
आयपीएल स्पर्धेचा (IPL 2021) पहिला आठवडा आता पूर्ण झालाय. सर्व टीमच्या प्रत्येकी दोन मॅच आता पूर्ण झाल्या आहेत. पहिल्या आठवड्यानंतर सनरायझर्स हैदराबाद (SRH) या एकमेव टीमला अजून एकही विजय मिळालेला नाही. डेव्हिड वॉर्नरच्या टीमची तिसरी मॅच शनिवारी मुंबई इंडियन्स (SRH vs MI) विरुद्ध होणार आहे.स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या या टीमची डोकेदुखी वाढवणारी बातमी आहे. हैदराबादचा संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेला केन विल्यमसन अजूनही अनफिट (Kane Williamson unfit) आहे.
मिडल ऑर्डर समस्या
हैदाराबादच्या दोन्ही मॅचमध्ये त्यांच्या मिडल ऑर्डर बॅट्समननी निराशा केल्यानं टीमला पराभव सहन करावा लागला. आरसीबी विरुद्धच्या मॅचमध्ये तर त्यांची टीम फक्त 4 ओव्हरमध्ये 2 आऊट 115 अशा भक्कम स्थितीवरुन 9 आऊट 143 वर गडगडली. त्यामुळे त्यांचा 6 रननं पराभव झाला.
विल्समसनला काय झालंय?
न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन हा गेल्या अनेक दिवसांपासून दुखापतग्रस्त (Kane Williamson unfit) आहे. न्यूझीलंडकडून खेळताना त्याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे विल्यमसननं बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली होती. त्यानंतर तो थेट आयपीएल स्पर्धेत आला. हैदराबादच्या टीमचा मेडिकल स्टाफ त्याच्यावर सध्या उपचार करत आहे.
IPL 2021 SRH : ‘आहे’ बॉलिंग भक्कम तरीही…काही प्रश्न कायम!
कधी होणार फिट?
केन विल्यमसननं स्वत: त्याच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. “तुम्हाला माहिती आहे की, हा त्रास लवकरात लवकर कमी व्हावा यासाठी मी प्रयत्न करतोय. मी एका आठवड्यात फिट होईल अशी आशा आहे. माझी प्रगती चांगली होतीय. त्यामुळे मी लवकरच पूर्णपणे फिट होईल” असं विल्यमसननं स्पष्ट केलं. सनरायझर्स हैदराबादनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर याबाबतचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.
विल्यमसनच्या या स्पष्टीकरणानंतर तो मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. विल्यमसननं मागच्या आयपीएल सिझनमध्ये 11 मॅचमध्ये 317 रन काढले होते. हैदराबादच्या टीमनं ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश करण्यात त्याचं मोलाचं योगदान होतं. तर 2018 च्या आयपीएलमध्ये त्यानं सर्वात जास्त 735 रन करत ऑरेंज कॅप जिंकली होती. विल्यमसन सध्या जोरदार फॉर्मात असून क्रिकेटच्या सर्व प्रकारात भरपूर रन करत आहे. त्यामुळे तो कधी फिट होणार? याकडं हैदराबादच्या फॅन्सचे डोळे लागले आहेत.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.