फोटो – BCCI/IPL

आयपीएल स्पर्धेत सोमवारी झालेल्या मॅचमध्ये पंजाब किंग्जनं (PBKS) राजस्थान रॉयल्सचा (RR) चार रननं निसटता पराभव केला. राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनचे 119 रन (Sanju Samson 119) हे या मॅचचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. कॅप्टन झाल्यानंतरच्या पहिल्याच मॅचमध्ये संजूनं अगदी शेवटच्या बॉलपर्यंत एकाकी झुंज दिली.

पराभवानंतर निराश संजू

पंजाब किंग्जनं पहिल्यांदा बॅटींग करताना 6 आऊट 221 असा विशाल स्कोअर केला. 222 रनचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सच्या प्रमुख बॅट्समननं निराशा केली. या पडझडीमध्येही संजू ठाम उभा होता. संजूनं 119 रनमध्ये 12 फोर आणि 7 सिक्स लगावले. याचाच अर्थ त्यानं फक्त 19 बॉलमध्ये 90 रन काढले.

या पराभवानंतर बोलताना संजूला निराशा लपवता आली नाही. “माझ्या भावना शब्दात मांडणं अवघड आहे. टीमला मॅच जिंकून द्यायला मला आवडतं. मी यापेक्षा अधिक काही करु शकलो असतो असं मला वाटत नाही. मला वाटलं की मी सिक्स मारण्यासाठी चांगला फटका मारला आहे, पण तसं झालं नाही. हा सर्व खेळाचा भाग आहे. आम्हाला वाटलं होतं की, पिच चांगलं होईल आणि आम्ही टार्गेट पार करु. या पराभवाच्या नंतरही मी सांगेन की आमच्या टीमनं चांगला खेळ केला.” अशी भावना संजूनं व्यक्त केली आहे.

IPL 2021 RR Preview: नव्या ‘राज’ वटीमध्ये पहिले ‘स्थान’ मिळणार का?

संजूच्या नावावर अनेक रेकॉर्ड

राजस्थान रॉयल्सचा पहिल्या मॅचमध्ये पराभव झाला. मात्र या पराभवातही संजू सॅमसननं 119 रन काढत (Sanju Samson 119) अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. आयपीएलच्या 14 व्या सिझनमध्ये सेंच्युरी करणारा संजू हा पहिला बॅट्समन बनला आहे. त्याचबरोबर आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात कॅप्टन म्हणून पहिल्याच मॅचमध्ये सेंच्युरी करण्याचा पराक्रमही संजूनं केला आहे. यापूर्वी एकाही आयपीएल कॅप्टनला हे करता आलेलं नाही.

पंजाब किंग्जविरुद्ध सर्वात जास्त रन करण्याचा रेकॉर्डही आता संजू सॅमसनच्या नावावर झाला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड ख्रिस गेलच्या (117 रन) नावावर होता. संजूनं काढलेले 119 रन ही राजस्थान रॉयल्सच्या कोणत्याही बॅट्समनचा सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर आहे. त्यानं बेन स्टोक्सच्या नाबाद 107 रनच्या इनिंगला मागं टाकलं आहे. संजूचं ही आयपीएलमधील तिसरी सेंच्युरी असून आयपीएलमध्ये सर्वात जास्त सेंच्युरी करणारा तो विराट कोहलीनंतरचा दुसरा  भारतीय बॅट्समन बनला आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: