
चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) पहिल्या पराभवानंतर आयपीएल स्पर्धेत पुनरागमन केलं आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये चेन्नईनं पंजाब किंग्ज (PBKS) चा 6 विकेट्सनं पराभव केला. सीएसकेचा फास्ट बॉलर दीपक चहर (Deepak Chahar) हा या विजयाचा हिरो ठरला. त्यानं चार ओव्हरमध्ये फक्त 13 रन देत चार विकेट्स घेतल्या. चहर पूर्णपणे रंगात असल्याचं पाहून कॅप्टन धोनीनं त्याला सलग चार ओव्हर दिल्या. चहरचं हे आयपीएलमधील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे. त्याचबरोबर त्याच्या नावावर एक बॅट्समन्सना धडकी भरवणारा रेकॉर्ड ( Deepak Chahar Record) देखील आहे.
कोचही खूश
सीएसकेचा कॅप्टन म्हणून महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) शुक्रवारी 200 वी मॅच होती. चहरनं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत कॅप्टनला अनोखी भेट दिली.चहरनं यापूर्वी 2018 साली सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्या मॅचमध्ये त्यानं 15 रन देऊन तीन जणांना आऊट केलं. पंजाबविरुद्ध त्यानं 13 रनमध्ये मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन आणि दीपक हुडा यांना आऊट केलं. चहरच्या या स्पेलचं वैशिष्ट्य म्हणजे त्यानं एकूण दिलेल्या 13 रनपेक्षा जास्त म्हणजे 18 बॉल डॉट (निर्धाव) टाकले. चहरच्या या घातक स्पेलमुळे पंजाब किंग्जला 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 106 पर्यंतच मजल मारता आली.
टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) देखील चहरच्या कामगिरीमुळे प्रभावित झाले. “दोन्हीकडून मिळणाऱ्या स्वाभाविक स्विंगवर नियंत्रण असेल, तर सर्वश्रेष्ठ बॅट्समन्सनाही आऊट करता येऊ शकतं. हे सिद्ध झालं आहे. जबरदस्त विविधता. शानदार” या शब्दात ट्विट करत शास्त्रींनी दीपक चहरचं कौतूक केलं.
बुमराह, बोल्टलाही जमलं नाही…
दीपक चहरनं 2017 साली आयपीएलमध्ये पदार्पण केलं. तेंव्हापासून आजवर चहरच्या नावावर एक खास रेकॉर्ड ( Deepak Chahar Record ) आहे. त्यानं आयपीएल स्पर्धेत आजवर 15 जणांना शून्यावर आऊट केलं आहे. या काळात बॅट्समन्सना सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट करण्याचा रेकॉर्ड चहरच्या नावावर आहे. त्यानं पंजाब विरुद्धच्या मॅचमध्येही मयांक अग्रवाल आणि निकोलस पूरन यांना शून्यावर आऊट केलं.
IPL 2021 CSK Preview: चुका सुधाराव्या लागतील पण कशा?
दीपक चहरच्या नंतर या यादीमध्ये उमेश यादवचा नंबर आहे. त्यानं 10 वेळा बॅट्समनना शून्यावर आऊट केलं आहे. मुंबई इंडियन्सचे फास्ट बॉलर ट्रेंट बोल्ड आणि जसप्रीत बुमराह या यादीत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या नंबरवर आहेत. बोल्टनं नऊ वेळा तर बुमराहनं आठ वेळा बॅट्समना शून्यावर आऊट केलं.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.