
महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) आयपीएल 2020 ही स्पर्धा निराशाजनक ठरली. यावर्षी CSK ला पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेची क्वालीफायर गाठता आली नाही.यंदाच्या स्पर्धेत सातव्या क्रमांकावर राहिलेल्या सीएसकेच्या टीमने पुढील आयपीएल स्पर्धेत मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत.
आयपीएल स्पर्धेत किती टीम खेळणार? आणि आयपीएल ऑक्शनचं स्वरुप कसं असणार? हे जाहीर झाल्यानंतर सर्व आयपीएल टीम पुढील वर्षाचे योजनांवर अधिक नेमकेपणे कामं सुरु करतील. अर्थात त्यांचे सध्याही पडद्यामागे नियोजन सुरुच आहे. चेन्नई सुपर किंग्सचे कोच स्टीफन फ्लेमिंगने (Stephen Fleming) पुढील वर्षी ‘टीम यलो’ मध्ये कोणता खेळाडू दिसेल याचे संकेत दिले आहेत.
( वाचा : IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सच्या वाटचालीचा सविस्तर रिपोर्ट )
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात सध्या T20 सीरिज सुरु आहे. तीन T20 ची ही सीरिज न्यूझीलंडने जिंकली आहे. या मॅच दरम्यान कॉमेंट्री करत असताना फ्लेमिंगने न्यूझीलंडचा टीम सेफर्ट (Tim Seifert) हा विकेटकिपर-बॅट्समन पुढील सीझनमध्ये चेन्नईकडून खेळू शकतो असे सूचित केले आहे.
काय म्हणाला फ्लेमिंग?
“एका यलो जर्सीमधील टीमची तुझ्यावर (सेफर्ट) नजर असेल. फक्त ब्रँडन मॅकलमच्या टीमलाच तुझ्यात स्वारस्य आहे, असं नाही.’’ असे सांगत फ्लेमिंग यांनी सीएसकेच्या भविष्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
कोण आहे सेफर्ट?
स्टीफन फ्लेमिंग आणि ब्रँडन मॅकलम (Brendon McCullum) या न्यूझीलंडच्या दोन दिग्गजांना 26 वर्षाच्या या विकेटकिपर बॅट्समननं प्रभावित केले आहे. पाकिस्तान विरुद्ध सुरु असलेल्या T20 सीरिजमध्ये सॅफर्टनं पहिल्या दोन मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली आहे. सेफर्टच्या 63 बॉलमध्ये नाबाद 84 रन्सच्या खेळीमुळे न्यूझीलंडने दुसऱ्या T20 मध्ये पाकिस्तानचा 9 विकेट्सनं सहज पराभव केला आणि सीरिज जिंकली.
चेन्नई सुपर किंग्सचा ओपनर शेन वॉटसननं आता आयपीएलमधून रिटायमेंट घेतली आहे. त्यामुळे वॉर्नरच्या जागेवर सीएसकेला एक ओपनर हवा आहे. सीएसकेची ती गरज सॅफर्ट पूर्ण करु शकतो. त्यामुळे आगामी ऑक्शनमध्ये त्याच्यावर फ्लेमिंगची नजर असणार आहे.
( वाचा : न्यूझीलंडचा नवा ‘रेकॉर्ड मास्टर’ ग्लेन फिलिप्स आहे तरी कोण? )
सेफर्टचे मॅकलम कनेक्शन
टीम सेफर्ट हा न्यूझीलंडचा माजी कॅप्टन आणि कोलकाता नाईट रायडर्सचा मुख्य कोच ब्रँडन मॅकलमाचा शिष्य म्हणून ओळखला जातो. काही महिन्यांपूर्वी त्याने मॅकलमच्या मार्गदर्शनाखाली बॅटिंगचा अभ्यास केला होता. सेफर्टला 2020 च्या आयपीएलमध्ये KKR अमेरिकेचा फास्ट बॉल अली खान (Ali Khan) याची रिप्लेसमेंट म्हणून करारबद्ध केले होते.
सध्या उत्तर फॉर्मात असलेला क्रिकेटच्या मैदानात 360 अंशात फटकेबाजी करणाऱ्या सेफर्टला खरेदी करण्यासाठी पुढील आयपीएल ऑक्शनमध्ये CSK आणि KKR सह आणखी काही फ्रँचायझीमध्ये स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.