फोटो – ट्विटर/ BCCI-IPL

महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) क्रिकेटमधील सर्वोत्तम कॅप्टनमध्ये गणना होते. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याला मॅचमधील परिस्थितीचं आकलन लवकर होते आणि तो त्या परिस्थितीप्रमाणे रणणिती बनवतो. राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) मुंबईमध्ये झालेल्या मॅचमध्ये नेमकं हेच घडलं. धोनीच्या सजगतेचं (Dhoni’s Awareness) उदाहरण त्या मॅचमध्ये पाहयला मिळालं. त्याच्या या सजगतेमुळेच राजस्थानचा 45 रननं मोठा पराभव झाला.

काय होती परिस्थिती?

सीएसकेनं दिलेल्या 189  च्या टार्गेटचा पाठलाग करताना राजस्थानची टीम मजबूत वाटत होती. जोस बटलर (Jos Buttler) आणि शिवम दुबे (Shivam Dube)  यांनी तिसऱ्या विकेटसाठी 45 रनची पार्टरनरशिप केली होती. बटलर हाफ सेंच्युरीच्या उंबरठ्यावर होता. त्यानं 49 रनच्या खेळीत 5 फोर आणि 2 खणखणीत सिक्स लगावले होते. तर शिवमही त्याच्या होम ग्राऊंडवर 2 फोरसह 17 रनवर खेळत होता.   

धोनीनं दिला आवाज…

रवींद्र जडेजानं (Ravindra Jadeja) 10 व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर बटलरनं मोठा सिक्स लगावला. तो बॉल स्टँडमध्ये गेला त्यामुळे बदलण्यात आला. दवामुळे ओला झालेला बॉल बदलण्यात आला आणि नवा कोरडा बॉल चेन्नईच्या बॉलर्सच्या हातात आला. त्यानंतर धोनीनं तात्काळ स्टंपमागून आवाज दिला, ‘बॉल कोरडा आहे आणि तो आता फिरणार’ (Dhoni’s  Awareness)

IPL 2021 : धोनीच्या ‘चायना गेट’मध्ये हा आहे समीर सोनी!

मॅचचं चित्र बदललं

धोनीनं स्टंपमागून दिलेला तो सल्ला सीएसकेच्या बॉलर्सना समजला. रवींद्र जडेजानं 12 व्या ओव्हरमध्ये जोस बटलरला बोल्ड केलं. जडेजानं टाकलेला तो बॉल सेट झालेल्या बटलरला समजलाच नाही. त्यानं बटलरच्या बॅटचं कवच भेदून थेट स्टंप उखडले. धोनीनं त्याच ओव्हरमध्ये शिवम दुबेला LBW करत राजस्थानला चौथा धक्का दिला.

स्पिनच्या जाळ्यात राजस्थान अडकलं आहे, हे धोनीच्या लक्षात आलं. त्यानं जडेजानंतर सीएसकेचा आणखी एक स्पिनर मोईन अलीच्या (Moeen Ali) हातात बॉल दिला. मोईननं पहिल्याच ओव्हरमध्ये डेव्हिड मिलरला (2) आऊट केलं. तर पुढच्या ओव्हरमध्ये रियान पराग (3) आणि ख्रिस मॉरीस (0) आऊट करत राजस्थानची बॅटींग ऑर्डर साफ केली.

8 रनमध्ये 5 विकेट्स

जडेजा-मोईन या स्पिनर्सनी फक्त 8 रन देत राजस्थानच्या 5 बॅट्समन्सना आऊट केलं. जोस बटलर, शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग आणि ख्रिस मॉरीस हे राजस्थानचे 5 बॅट्समन या काळात आऊट झाले. राजस्थानची अवस्था 2 आऊट 87 वरुन 7 आऊट 95 अशी झाली. धोनीची सजगता (Dhoni’s  Awareness) त्यानुसार दोन्ही स्पिनर्सना बॉलिंग देण्याचा निर्णय आणि त्याला मिळालेली साथ यामुळे हे शक्य झालं. जयदेव उनाडकत (24) यानं शेवटी काही फटकेबाजी केल्यानं राजस्थाननं निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 आऊट 143 पर्यंत मजल मारली. पण तो राजस्थानचा पराभव टाळू शकला नाही.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: