फोटो – सोशल मीडिया

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 14 वा सिझन (IPL 2021) खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोना व्हायरसची लागण झाल्याने स्थगित करावा लागला. आयपीएल स्पर्धेतील चार टीमना कोरोनाचा फटका बसला. आता सर्व जण कोरनामधून बरे झाले आहेत. मात्र त्यांच्यासाठी तो अनुभव त्रासदायक होता. कोरोना व्हायरसची लागण झाल्याने खूप घाबरलो होतो, अशी कबुली चेन्नई सुपर किंग्सचा बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालजी (Lakshmipathy Balaji) याने नुकतीच दिली आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) टीम सेफर्टला कोरोनाचे अनुभव (Tim Seifert On Covid 19) सांगताना रडू आवरले नाही.

काय घडला प्रसंग?

टीम सेफर्टला आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान कोरोनाची लागण झाली होती. आता तो बरा झाला असून न्यूझीलंडमध्ये परतला आहे. तेथील नियमानुसार सेफर्ट सध्या 14 दिवसांचा आयसोलेशन कालावधी पूर्ण करत आहे. या कालावधीमध्ये ऑनलाईन इंटरव्ह्यू देताना त्याला रडू आवरले नाही.

सेफर्टला आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे 7 मे रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावेळी कोव्हिड पॉझिटिव्ह असलेला चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) बॅटींग कोच माईक हसी (Mike Hussy) सोबत सेफर्टचे चेन्नईच्या हॉस्पिटलमध्ये उपचार झाले.

IPL 2021 पुन्हा होणं शक्य आहे? वाचा काय आहेत BCCI समोरचे पर्याय

“मला थोडा कफ होता आणि अस्थमाचा त्रास जाणवत होतो. कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचं मला समजलं तेव्हा मला सर्व जग थांबल्यासारखे वाटले. पुढे काय होणार हे मला समजत नव्हते. तो खूप भीतीदायक क्षण होता. मी सतत वाईट गोष्टी ऐकत होतो. आता ते सर्व  माझ्याबाबतीत देखील घडणार आहे, असे मला वाटले.” कोरोना झाल्यानंतरच्या मनस्थितीचे वर्णन करताना (Tim Seifert On Covid 19) सेफर्टला रडू आवरलं नाही. त्याचा गळा यावेळी भरुन आला होता.

मॅकलम- फ्लेमिंगने केली मदत

सेफर्टला कोरोनाचा अनुभव सांगताना रडू आवरत नव्हते. काही वेळ थांबल्यानंतर त्याने पुढील अनुभव सांगितले. कोलकाता नाईट रायडर्सचा मुख्य कोच ब्रँडन मॅकलम (Brendon McCullum) आणि चेन्नई सुपर किंग्सचा मुख्य कोच स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) या दोन न्यूझीलंडच्या दिग्गजांनी या काळात आपल्याला खूप मदत केली, असे सेफर्टने म्हणाला.

भारतामधील प्रत्येक गोष्टीत Negativity Unlimited शोधणाऱ्या मंडळींना मॅथ्यू हेडनचं खणखणीत उत्तर

“सीएसके आणि केकेआरच्या टीम मॅनेजमेंटनं मी बरा झाल्यानंतर घरी परतण्यासाठी पूर्ण मदत केली. काही दिवसानंतर परिस्थिती शांत झाली. हा काळ संपणार आहे, फक्त सकारात्मकता वृत्ती ठेवण्याची गरज आहे, हे मला माहिती होते.” असं सेफर्टने स्पष्ट केले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: