इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठं संकट सध्या भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) समोर उभं ठाकलं आहे. कोरॊना व्हायरसमुळे हे संकट निर्माण झालं आहे. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) टीमचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) बॅट्समन स्टीव्ह स्मिथसह (Steve Smith) आयपीएल स्पर्धेत सहभागी असलेले 30 ऑस्ट्रेलियन आयपीएलमधून माघार (Smith, Warner could leave) घेण्याची शक्यता आहे. आयपीएल स्पर्धेत सहभागी असलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू, कॉमेंटॆटर्स आणि कोचिंग स्टाफमधील मंडळी यांचा या 30 जणांमध्ये समावेश आहे.

‘9 News’ नं दिलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियन सरकार बॉर्डर सील करण्याच्या आत या सर्व खेळाडूंना मायदेशी परत जाण्याचे वेध लागले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) अ‍ॅण्ड्रयू टाय (Andrew Tye), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) केन रिचर्डसन (Kane Richardson) आणि अ‍ॅडम झम्पा (Adam Zampa) यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.

ख्रिस लीननं केली मागणी

मुंबई इंडियन्सचा बॅट्समन ख्रिस लीन (Chris Lynn) याने क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (Cricket Australia)  खेळाडूंना परत नेण्यासाठी स्वतंत्र चार्टर्ड विमानाची सोय करण्याची मागणी केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या फिसमधील 10 टक्के रक्कम मिळते. या पैशांचा वापर करुन स्वतंत्र विमानाची सोय बोर्डानं करावी अशी मागणी लिननं केली आहे. ‘आपला आयपीएल स्पर्धा सोडून जाण्याचा कोणताही विचार नाही. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही सोय करावी’ असं लीननं स्पष्ट केलंय.

पाकिस्तान विरुद्धच्या ‘या’ मॅचपूर्वी सचिन 12 रात्र जागा होता!

ऑस्ट्रेलियन खेळाडू का घाबरले?


ऑस्ट्रेलियन सरकारनं नुकतीच भारतामध्ये जाणारी विमानं रद्द केली आहेत. तसंच लवकरच सरकार पुन्हा एकदा बॉर्डर बंद करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी झालेले ऑस्ट्रेलियन खेळाडू सध्या घाबरले आहेत. आपण भारतामध्येच अडकून पडू अशी भीती (Smith, Warner could leave) त्यांना वाटत आहे.

बीसीसीआयचं धोरण काय?

आयपीएल स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होईल. ज्या खेळाडूंना या स्पर्धेतून माघार घ्यायची आहे, त्यांना बीसीसीआय आडकाठी करणार नाही, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं मंगळवारी (26 एप्रिल 2021 रोजी) जाहीर केलं होतं.

बीसीसीआयतर्फे आयपीएल संबंधी सर्व मंडळींसाठी सुरक्षित बायो-बबल तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वांची नियमित कोव्हिड चाचणी देखील होत आहे. मात्र आता 30 ऑस्ट्रेलियन आयपीएल सोडण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त (Smith, Warner could leave) हा बीसीसीआयसाठी मोठा धक्का आहे.

यावर्षीचं क्रिकेटचं वेळापत्रक पाहता आयपीएल स्पर्धा काही महिन्यांनी घेणं देखील शक्य नाही. या परिस्थितीमध्ये बीसीसीआय भारत सरकारच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियन सरकारशी संपर्क साधू शकते.

पुन्हा ‘मंकीगेटचा’ प्रयत्न? आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलेल्या पाचही खेळाडूंना पाठिंबा देण्याचा BCCI चा निर्णय

टीम इंडिया काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती, त्यावेळी ऑस्ट्रेलियात कडक लॉकडाऊन होता. काही राज्यांच्या बॉर्डर बंद होत्या. त्या बिकट परिस्थितीमध्येही क्रिकेट ऑस्ट्रेलियाला महसूल मिळावा म्हणून बीसीसीआयनं सहकार्य केलं होतं. या ताज्या घटनेची आठवणही बीसीसीआय क्रिकेट ऑस्ट्रेलियाला या पेचप्रसंगात करुन देण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: