फोटो – BCCI/IPL

कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) मागच्या दोन सिझनमध्ये रन-रेटच्या कारणामुळे ‘प्ले ऑफ’ गाठण्यात अपयश आलं. मागील सिझनमध्ये तर कोच ब्रँडन मॅकलम (Brendon Mccullum) याने केलेल्या भरपूर प्रयोगाचा केकेआरला (KKR) फटका बसला. ‘भाकरी फिरवली नाही तर करपते, पण भाकरी सतत फिरवली तरीही ती करपते’ इतकं जरी केकेआरच्या मॅनेजमेंटनं लक्षात ठेवलं (IPL 2021 KKR Preview) तरी मागच्या सिझनमध्ये हुकलेल्या गोष्टी यावर्षी त्यांना पूर्ण करता येतील.

केकेआरची बलस्थाने

कोलकाता नाईट रायडर्सकडं आंद्रे रसेल (Andre Russell),  इऑन मॉर्गन (Eoin Morgan) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) ही धोकादायक लोअर ऑर्डर आहे. यामधील प्रत्येक प्लेयर त्याच्या दिवशी मॅचचं चित्र बदलू शकतो. या तिघांना पुरेसे बॉल खेळायला मिळतील याची खबरदारी केकेआरनं घेतली तर त्यांचा रनरटेचा प्रश्न निकाली लागू शकेल.

शाकिब-अल-हसन (Shakib Al Hassan) या बांगलादेशी ऑल राऊंडरच्या समावेशामुळे केकेआरला सुनील नरीनचा ( Sunil Narine) बदली खेळाडू मिळाला आहे. शाकिब मॅचच्या कोणत्याही टप्प्यात बॅटींग आणि बॉलिंग खेळू शकेल. शाकिबला टॉप ऑर्डरमध्ये खेळवून सुरुवातीपासून रन-रेट वाढवण्याचा प्रयत्न केकेआरला (IPL 2021 KKR Preview) करता येईल.

वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) हा मिस्ट्री स्पिनर मागच्या सिझनमध्ये केकेआरला मिळाला आहे. त्यानं मागच्या सिझनमध्ये 17 विकेट्स घेतल्या होत्या. वरुण दुखापतग्रस्त झाला नसता तर त्यानं एव्हाना टीम इंडियाकडून पदार्पण केलं असतं. वरुण पूर्ण फिट असेल तर यंदाही कमाल करु शकतो. त्याचबरोबर हरभजन सिंग आणि कुलदीप यादव हा सर्वात अनुभवी स्पिन बॉलर्सची बेंच स्ट्रेंथ देखील केकेआरकडं आहे.

IPL 2020 : प्रयोग झाले खूप, KKR झाले आऊट

केकेआरच्या मार्गातील धोके

केकेआरला मागच्या आयपीएलमध्ये वेगवान सुरुवात कधीही करता आली. त्यांचा पॉवर प्ले मधील स्ट्राईक रेट (7.1) हा सर्वात कमी होता. तसंच त्यांनी ‘पॉवर प्ले’ मध्ये विकेट्स देखील मोठ्या प्रमाणात गमावल्या होत्या.

शुभमन गिल (Shubman Gill) हा एकमेव स्थिर बॅट्समन केकेआरच्या बॅटींग ऑर्डरमध्ये मागच्या वर्षी होता. गिलमध्ये गुणवत्ता आहे. त्याच्याकडून केकेआरलाच नाही तर टीम इंडियालाही मोठ्या आशा आहेत. पण, त्याचा स्ट्राईक रेट (117.6) इतका साधारण आहे. तो सुधारण्यासाठी गिलला काम करावं लागेल.

पॅट कमिन्स हा 15.5 कोटी रक्कमेचा बॉलर डेथ ओव्हरमध्ये उपयोगी ठरत नाही. तो फक्त पॉवर प्लेमध्ये चांगली बॉलिंग करु शकतो. कमिन्सला मागच्या सिझनमध्ये अगदी शेवटी फॉर्म सापडला होता. यंदाही कमिन्सनं गडबड केली तर केकेआर अडचणीत येऊ शकते.

प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, कमलेश नागरकोटी आणि संदीप वॉरियर्स या भारतीय तरुण फास्ट बॉलर्सवर केकेआरनं मागच्या तीन वर्षांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. पण त्यांनी अजून म्हणावे इतके रिटर्न्स दिलेले नाहीत. या चार पैकी किमान एक आणि कमाल दोन बॉलर अंतिम 11 मध्ये खेळणार आहेत. या बॉलर्सचा योग्य वापर करण्याचं आव्हान (IPL 2021 KKR Preview) कॅप्टन मॉर्गन समोर असणार आहे.

IPL 2021 KKR : कमी पैशांमध्ये चांगली शॉपिंग, ‘प्ले ऑफ’ साठी मदत करणार?

सुनील नरिनच्या बॅटींगमधील कच्चे दुवे सर्वच टीमनं ओळखले आहेत. नरिनसाठी बॉलर म्हणून मागचा सिझनही निराशाजनक गेला होता. केकेआरच्या या विश्वासू प्लेयरला ते किती मॅच खेळवणार हा प्रश्न आहे. त्याचबरोबर रसेल या वर्षात क्रिकेट खेळलेला नाही. त्याचा फिटनेस हा नेहमीच काळजीचा विषय असतो. रसेल पुन्हा पडला तर केकेआरचा डोलारा कोसळण्यास वेळ लागणार नाही.

कोलकाता नाईट रायडर्सची टीम – इऑन मॉर्गन, आंद्रे रसेल दिनेश कार्तिक, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, गुरुकिरत मान, संदीप वॉरियर, शिवम मावी, सुनील नरीन, पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, टीम सॅफर्ट, शाकीब अल हसन, बेन कटींग, हरभजन सिंग, करुण नायर, पवन नेगी, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा आणि व्यंकटेश अय्यर

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: