
आयपील सिझन 14 मधील (IPL 2021) 4 खेळाडू आणि 2 सपोर्ट स्टाफ कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानं ही स्पर्धा बीसीसीआयला (BCCI) अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली. बीसीसीआयला सर्वाधिक नफा मिळवून देणारी आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानं आता त्यांचं हजारो कोटींचं (BCCI Loss) नुकसान होणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेत सहभागी झालेल्या टीमना आर्थिक फटका बसला आहे.
आर्थिक गणित बिघडले
युएईमध्ये गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल सिझनमधून (IPL 2021) BCCI नं 4000 कोटींची कमाई केली होती. मागच्या सिझनमध्येही जगभरात कोरोनाची समस्या गंभीर होती. त्याचबरोबर सर्व सामने युएईमध्ये प्रेक्षकांच्या शिवाय झाले. त्यानंतरही बीसीसीआयनं ही कमाई केली होती. आता ही स्पर्धा अर्ध्यातूनच स्थगित करावी लागल्यानं बीसीसीआयला 2000 कोटींपेक्षा जास्त आर्थिक नुकसान (BCCI Loss) करावे लाहणार आहे.
आयपीएल स्पर्धेच्या सर्व स्पॉनर्सनी संपूर्ण सिझनसाठी बीसीसीआयसोबत करार केला होता. आता स्पर्धा स्थगित झाल्यानं हा करार देखील स्थगित किंवा रद्द होऊ शकतो याचा परिणाम बीसीसीआयच्या कमाईवर होणार आहे. ब्रॉडकास्टर्स आणि स्प़ॉनर्स सोबत करण्यात आलेले हे करार आहेत. या करारातील किमान 2000 हजार कोटींचा बीसीसीआयला फटका बसणार आहे.
IPL 2021 पुन्हा होणं शक्य आहे? वाचा काय आहेत BCCI समोरचे पर्याय
IPL च्या ब्रँड व्हॅल्यूला फटका
बीसीसीआयला अजूनही सप्टेंबर महिन्यात उर्वरित सामने घेऊन हे नुकसान भरुन काढण्याची आशा आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये ही शक्यता देखील अवघड आहे. जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली क्रिकेट बोर्डाचे बायो-बबल सुरक्षित नाही, हा संदेश यामधून क्रिकेट विश्वात गेला आहे. त्यामुळेचा याचा फटका IPL च्या ब्रँड व्हॅल्यूवर पडण्याची शक्यता आहे.
सर्व टीमना आर्थिक फटका
आयपीएल स्थगित झाल्या फटका टीमनाही बसणार आहे. या फ्रँचायझींना स्टेडियममधील तिकीटांची विक्री, टीमचे स्पॉनर्स तसेच बीसीसीआयकडून पैसे मिळतात. कोरोनामुळे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश बंद आहे. त्याचा आर्थिक फटका या फ्रँचायझींना बसतोय. बीसीसीआयनं याबाबतीमध्ये टीमला मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.
मात्र स्पर्धा पूर्ण न झाल्यानं फ्रँचायझींना स्पॉनर्सकडून पैसे कमी मिळणार आहेत. त्याचबरोबर बीसीसीआय देखील दरवर्षीपेक्षा फ्रँचायझींना कमी पैसा देण्याची शक्यता आहे.
आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानं या स्पर्धेचे ब्रॉडकास्ट पार्टनर असलेले स्टार इंडिया (Star India) देखील बीसीसीआयला सवलत मागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उर्वरित 31 मॅच या वर्षात झाल्या नाहीत तरी स्टार इंडियाकडून बीसीसीआयला देण्यात येणाऱ्या रकमेत कपात होण्याची शक्यता आहे. या सर्वांमध्ये बीसीसीआयचं आर्थिक नुकसान (BCCI Loss) होणार आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.