फोटो – Mumbai Indians

खेळाडूंना लवकर हेरणे, त्यांच्यावर विश्वास ठेवणे आणि त्यांच्या खराब काळात साथ देणे हे मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) कार्यपद्धतीचं वैशिष्ट्य आहे. लसिथ मलिंगा, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड ही याची प्रमुख उदाहरणे. या खेळाडूंचा मुंबई इंडियन्सच्या विजेतेपदात मोठा वाटा आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखालील खेळणाऱ्या या टीमसाठी मागचा ‘ड्रीम सिझन’ होता. आयपीएल इतिहासातील आजवरची ही ‘बेस्ट’ टीम असलेली मुंबई इंडियन्स यंदाही नव्या रणणिनितीसह या आयपीएल ऑक्शनमध्ये (MI Auction Plan) उतरणार आहे.

( वाचा : IPL 2020 मुंबई इंडियन्स : ‘बेस्ट टीमचे बेस्ट विजेतेपद’ )

विदेशी फास्ट बॉलर कोण?

अंतिम 11 मध्ये दोन विदेशी फास्ट बॉलरसह खेळणे ही मुंबई इंडियन्सची कार्यपद्धती आहे. या आयपीएलपूर्वी त्यांनी नॅथन कुल्टर नाईल, मिचेल मॅकलेघान आणि जेम्स पॅटीन्सन यांना करारमुक्त केलं आहे. तर अनुभवी लसिथ मलिंगा निवृत्त झाला आहे. त्यामुळे ट्रेंट बोल्ट हा एकच विदेशी फास्ट बॉलर मुंबई इंडियन्सकडं आहे.

ट्रेंट बोल्टला साथ देण्यासाठी सध्या न्यूझीलंडमध्ये धमाल करणारा त्याच देशबांधव कायले जेमिन्सनला (Kyle Jamienson) मुंबई इंडियन्स करारबद्ध करु शकते. भावी आंद्रे रसेल होण्याची क्षमता त्याच्यात आहे. तसंच तो मुंबई इंडियन्सच्या लाँग टर्म प्लॅनमध्येही फिट बसू शकतो.

जेमिन्सनला करारबद्ध करण्यात मुंबई इंडियन्सला अपयश आलंच तर जेसन बेहनड्रॉफ आणि झाय रिचर्डसन हे फास्ट बॉलर देखील मुंबई इंडियन्सचा रडारवर असतील.

( वाचा : IPL 2021 Auction: आरसीबीला पहिल्या विजेतेपदासाठी कुणाला घ्यावं लागेल? )

शिवम दुबे दाखल होणार?

हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे ऑल राऊंडर मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये आहेत. त्यांच्या जोडीला मुंबई इंडियन्स शिवम दुबेचा (Shivam Dube) टीममध्ये समावेश होऊ शकतो. शिवमला आरसीबीनं आश्चर्यकारकरित्या करारमुक्त केलं होतं. शिवम या सिझनमध्ये फॉर्मात आहे. तसंच मुंबईकरही आहे. त्याचा मुंबई इंडियन्सला वानखेडेवर चांगला उपयोग (MI Auction Plan) होऊ शकतो.

अर्जुन तेंडुलकरला घेणार का?

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन (Arjun Tendulkar) या लिलावात पहिल्यांदाच सहभागी झाला आहे. त्याचं नाव लिलावासाठी पुकारलं जाईल तेंव्हा मुंबई इंडियन्स बोली लावणार का? याची देखील सर्वांना उत्सुकता असेल. मुंबईची सध्याची टीम पाहता त्याला या सिझनमध्ये अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही. मात्र अर्जुनचा टीममधील समावेश हा टीम मॅनेजमेंटसाठी कदाचित इमोशनल निर्णय असू शकतो.

( वाचा : SMAT: अर्जुन सचिन तेंडुलकरचं मुंबईकडून पदार्पण, पहिल्या मॅचमध्ये घेतली एक विकेट -VIDEO )

स्पिन बॉलर कोण?

मुंबई इंडियन्सचा मुख्य स्पिन राहुल चहरचा फॉर्म मागील स्पर्धेच्या शेवटी हरपला होता. त्यामुळे यंदा मुंबई इंडियन्स आणखी एक चांगल्या स्पिनरच्या शोधात असेल. त्यासाठी मुंबई इंडियन्सचाच माजी खेळाडू आणि अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंग, सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील फायनलचा हिरो एम. सिद्धार्थ आणि नागालँडचा तरुण ऑफ स्पिनर ख्रीविस्तो केन्स (Khrievisto Kense) हे मुंबई इंडियन्सपुढे पर्याय आहेत.

त्याचबरोबर नुकतीच झालेली सय्यद मुश्ताक अली स्पर्धा गाजवलेले लुकमन मारिवाला (Lukman Meriwala) आणि चेतन सकारिया (Chetan Sakariya) या फास्ट बॉलर्सनाही मुंबई इंडियन्स भविष्याचा विचार करुन या ऑक्शनमध्ये खरेदी करु शकते.

( वाचा : IPL 2021: मुंबई इंडियन्सला प्रभावित करणारा नागालँडचा 16 वर्षांचा बॉलर, पाहा VIDEO )

मुंबई इंडियन्सनं कायम ठेवलेले खेळाडू : रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, आदित्य तरे, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, अनुकूल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी आणि मोहसिन खान

मुंबई इंडियन्सनं करारमुक्त केलेले खेळाडू : लसिथ मलिंगा, मिचेल मॅकलेघन, जेम्स पॅटिन्सन, नॅथन कुल्टर-नाईल, शेरफेन रुदरफोर्ड, प्रिन्स बलवंत राय आणि दिग्विजय देशमुख

शिल्लक रक्कम : 15 कोटी 35 लाख

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: