फोटो – सोशल मीडिया

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) स्थगित झाला आहे. बीसीसीआयनं तयार केलेल्या बायो-बबलमध्ये कोरोनाचं उद्रेक झाल्यानं ही स्पर्धा सध्या स्थगित झाली. दोन दिवसांमध्ये वेगानं घडलेल्या या घडामोडीमुळे सामान्य क्रिकेट फॅन्सचा हिरमोड झाला आहे. तसंच ही स्पर्धा या वर्षात झाली नाही तर BCCI चं देखील मोठं नुकसान होणार आहे. मात्र आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानं काही फ्लॉप स्टार्सनी (Flop Stars In IPL 2021) सुटकेचा निश्वास सोडला आहे.

युजवेंद्र चहल (RCB)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) मुख्य स्पिन बॉलर असलेल्या युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) साठी आयपीएल सिझनचा हा टप्पा निराशाजनक ठरला. बंगळुरच्या बॅटींग पिचवरही चांगली बॉलिंग करण्याचा चहलचा लौकीक होता. त्याला या सिझनमध्ये चेन्नईतील स्पिनला मदत करणाऱ्या पिचवरही फॉर्म सापडला नाही.

चहलनं 7 मॅचमध्ये 8.26 च्या इकॉनॉमी रेटनं फक्त 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या या निराशाजनक कामगिरीमुळे आरसीबीमधील त्याच्या जागेवर प्रश्न उपस्थित झाले होते. आता अचानक मिळालेल्या या ब्रेकमुळे चहलला अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.

हार्दिक पांड्या (MI)

मुंबई इंडियन्सचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) आक्रमक खेळ आयपीएलच्या पूर्वार्धात दिसलाच नाही. हार्दिकनं 7 मॅचमध्ये 131.57 च्या सामान्य स्ट्राईक रेटनं 76 रन काढले. त्याला या सिझनच्या पूर्वार्धात फक्त 4 सिक्स मारता आले. बॅटींग करताना हार्दिकचा संघर्ष सुरु होता. तर खांदादुखीमुळे तो बॉलिंग करु शकला नाही. त्यामुळे हार्दिकनं मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना निराश केलं.

डेव्हिड वॉर्नर (SRH)

आयपीएल स्पर्धेतील दिग्गज खेळाडू असलेल्या डेव्हिड वॉर्नरसाठी (David Warner) स्पर्धेचा पूर्वार्ध धक्कादायक ठरला. वॉर्नरच्या कॅप्टनसीमध्ये हैदराबादनं 6 पैकी 5 मॅच गमावल्या. या मॅचमध्ये वॉर्नरनं फक्त 110.28 च्या स्ट्राईक रेटनं 193 रन केले. टीमच्या बॅटींगची जबाबदारी पार पाडण्यात त्याला अपयश आलं.

वॉर्नरच्या या खराब कामगिरीमुळे टीम मॅनेजमेंटनं त्याची कॅप्टनसी काढून घेतली. त्याचबरोबर त्याला टीमच्याही बाहेर बसवलं. वॉर्नर 2014 पासून सनरायझर्सचा सदस्य आहे. या आठ वर्षात पहिल्यांदाच वॉर्नरला अंतिम 11 च्या बाहेर बसावं लागलं. आयपीएलचा सिझन अचानक स्थगित झाल्यानं वॉर्नरची आणखी नामुश्की (Flop Stars In IPL 2021) टळली आहे. आता तो ऑस्ट्रेलियात त्याच्या घरी आराम करेल.

IPL 2021: Explained सर्वात बेस्ट डेव्हिड वॉर्नरला हैदराबादनं का काढलं?

निकोलस पूरन (PBKS)

वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन निकोसल पूरनकडून (Nicholas Pooran) पंजाब किंग्जला (PBKS) मोठ्या अपेक्षा होत्या. पूरन 6 पैकी 4 इनिंगमध्ये शून्यावर आऊट झाला.त्यामुळे त्याला आठव्या मॅचमध्ये पंजाबनं बाहेर बसवलं. आता पुन्हा आयपीएल सुरु होईल तेंव्हा तो या खराब कामगिरीला विसरुन चांगला खेळ करेल अशी आशा आहे.

इऑन मॉर्गन (KKR)

कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन (KKR) इऑन मॉर्गन या टप्प्यात फ्लॉप (Flop Stars In IPL 2021) ठरला. तो दोन वेळा शून्यावर आऊट झाला. टीमसाठी फिनिशर किंवा अँकर यापैकी एकही जबाबदारी तो पार पाडू शकला नाही. तसेच कॅप्टन म्हणून कमाल करण्यास तो अपयशी ठरला.

IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्स तळाला जाण्याचं सर्वात मोठं कारण!

डेव्हिड वॉर्नरची कॅप्टनपदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर पुढचा नंबर मॉर्गनचा असेल अशी चर्चा सुरु होती, तितक्यात आयपीएलमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला. ही स्पर्धा स्थगित झाली आणि मॉर्गनचा खालच्या दिशेनं सुरु असलेला प्रवासाला ब्रेक लागला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: