फोटो – ट्विटर/ Wisden India

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची (Royal Challengers Bangalore) या सिझनमधील (IPL 2021) विजयी घौडदौड सुरु आहे. आरसीबीनं गुरुवारी मुंबईमध्ये झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) 10 विकेट्सनं दणदणीत पराभव केला. आरसीबीचा या स्पर्धेतील सलग चौथा विजय असून ही टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये टॉपवर आहे. राजस्थाननं दिलेलं 178 रनचं आव्हान आरसीबीनं विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल (Virat – Padikkal) यांच्या नाबाद पार्टरनरशिपच्या जोरावर एकही विकेट न गमावता आणि 21 बॉल राखून पार केलं.

देवदत्तची पहिली सेंच्युरी

या सिझनमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या देवदत्त पडिक्कलनं (Devdutt Padikkal) आरसीबीच्या इनिंगची सुरुवात आक्रमक केली. त्यानं पहिल्या पॉवर प्लेमध्येच राजस्थानच्या बॉलर्सवर जोरदार हल्ला चढवला.

आरसीबीच्या या तरुण ओपनर्सची आक्रमक बॅटींग पाहून विराट कोहलीनं (Virat Kohli) देखील सुरुवातीला दुय्यम भूमिका स्विकारली. पडिक्कलनं 51 बॉलमध्ये आयपीएलमधील पहिली सेंच्युरी झळकावली. यामध्ये त्यानं 11 फोर आणि 6 सिक्स लगावले. पडिक्कल 52 बॉलमध्ये 101 रन काढून नॉट आऊट राहिला. त्यानं या मॅचमध्ये 194.23 च्या स्ट्राईक रेटनं रन बनवले.

आयपीएल स्पर्धेत सेंच्युरी झळकाणारा देवदत्त पडिक्कल हा तिसरा अनकॅप भारतीय खेळाडू (कोणतीही आंतरराष्ट्रीय मॅच न खेळलेला) आहे. यापूर्वी पॉल वल्थाटी (120) आणि मनिष पांडे (114) यांनी ही कामगिरी केली आहे.

20 वर्षाच्या पोरानं झळकावली सलग तिसरी सेंच्युरी, टीम इंडियाच्या दारावर केली टकटक

विराट कोहलीचा रेकॉर्ड

देवदत्त पडिक्कल – विराट कोहली जोडीनं (Virat – Padikkal) पहिल्या विकेटसाठी अभेद्य अशी 181 रनची पार्टरनरशिप केली. सुरुवातीला दुय्यम भूमिका घेणाऱ्या विराटनं मॅचच्या उत्तरार्धात चांगलीच फटकेबाजी करत या आयपीएलमधील पहिली हाफ सेंच्युरी झळकावली.

विराटनं 51 रन पूर्ण करताच आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 6 हजार रन करणारा तो पहिला बॅट्समन बनला आहे. विराटनं आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत 196 मॅचमध्ये 130.69 च्या स्ट्राईक रेटनं 6021 रन केले आहेत. यामध्ये 5 सेंच्युरी आणि 40 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे.

मॅक्सवेल-डिव्हिलियर्सची जुगलबंदी, आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच झाला ‘हा’ रेकॉर्ड

विराटनं 47 बॉलमध्ये 6 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं नाबाद 72 रन काढले. ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डीव्हिलियर्स यांच्यापाठोपाठ आता विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल (Virat – Padikkal) ही जोडी देखील फॉर्मात आल्यानं आरसीबीच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. त्याचबरोबर सर्व प्रतिस्पर्धी टीम्सना आरसीबीनं धोक्याचा इशारा दिला आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: