फोटो – BCCI/IPL

मुंबई इंडियन्सच्या खालोखाल यंदा दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) टीम विजेतेपदाची दावेदार मानली जात आहे. या टीमकडं चांगले बॅट्समन आणि बॉलर आहेत. फॉर्मात असलेला ऋषभ पंत (Rishabh Pant) यंदा टीमची कॅप्टनसी करतोय. पंतचा फॉर्म आणि कॅप्टनसी दिल्लीला पहिलं आयपीएल विजेतेपद (IPL 2021 DC Preview) मिळवून देणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.

दिल्ली कॅपिटल्सची बलस्थानं

गेल्या आयपीएलमध्ये अजिबात फॉर्मात नसलेल्या ऋषभ पंतनं भारताच्या मागील दोन सीरिजमध्ये कमाल खेळ केला आहे. यापूर्वी त्याला सतत नावं ठेवणारी मंडळी देखील आता त्याचं कौतुक करु लागली आहेत.

श्रेयस अय्यरच्या (Shreys Iyer) अनुपस्थितीमध्ये ऋषभवर कॅप्टनसीची जबाबदारी आली आहे. भारताचा आणखी एक महान विकेटकिपर बॅट्समन महेंद्रसिंह धोनीशी (MS Dhoni) पंतशी सतत तुलना केली जाते. धोनीच्या सावलीतून बाहेर पडण्याची ही स्पर्धा ही पंतला मोठी संधी आहे. त्याचबरोबर आगामी T20 वर्ल्ड कपची तयारी करण्यासाठी देखील पंतसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे.

( ‘ऋषभ पंतला टीम इंडियाच्या कॅप्टनसीच्या जवळ नेणारी स्पर्धा’ )

मागच्या स्पर्धेत 618 रन काढणारा शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये विक्रमी 827 रन काढणारा पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ही ओपनिंग जोडी दिल्लीकडं (IPL 2021 DC Preview) आहे. धवनला T20 टीममधील तर पृथ्वीला टीम इंडियामधील स्थान परत मिळवायचं आहे. त्यामुळे ही जोडी या आयपीएलमध्ये सर्वस्व पणाला लावून खेळणार आहे.

दिल्लीच्या मीडल ऑर्डरमध्ये हेटमायर आणि स्टॉईनिस हे फटकेबाज खेळाडू आहेत. त्याचबरोबर रबाडा आणि नॉर्खिया हा फास्ट बॉलर्सचा भेदक मारा दिल्लीकडं आहे. मागील आयपीएलमध्ये या जोडीनं 52 विकेट्स घेतल्या होत्या.

दिल्लीचा स्पिन बॉलिंग अटॅकही मजबूत आहे. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि अमित मिश्रा (Amit Mishra) यांच्या जोडीला फॉर्मातील अक्षर पटेल (Axar Patel) दिल्लीकडं आहे. अक्षरची बॅटींग देखील लोअर ऑर्डरमध्ये दिल्लीच्या फायद्याची ठरु शकते.

दिल्ली कॅपिटल्सच्या मार्गातील धोके

श्रेयस अय्यरनं मागच्या वर्षी तीन नंबरला येऊन 519 रन काढले होते. तिसऱ्या क्रमांकावर 500 पेक्षा रन करणारा भारतीय बॅट्समन असणे ही आयपीएलमध्ये कोणत्याही टीमसाठी मोठी गोष्ट आहे. यंदा दिल्लीला ती कमतरता (IPL 2021 DC Preview) जाणवणार आहे. दिल्लीकडील अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) हे दोन तिसऱ्या क्रमांकासाठीचे पर्याय T20 क्रिकेटसाठी तितके भक्कम नाहीत.

रबाडा आणि नॉर्खिया या जोडीला पर्यायी बॉलरही दिल्लीच्या बेंच स्ट्रेंथमध्ये नाहीत. इशांत शर्मा आणि उमेश यादव या अनुभवी भारतीय बॉलर्सनी अलिकडच्या काळात T20 क्रिकेट फारसं खेळलेलं नाही. त्यामुळे रबाडा-नॉर्खियापैकी एकाला जरी काही कारणामुळे बाहेर बसावं लागल्यास दिल्लीचा बॅलन्स बिघडण्याची शक्यता आहे.

( दिल्ली कॅपिटल्सच्या ‘एक पाऊल पुढे’ टाकण्यातील अडथळे कायम! )

दिल्लीकडं ऋषभ पंतला बॅक अप विकेट किपर देखील नाही. मागच्या वर्षी पंत जखमी झाल्यानं दिल्लीचा बॅलन्स बिघडला होता.यंदा त्यांनी सी. गौतमचा समावेश केला आहे. पण त्याला मोठ्या स्तरावर खेळण्याचा अनुभव नाही.

दिल्लीनं मागच्या वर्षी पहिल्या 9 पैकी 7 मॅच जिंकून सुरुवात चांगली केली होती. मात्र त्यानंतर त्यांची टीम सलग चार मॅचमध्ये पराभूत झाली. त्यामुळे ‘प्ले ऑफ’मध्ये जाण्यासाठी त्यांना शेवटच्या मॅचमध्ये जोर लावावा लागला. यंदा हा गाफिलपणा दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचं स्वप्न (IPL 2021 DC Preview) भंग करु शकतो.

दिल्ली कॅपिटल्सची टीम : ऋषभ पंत (कॅप्टन), अमित मिश्रा, अँनरिच नॉर्खिया आवेश खान, अक्षर पटेल, ख्रिस वोक्स, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, ललित यादव, लुकमन मेरीवाला, एम. सिद्धार्थ, प्रवीण दुबे, पृथ्वी शॉ, आर. अश्विन, रिपल पटेल, सॅम बिलिंग्ज, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, स्टीव्ह स्मिथ, टॉम करन, उमेश यादव आणि विष्णू विनोद

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: