
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders) यांच्यात झालेल्या मॅचमध्ये एक दुर्मिळ गोष्ट घडली. केकेआरच्या इनिंगमधील 14 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने ती ओव्हर टाकली. रोहित शर्मानं तब्बल सात वर्षांनी आयपीएलमध्ये बॉलिंग केली. रोहितनं पहिला बॉल टाकण्यापूर्वीच त्याच्या डाव्या पायाची टाच दुखावली. त्यामुळे त्यानं बॉलिंग का केली? (Why Rohit Sharma Bowl?) हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मॅचची परिस्थिती काय होती?
रोहित 14 व्या ओव्हरला बॉलिंगला आला. त्यापूर्वी चेन्नईचं पिच हे स्पिन बॉलिंगला मदत करत असल्याचं राहुल चहर (Rahul Chahar) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांनी दाखवून दिले होते. केकेआरच्या इनिंगच्या सात ओव्हर्स शिल्लक होत्या. त्याचं नेमकं विश्लेषण करायचं तर तेंव्हा राहुल चहरची 1, कृणाल पांड्याच्या 2, ट्रेंट बोल्टची 1 आणि बुमराहच्या 2 ओव्हर शिल्लक होत्या. उरलेली एक ओव्हर अन्य बॉलरकडून टाकणं हे रोहितला भाग होते.
रोहितपुढे दोन पर्याय होते. मार्को जेन्सन आणि कायरन पोलार्ड. पण या दोघांपैकी कुणीही स्पिनर नाही. हार्दिक पांड्या हा तिसरा पर्याय वापरला असता तरी तो स्पिनर नव्हता. केकेआरचे बॅट्समन यापैकी कुणालाही ठरवून टार्गेट करण्याची शक्यता होती. त्यावेळी मॅच बरोबरीत अवस्थेत असल्यानं एका खराब ओव्हरमुळे मॅचचं पारडं केकेआरच्या बाजूनं झुकण्याची शक्यता होती.
IPL 2021 MI Preview: बेस्ट टीम विजेतेपदाची हॅटट्रिक करण्यासाठी सज्ज!
रिस्क तर होती…
रोहितनं बॉलिंग करण्याचं मोठं कारण म्हणजे (Why Rohit Sharma Bowl?) त्यावेळी नितीश राणा (Nitsh Rana) आणि शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) ही केकेआरची डावखुरी जोडी बॅटींग करत होती. या डावखुऱ्या बॅट्समनला रोखण्यासाठी रोहित शर्मानं स्वत: बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला.
रोहितनं बॉलिंग करण्यामध्ये देखील रिस्क होती. मात्र कॅप्टनचा स्वत:च्या बॉलिंगवर विश्वास होता. हुशार कॅप्टन धाडसी निर्णय घेण्यास घाबरत नाही. महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) T20 वर्ल्डकप फायनलची शेवटची ओव्हर जोगिंदर शर्माला दिली होती. हे उदाहरण रोहितनं त्या फायनलमधील खेळाडू म्हणून प्रत्यक्ष पाहिलंच होतं. त्याचबरोबर रोहित शर्मा सात वर्षांपासून आयपीएलमध्ये बॉलिंग केली नव्हती. तो बॉलिंग करण्याची शक्यताही नसल्यानं त्याचे व्हिडीओ केकेआरच्या टीमनं अभ्यास केले असण्याची शक्यता कमी होती.
रोहितच्या ओव्हरमध्ये काय घडलं?
रोहितच्या ओव्हरची सुरुवातच मोठी धक्कादायक झाली. पहिला बॉल टाकण्यापूर्वी त्याचा डावा पाय नीट पडला नाही. त्यामुळे त्याच्या डाव्या पायाची टाच दुखावली. रोहितनं ‘टाईम आऊट’ घेण्याचा निर्णय घेतला. तो पायाला त्रास होत असल्यानं मैदानात बसला. त्यावेळी मुंबई इंडियन्ससह संपूर्ण भारतीय फॅन्सचा काळजाचा ठोका चुकला होता. तो बॉलिंगला का आला? (Why Rohit Sharma Bowl?) हाच प्रश्न सर्वांना पडला होता.सुदैवानं ही दुखापत त्यावेळी तरी गंभीर नव्हती. रोहितवर टीमच्या फिजीओनं उपचार केले आणि त्यानं ओव्हर पूर्ण केली.
रोहितच्या ओव्हरमध्ये शाकिब अल हसननं एक फोर लगावला. तर अन्य पाच बॉलवर प्रत्येकी एक रन निघाला. रोहितनं त्याच्या एकमेव ओव्हरमध्ये 9 रन दिले.
मुंबई इंडियन्सनं पहिल्याच मॅचमध्ये निवडलेला Marco Jansen कोण आहे?
यापूर्वी कधी बॉलिंग केली होती?
रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सकडून अत्यंत कमी बॉलिंग केली आहे. यापूर्वी तो डेक्कन चार्जसच्या टीममध्ये होता, तेंव्हा अॅडम गिलख्रिस्टनं (Adam Gilchrist) मात्र त्याच्या पार्ट टाईम बॉलिंगचा आयपीएलमध्ये नियमित उपयोग करुन घेतला आहे.
रोहितनं आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध हॅट्ट्रिक देखील केली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध एका मॅचमध्ये सर्वोत्तम बॉलिंग करण्याचा रेकॉर्ड देखील रोहितच्या नावावर होता. तो रेकॉर्ड याच आयपीएलमधील पहिल्या मॅचमध्ये हर्षल पटेलनं (Harshal Patel) मोडला. रोहितनं यापूर्वी 2014 च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध मुंबईत झालेल्या मॅचमध्ये एक ओव्हर टाकली होती. त्या ओव्हरमध्ये त्यानं सहा रन दिले होते.
रोहित आता मॅचमध्ये बॉलिंग टाकत नसला तरी तो नेटमध्ये अनेकदा बॉलिंगचा सराव (Why Rohit Sharma Bowl?) करत असतो.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.