फोटो – BCCI/IPL

चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) मागील सिझन सर्वात जास्त निराशाजनक ठरला. जवळपास संपूर्ण स्पर्धेत ते तळाशी होते. शेवटच्या टप्प्यात तीन मॅच सलग जिंकत अखेरचा क्रमांक टाळला. यावर्षी चेन्नईच्या टीममध्ये मोठे बदल होतील असा अनेकांचा अंदाज होता. पण चेन्नईनं मोठे बदल टाळले आहेत. त्यामुळे चेन्नईच्या अनुभवी कोअर टीमवर मागच्या वर्षीच्या चुका टाळण्याचं (IPL 2021 CSK Preview) आव्हान असेल.

टीमची बलस्थानं

चेन्नईच्या टीमनं मागच्या वर्षी शेवटच्या टप्प्यात योग्य बदल केले. ऋतुराज गायकवाडला (Ruturaj  Gaikwad) त्यांनी ओपनिंगला पाठवलं. ऋतुराजनं सलग तीन हाफ सेंच्युरी झळकावत टीमला तीन विजय मिळवून दिले. ऋतुराज प्रमाणे सॅम करन (Sam Curran) हा आणखी एक तरुण चेन्नईचं बलस्थान आहे. बॅटींग आणि बॉलिंग या दोन्ही विभागात त्याच्याकडून मागच्या वर्षीसारखा खेळ पाहयला मिळू शकतो.

चेन्नईनं यंदा मोईन अलीचा (Moeen Ali) टीममध्ये समावेश केला आहे. इंग्लंडचा हा ऑल राऊंडर मोठे सिक्स मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. टॉप ऑर्डरमध्ये त्याला खेळवल्यास तो टीमला आक्रमक सुरुवात करुन देऊ शकतो. त्याचबरोबर रॉबीन उथ्थप्पा (Robin Uthappa) आणि कृष्णप्पा गौतमकडूनही (Krishnappa Gowtham) या कर्नाटकच्या जोडीकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.

( धोनीच्या ‘चायना गेट’मध्ये हा आहे समीर सोनी! यंदाही बडा धमाका करण्यास सज्ज )

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) हे दोन झुंजार खेळाडू चेन्नईच्या टीममध्ये आहेत. शार्दुलचा खेळ मागच्या आयपीएलपासून प्रत्येक स्पर्धेत सुधारतोय. जडेजा बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे. पण त्याला पुन्हा एकदा प्रवाहात येण्यासाठी फार वेळ लागणार नाही, अशी अपेक्षा आहे. चेन्नईकडं अगदी 11 व्या नंबरपर्यंत बॅटींग असून अंतिम 11 मध्ये सहा चांगले बॉलिंग पर्याय (IPL 2021 CSK Preview)  कॅप्टन धोनीकडं आहेत.

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) अनुभवी नेतृत्त्व चेन्नईकडं आहे. धोनीला टीममधील प्रत्येक प्लेयरचा अंदाज आहे. हुशार कॅप्टन असलेला धोनी या स्पर्धेत त्याची आणि टीमची प्रतिष्ठा जपण्यासाठी काही नवे डावपेच घेऊन येऊ शकतो.

चेन्नईच्या मार्गातील धोके

चेन्नईच्या टीममधील अनेक खेळाडूंनी हे गेल्या काही महिन्यापासून क्रिकेट खेळलेलं नाही. त्यामधील काही जण तर रिटायर झाले आहेत. नियमित खेळात नसलेले, करियरच्या शेवटच्या टप्प्यावर असणारे आणि रिटायर झालेले या खेळाडूंमध्ये खेळण्याची आग किती असेल? हा प्रश्न आहे. या खेळाडूंना मागच्या वर्षीप्रमाणे सेट होण्यासही वेळ (IPL 2021 CSK Preview) लागू शकतो. ही चूक पुन्हा रिपीट झाली तर चेन्नईला त्याचा मोठा फटका बसेल.

चेन्नईची आणखी एक कमतरता म्हणजे 1 ते 14 ओव्हरपर्यंत स्लो खेळणे. शेवटच्या सहा ओव्हरमध्ये चेन्नईचा स्ट्राईक रेट हा चांगला आहे. पण पहिल्या 14 ओव्हरमध्ये वेगानं रन काढणं चेन्नईला मागील सिझनमध्ये जमलं नव्हतं.

( IPL 2021 CSK: संपूर्ण बदल ‘Definitely Not’ हवे तितके बदल ‘Yes’! )

चेन्नईकडं अस्सल वेगवान बॉलरची देखील कमतरता आहे. शार्दुल ठाकूर हा अनेकदा महागडा ठरतो. ड्वेन ब्राव्होची (Dawyane Bravo) डेथ ओव्हरमधील दहशत कमी झाली आहे. जेसन बेहनड्रॉफवर (Jason Behrendorff) टीमच्या आशा असतील. पण, त्याला नुकतंच करारबद्ध केलं आहे, त्यामुळे पहिल्या पहिल्या टप्प्यात तो खेळण्याची शक्यता कमी आहे.

चेन्नई सुपर किंग्सची टीम : महेंद्रसिंह धोनी, अंबाती रायुडू, सुरेश रैना सी.हरी निशात, चेतेश्वर पुजारा, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ ड्यू प्लेसी, इम्रान ताहीर, के. भगत वर्मा, के. गौतम, करण शर्मा, केएम असिफ, लुंगी एन्गिडी, मिचेल स्टॅनर, मोईन अली, नारायण जगदीशन, आर. साई किशोर, रवींद्र जडेजा, रॉबीन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, सॅम करन, शार्दुल ठाकूर आणि जेसन बेहनड्रॉफ

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: