
सुरेश रैना (Suresh Raina) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) हे एकेकाळी घट्ट समीकरण होते. उत्तर प्रदेशच्या रैनावर चेन्नईच्या फॅन्सनी भरभरुन प्रेम केलं. त्याला महेंद्रसिंह धोनीनंतरचा (MS Dhoni) दर्जा दिला. रैना आजही चेन्नईच्या फॅन्समध्ये चिन्ना थाला (Chinna Thala) म्हणून प्रसिद्ध आहे. यावर्षी घडलेल्या काही घटनांमुळे रैना आणि CSK यांच्यातील नातं संपुष्टात आलं अशी चर्चा होती. ‘मुंबई मिरर’ नं दिलेल्या बातमीनुसार ही चर्चा निराधार आहे. सुरेश रैना पुढच्या वर्षीही (IPL 2021) मध्ये चेन्नईच्याच यलो जर्सीमध्ये खेळताना दिसेल अशी माहिती CSK टीमच्या अधिकाऱ्यानं दिली आहे.
रैनाच्या बाबतीत काय घडले होते?
सुरेश रैनासाठी 2020 हे वर्ष खराब गेले. मुंबईतील एका बारमध्ये रात्री उशीरापर्यंत पार्टी करताना सापडल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात त्याला सुरुवातीला अटकही झाली होती. रैनासाठी यावर्षी घडलेली ही एकमेव वाईट घटना नाही.
रैनाची या वर्षाची सुरुवात दुखापतीमुळे झाली. या दुखापतीमुळे तो वर्षाचा सुरुवातीचा काळ क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर त्याने महेंद्रसिंह धोनीसोबतच 15 ऑगस्ट 2020 या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली. रैनाचे फॅन्स त्याच्या नेहमीच्या सुपर हिट आयपीएल अवताराची प्रतीक्षा करत होते. रैना या स्पर्धेसाठी युएईमध्ये दाखलही झाला होता. मात्र काही दिवसांनीच वैयक्तिक कारणांमुळे त्याने स्पर्धेतून माघार घेतली.
( वाचा : IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सच्या वाटचालीचा सविस्तर रिपोर्ट )
‘रैनानं माघार का घेतली?’ या प्रश्नावर आजवर अनेक कारणं देण्यात आलेली आहेत. यापैकी एकही कारण रैना आणि CSK या दोन्ही बाजूंना शोभणारे नाही. त्यानंतर ‘रैना आणि CSK यांच्यात फाटले’. ‘CSK ने रैनाचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केले’. ‘त्यामुळे आता पुढच्या वर्षी रैनाला पुढच्या वर्षी ऑक्शनमध्ये विकत घेईल त्या टीमकडून खेळणार’, या प्रकारच्या अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. या सर्व चर्चा निराधार असल्याची बातमी आहे.
“रैना पुढच्या वर्षीही आमच्याच टीमकडून खेळेल. रैना आमच्यापासून वेगळं झाल्याच्या चर्चा निराधार आहेत,’’ असं CSK च्या अधिकाऱ्यानं स्पष्ट केले आहे.
रैना आणि CSK कनेक्शन
आयपीएल स्पर्धेतील दिग्गज खेळाडू असलेला रैना 2008 मधील पहिल्या सिझनपासून CSK टीमचा सदस्य आहे. CSK वर 2016 आणि 17 अशी दोन वर्ष बंदी होती तेंव्हाच तो गुजरात लायन्स टीमकडून खेळला.
रैनानं CSK कडून 160 मॅचमध्ये 4500 पेक्षा जास्त रन्स काढले आहेत. तीन विजेतेपद, सहा उपविजेतेपद आणि एकदा चौथा क्रमांक या सीएसकेच्या वैभवाशाली कामगिरीचा रैना हा मुख्य शिल्पकार होता.
( वाचा : ‘बाळाच्या जन्मावेळी माही सोबत नव्हता तेंव्हा काय वाटलं?’; साक्षीने सांगितली ‘मन की बात’ )
रैना फक्त यावर्षी CSK कडून खेळला नाही आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे यावर्षीच टीमची कामगिरी घसरली. यावर्षी प्रथमच CSK ला स्पर्धेची बाद फेरी गाठण्यात अपयश आलं. संपूर्ण स्पर्धेत वारंवार कोसळणारी बॅटिंग ऑर्डर पाहताना CSK फॅन्सना रैनाची आठवण येत होती. त्यामुळे पुढच्या वर्षी टीमची मॅच सुरु असताना ‘रैना है ना’ असं विश्वासानं बोलण्याची त्यांना संधी असेल.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.