
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची (RCB) दरवर्षी IPL सुरु होण्यापूर्वी भरपूर हवा असते. त्यांच्या फॅन्सना नेहमी ‘हेच आपलं वर्ष’ अशी खात्री असते. पण अजूनही ते वर्ष आलेलं नाही. पहिल्या सिझनपासून IPL खेळत असलेल्या आरसीबीला अजून एकदाही या स्पर्धेचं विजेतेपद जिंकता आलेलं नाही. मागच्या स्पर्धेत त्यांनी चौथा क्रमांक पटकावला होता. या सिझनपूर्वी त्यांनी 10 खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. RCB ला या आयपीएल ऑक्शनमध्ये (RCB in Auction) कोणकोणत्या मुद्यांवर काम करावं लागेल ते पाहूया
टॉप ऑर्डर
आरोन फिंच आणि पार्थिव पटेल आता आरसीबीकडं नाहीत. त्यामुळे देवदत्त पडिक्कलच्या (Devdutt Padikkal) मदतीला एका चांगल्या टॉप ऑर्डर बॅट्समनची RCB ला गरज आहे. पहिल्या तीन क्रमांकावर खेळणारा भक्कम बॅट्समन मिळाला तर विराटला (Virat Kohli) त्याचा नैसर्गिक खेळ करता येईल.
टॉप थ्री पोझिशनसाठी आरसीबीसमोर डेव्हिड मलान, अॅलेक्स हेल्स, स्टीव्ह स्मिथ हे पर्याय आहेत.
( वाचा : IPL 2020 : आरसीबीसाठी पहिले पाढे (नेहमीच) पंचावन्न! )
स्ट्राँग मीडल ऑर्डरची गरज
विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers) यांच्यानंतर अजूनही सशक्त मीडल ऑर्डरचा बॅट्समन न मिळणं हे आरसीबी समोरचं परंपरागत दुखणं आहे. ग्लेन मॅक्सवेलनं (Glenn Maxwell) यंदा आरसीबीकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ती इच्छा RCB मॅनेजमेंटनं (RCB in Auction) मान्य केली आणि मॅक्सवेलनं त्याच्या क्षमतेप्रमाणे खेळ केला तर मीडल ऑर्डरचे बरेच प्रश्न सुटतील.
अतिरिक्त विकेट किपर
एबी डीव्हिलियर्सनं मागच्या सिझनमध्ये विकेट किपिंग केल्यानं आरसीबीच्या समोरचे अनेक प्रश्न सुटले होते. मात्र स्पर्धातत्मक क्रिकेटपासून दूर असलेला 36 वर्षांचा डीव्हिलियर्स संपूर्ण स्पर्धेत हा ताण किती सहन करु शकेल यामध्ये शंका आहे.
आरसीबीकडं जोश फिलिपे (Josh Philippe) हा बिग बॅश लीग गाजवणारा विकेट किपर आहे. मात्र चार विदेशी खेळाडूंच्या मर्यादेमुळे त्याला किती संधी मिळेल याबाबत शंका आहे. त्यामुळे त्यांना या लिलावात भारतीय विकेट किपर खरेदी करावा लागेल. त्यासाठी के.एस. भरत आणि मोहम्मद अझहरुद्दीन हे चांगले पर्याय आरसीबीसमोर आहेत.
( वाचा : वाढदिवस स्पेशल : जेंव्हा रोनाल्डो आणि मेस्सी एकाच टीममध्ये खेळले! )
ऑलराऊंडर हवा
आरसीबीनं त्यांच्या ताफ्यातील मोईन अली, शिवम दुबे आणि ख्रिस मॉरीस हे तिन्ही ऑलराऊंडर करारमुक्त केले आहेत. त्यामुळे आता आरसीबीकडं वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खरेदी केलेला हर्षल पटेल हे तीन पर्याय आहेत. ऑल राऊंडरची टीममधील कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न यंदा आरसीबीच्या मॅनेजमेंटला करावा लागेल.
आरसीबी पुन्हा एकदा ख्रिस मॉरीसला कमी किंमतीमध्ये खरेदी करण्याचा प्रयत्न करु शकते. त्याशिवाय ग्लेन मॅक्सवेल आणि शाकीब उल हसन हे हाय प्रोफाईल पर्याय आरसीसमोर आहेत. डेव्हिड विली आणि मोईस हेन्रीक्स या बॉलिंग ऑल राऊंडरचाही आरसीबी मॅनेजमेंट विचार करु शकते.
कोणता फास्ट बॉलर घेणार?
हर्षल पटेल आणि डॅनियल सॅम्सला खरेदी करुन आरसीबीनं फास्ट बॉलिंगमधील वैविध्य वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्याच वेळी उमेश यादव, इसारु उदाना आणि डेल स्टेन यांची जागा भरुन काढण्यासाठी त्यांना काही चांगल्या फास्ट बॉलर्सची गरज आहे. झाये रिचर्डसन, मोहीत शर्मा आणि नॅथन कुल्टर नाईल हे फास्ट बॉलर्स खरेदीचे पर्याय आरसीबीकडं आहेत.
( वाचा : SMAT: सय्यद मुश्ताक अली स्पर्धा गाजवणाऱ्या ‘या’ बॉलर्सना उघडणार IPL चे दार? )
RCB नं कायम ठेवलेले खेळाडू: विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, अॅडम झम्पा, शाहबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन आणि पवन देशपांडे
RCB नं करारमुक्त केलेले खेळाडू: आरोन फिंच, ख्रिस मॉरीस, मोईन अली, इसारु उडाना, शिवम दुबे, उमेश यादव, पवन नेगी, गुरकीरत मान आणि पार्थिव पटेल
शिल्लक रक्कम – 35 कोटी 40 लाख
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.