फोटो – ट्विटर/BCCI – IPL

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेवरील (IPL 2021) कोरोनाचं सावट वाढत चाललं आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrier) या दोघांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (KKR vs RCB) यांच्यातील मॅच पुढे ढकलण्यात आलीय. त्यानंतर आता चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणारी मॅच (CSK vs RR) खेळण्यास नकार दिलाय. त्यामुळे आयपीएलमधील आणखी एक मॅच लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

काय आहे कारण?

‘इंडियन एक्स्प्रेस’ नं दिलेल्या बातमीनुसार चेन्नई सुपर किंग्सचे सर्व खेळाडू सध्या क्वारंटाईन आहेत. त्यामुळे राजस्थान रॉयल्स विरुद्ध बुधवारी (5 मे) रोजी होणारी मॅच आम्ही खेळू शकत नाही, अशी माहिती सीएसकेच्या अधिकाऱ्यांनी बीसीसीआयला (BCCI) दिली आहे.

सीएसकेचे बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजी (Laxmipati Balaji) आणि आणखी एक कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यामुळे त्यांना सर्व टीमपासून वेगळं ठेवण्यात आलंय. बालाजी यांच्या संपर्कात चेन्नईचे सर्व खेळाडू आल्यानं ते देखील सध्या क्वारंटाईन आहेत. बीसीसीआयच्या नियमानुसार कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांना 6 दिवसांसाठी क्वारंटाईन राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे बुधवारी होणारी राजस्थान रॉयल्स विरुद्धची मॅच (CSK vs RR) खेळण्यास सीएसकेच्या टीमनं असमर्थता दर्शवली आहे. या मॅचसाठी नवी तारीख निश्चित करावी अशी विनंती सीएसके मॅनेजमेंटनं बीसीसीआयकडं केली आहे.

IPL 2021: राजस्थान रॉयल्सवरील मोठ्या विजयानंतर, धोनीनं दिली स्वत:च्या चुकीची कबुली

आणखी एका मॅचवर संकट

सीएसकेच्या या निर्णयमामुळे 7 मे रोजी होणारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (CSK vs SRH) ही मॅच देखील संकटात आहे. कारण, ही मॅच देखील या 6 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीमध्येच नियोजीत आहे. सीएसकेनं या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 7 मॅच खेळल्या असून यापैकी 5 मॅचमध्ये विजय मिळवलाय. तर 2 मॅचमध्ये त्यांची टीम पराभूत झाली आहे.

कोलकाता आणि दिल्लीची टीम क्वारंटाईन

केकेआरच्या दोन खेळाडूंना क्वारंटाईन करण्यात आल्यानं कोलकाताचे सर्व खेळाडू क्वारंटाईन आहेत. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) खेळाडूंना देखील क्वारंटाईन राहण्याची सूचना देण्यात आलीय. आयपीएल स्पर्धेला कोरनाचा धोका वाढल्यानं यापुढील सर्व मॅच फक्त मुंबईतच खेळवण्याचा विचारही बीसीसीआय करत आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: