या सुनील नरीन, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे तीन स्पिन बॉलर आहेत. यापैकी नरीनच्या बॉलिंगवर मागच्या आयपीएलमध्ये शंका उपस्थित करण्यात आली होती. कुलदीपनं केकेआरच्या मॅनेजमेंटचा विश्वास गमावला आहे. तर वरुण चक्रवर्ती मागच्या आयपीएलपासून दुखापतीमुळे फार खेळलेला नाही. त्यामुळे केकेआरला विकेट मिळवून देणाऱ्या हुकमी स्पिनरची आवश्यकता असेल.

अफगाणिस्तानचा मुजीब उर रेहमान आणि कोलकाताचाच जुना स्पिनर पियुष चावला यापैकी एखादा स्पिनर केकेआरची ही गरज पूर्ण करु शकतो.

केकेआरनं कायम ठेवलेले खेळाडू : इऑन मॉर्गन, आंद्रे रसेल दिनेश कार्तिक, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, सुनील नरीन, पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती आणि टीम सॅफर्ट

केकेआरनं करारमुक्त केलेले खेळाडू : ख्रिस ग्रीन, एम. सिद्धार्थ, निखिल नाईक, सिद्धेश लाड आणि टॉम बँटन

शिल्लक रक्कम – 10 कोटी 75 लाख  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: