फोटो – ट्विटर / @KKRiders

मागच्या वर्षी झालेल्या आयपीएल (IPL 2020) स्पर्धेत बॅटींग ऑर्डरमध्ये सर्वात जास्त प्रयोग कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) केले होते. यावर्षी त्यांच्याकडं सर्वात कमी पैसे होते. त्यामुळे असेल कदाचित पण यंदाची टीम निवडताना (KKR 2021) केकेआरनं फारसे प्रयोग न करता चांगली शॉपिंग केली आहे.

रसेल – नरीनचे बॅक अप

केकेआरला या सिझनमध्ये त्यांचे प्रमुख ऑल राऊंडर आंद्रे रसेल (Andre Russell) आणि सुनील नरीन (Sunil Narine) यांचे बॅक अप खेळाडू हवे होते. ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरीस सारखे महागडे पर्याय कमी पैशांमुळे त्यांना शक्य नव्हते. त्यांनी बांगलादेशच्या शाकीब अल हसनला (Shakib Al Hasan) टीममध्ये घेत एक चांगला ऑल राऊंडर मिळवला आहे. बॅटींग, बॉलिंग आणि अनुभव या तिन्ही गोष्टीमध्ये शाकीब केकेआरला उपयोगी ठरु शकतो. त्याचबरोबर तो यापूर्वीही केकेआरकडून खेळला आहे, ही टीम मॅनेजमेंट आणि शाकीब या दोघींसाठीही जमेची बाजू आहे.

शाकीब प्रमाणेच 2016 च्या आयपीएल फायनलचा हिरो बेन कटींग (Ben Cutting) हा आणखी ऑल राऊंडर केकेआरनं शेवटच्या क्षणी घेत ही आघाडी भक्कम केली आहे. कटींगकडं आयपीएलसह जगभर खेळण्याचा अनुभव असून तो देखील एक चांगला बॅकअप केकेआरला (KKR 2021) यंदा मिळाला आहे.

( देश आधी की आयपीएल? शाकीब आणि रबाडा यांचं काय ठरलंय ते वाचा )

कार्तिकचा बॅकअप

केकेआरला यावर्षी दिनेश कार्तिकचा (Dinesh Karthik) बॅकअप म्हणून एक भारतीय विकेट किपर हवा होता. उपलब्ध पर्यायांपैकी सौराष्ट्रकडून दिर्घकाळ खेळलेल्या शेल्डन जॅक्सन (Sheldon Jackson) हा एक चांगला पर्याय त्यांनी निवडला आहे. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत जॅक्सननं एक जबरदस्त सेंच्युरी झळकावली होती. त्याचबरोबर शाकीब प्रमाणे तो देखील केकेआरचा जुना खेळाडू आहे.

हरभजनचा समावेश

अनुभवी हरभजन सिंगचा (Harbhjan Singh) केकेआरनं अगदी शेवटच्या टप्प्यात समावेश केला. मोठ्या स्पर्धांचा आणि मोठ्या लढतीचा हरभजनचा अनुभव केकेआरला फायदेशीर ठरेल. वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांना हरभजनच्या टीप्स नक्कीच उपयोगी पडतील. त्याचबरोबर या दोघांचा बॅकअप म्हणूनही हरभजनचा वापर त्यांना करता येईल. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटचा अनुभव असलेल्या पवन नेगीला (Pawan Negi) देखील कोलकातानं करारबद्ध केलं आहे.

अनुभवी भारतीय फास्ट बॉलर्सची उणीव

प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी आणि कमलेश नागरकोटी या तरुण भारतीय फास्ट बॉलर्सच्या त्रिकुटावर केकेआरला विश्वास अजूनही कायम आहे. या तिघांपैकी दोन जण अंतिम 11 मध्ये खेळतील अशी शक्यता आहे. केकेआरला या सिझनमध्ये (KKR 2021) अनुभवी भारतीय फास्ट बॉलरची गरज होती. केकेआरनं कदाचित कमी पैशांचा विचार करुन अनुभवाला प्राधान्य न देता वैभव अरोरा (Vaibhav Arora) या हिमाचल प्रदेशच्या फास्ट बॉलरची निवड केली आहे.

( वाचा : IPL 2020 च्या ‘हिरो नंबर 1’ ची आता टीम इंडियात एन्ट्री ! )

ओपनिंग बॅट्समनसाठी चांगल्या शोधात असलेल्या केकेआरनं कर्नाटकचा अनुभवी खेळाडू करुण नायरला (Karun Nair) शेवटच्या क्षणी घेत एका चांगल्या बॅट्समनची आपल्या टीममध्ये भर घातली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सची टीम – इऑन मॉर्गन, आंद्रे रसेल दिनेश कार्तिक, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, सुनील नरीन, पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, टीम सॅफर्ट, शाकीब अल हसन, बेन कटींग, हरभजन सिंग, करुण नायर, पवन नेगी, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा आणि व्यंकटेश अय्यर

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: